पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" प्रभागात प्रसंग असेल बाका तर बोलवा नागेश काका"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये सध्या पंढरपूर शहरांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शहरात थंडीचा जोर वाढत असतानाच निवडणूक आणि प्रचारामुळे संपूर्ण शहरात गरम वातावरण पंढरपूर निवासी अनुभवू लागले आहेत.        पंढरपूर शहरातील उपनगर म्हणून ओळखले जाणारे लिंक रोड नागालँड परिसर या प्रभाग क्रमांक 13 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नागेश काका भोसले यांच्यासोबत तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या महिला उमेदवार रुक्मिणी धनाजी धोत्रे या महिला उमेदवार या प्रभागामध्ये निवडणुकीस उभे असून या प्रभागांमध्ये गत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागेश काका  हे या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते . या प्रभागामध्ये त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवण्या पूर्वीच या भागामध्ये नागेश काका भोसले यांनी रस्ते व त्याचप्रमाणे या प्रभागामधील मूलभूत सुख सुविधा नागेश काकांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांनी उमेदवारी मागे घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सौ साधनाताई नागेश भोसले यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी या ठिक...

" विरोधकांचा डोळा पंढरपूर नगरपालिका मध्ये येणाऱ्या निधीवर आहे" माजी आमदार प्रशांतराव परिचारक

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये ठिकठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रचार सभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे पांडुरंग परिवार परिचारक गट यांच्या माध्यमातून भाजपा पंढरपूर शहरांमध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे. पंढरपूर शहरातील हिंदू आणि मुस्लिमांचा सलोखा ज्या ठिकाणी कायमस्वरूपी दिसून येतो. तो परिसर म्हणजे कालिकादेवी मंदिर परिसर या परिसरामध्ये आज रोजी भाजपाच्या वतीने कॉर्नर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी विरोधकांच्यावर टीकास्त्र सोडले. ते आपल्या भाषणांमध्ये बोलत असताना ते म्हणाले की या विरोधकांना पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी काही घेणे देणे नाही. यांचा फक्त पंढरपूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या कोट्यावधी निधीवर त्यांचा डोळा आहे. जातीपातीचे राजकारण करून हे विरोधक जाती-पातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. अशा जातीपातीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना कायमस्वरूपीच घरी बसवण्याचे काम उद्याच्या दोन तारखेला मतदानाच्या माध्यमात...

"सर्वच ठिकाणी कमळ चिन्ह दिसू लागले विरोधकांचे धाबे दणाणले".... भाजपा उमेदवारांची भव्य प्रचार फेरी.

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरांमध्ये भाजपा आणि परिचारक गटाचे पांडुरंग परिवार यांनी या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.      भाजपाचे उमेदवार त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाची उमेदवार सौ शामल ताई लक्ष्मण शिरसाट या संपूर्ण शहर मध्ये घरोघरी जाऊन भाजपा व कमळाचे प्रचार संपूर्ण शहर परिसरातील उपनगरे, झोपडपट्टी विभाग या भागामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांनी या संपूर्ण पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेला भाजपाच्या कमळाला निवडून द्या असे ते आव्हान करीत आहेत. या त्यांच्या आवाहनाला संपूर्ण पंढरपूर शहरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाचे सरकार केंद्रामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये असल्यामुळे पंढरपूर शहराला पंढरपूर शहरातील विकासाला लागणारा निधी हा कमी पडू दिला जाणार नाही. अशी माहिती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामलताई लक्ष्मण शिरसाठ यांनी दिली.     पंढरपूर शहरासाठी त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील आमचा कुटुंबाने समाजसेवेच्या माध्यमातून गेली 30-40 वर्षे झाले आम्ही गोरगरीब तसेच दलित...

" सत्ताधारी हे बहिरे आहेत त्यांना " शिट्टी" च्या आवाजाने जागे करण्याची वेळ आली आहे " .... आमदार अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेतील गेली 30-40 वर्ष विकास कामाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात मग्न असलेले हे सत्ताधारी सर्वसामान्यांच्या आणि अडचणी समस्या या त्यांना ऐकू येत नाहीत. अशा या बहिर्या सत्याधाऱ्यांना शिट्टीच्या आवाजाने जागे करण्याची वेळ आली आहे.       माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या प्रचार शुभारंभाच्याप्रसंगी नामदेव पायरी या ठिकाणी आवाहन करत या सत्ताधाऱ्यांना घरी बसून याची वेळ आली आहे. असे त्यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणांमधून आपले मनोगत व्यक्त केले.       पंढरपूर हे आता धुळपूर म्हणून ओळखले जात आहे. या शहरातील साधी धूळ कमी करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदारी जोपासणाऱ्या मंडळींना मोठे करणारे सत्ताधारी आता विकासाच्या गप्पा मारू लागले आहेत. सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनींना या सत्ताधारींच्या भूलथापांना बळी न पडता त्यांनी श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या सर्व प्रभागातील उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावे. असे आवाहन देखील आमदार अभिजीत आबा पाटील यांनी के...

" सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या प्रिन्स ला समाजाच्या जमीनी कमी पडू लागल्या".... .... भगिरथ भालके.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळी मध्ये एकमेकांवर टीका करण्याचे सत्र आता सुरू झाले आहे. आज रोजी तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी प्रचार सभेमध्ये भाजपाचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.      सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या प्रिन्सला समाजाच्या जमिनी कमी पडू लागले आहेत. अनेक गोरगरीब त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजातील काही जमिनी या लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपाच्याच आमदारांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून पंढरपूर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या मौल्यवान अशा जागेचा कागद हा 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासनाचे सर्व कार्यालय बंद असतात. अशा 26 जानेवारीच्या दिवशी हे भूखंड लाटू लोक खरेदीचा व्यवहार करू लागले आहेत. अशा भ्रष्ट सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या प्रिन्सला पंढरपूर शहरातील मतदार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.      सोन्याचा चमचा घेऊन आलेले हे प्रिन्स पंढरपूर शहराच्या विकासाचा व्हिजन सांगू लागले आहेत. या प्रिन्सने प्रथमता पंढरपूर ...

" निवडणूकीतील घोटाळे भाजपाने न केल्यास आमच्या नगराध्यक्षा उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके या निवडून येणार"....... खासदार प्रणिती ताई शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये आज रोजी सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती ताई  शिंदे या स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भालके यांच्या कार्यालयामध्ये आले असता त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होत असता त्या म्हणाल्या काँग्रेस सरकारने महिलांसाठी आरक्षण दिल्यामुळे या आरक्षणाचा लाभ हा संपूर्ण देशभरामध्ये सर्वपक्षीय महिलांना त्याचा लाभ होत आहे.       पंढरपूर शहर हे तीर्थ क्षेत्र शहर असून या शहराकडे राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे.  या शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या पंढरपूर शहरांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार जाहीर झाल्यामुळे महिला या सक्षम असतात. स्वच्छ कारभार करणारे असतात .आणि त्या भावनिक असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या समस्या अडीअडचणी याची त्यांना जाण असते. त्यामुळे शहरातील रहिवाशांना एक दिलासा मिळणार आहे. डॉ. प्रणिताताई भालके या उच्चशिक्षित असून पंढरपूर शहरातील सर्व अडीअडचणी त्या जाणतात. त्या संपूर्ण शहराच्या विकासासा...

" तीन कोटींचा निधी मी नगरसेवक नसताना आणून कामे केली आहेत.".... आदित्य फत्तेपूरकर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) कोणतीही सत्ता नसताना मी माझ्या या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला , मंत्री महोदय भरणे मामा यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी आणला.आणि त्या निधीमधून या प्रभागातील रस्ते ची कामे केली.    या प्रभागामध्ये वडार समाजातील लोकांची संख्या मोठी आहे.या समाजाला समाज मंदीर साठी एक कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे.     प्रबोधनकार ठाकरे चौक या परिसरातील रस्ते ची कामे केली आहेत. या  परिसरात उच्चशिक्षित लोकांच्या वसाहती आहेत.या वसाहतीने तीस..तीस हजार जागा ओपन पेस ठेवले आहेत.या जागा रिकाम्या पडून आहेत.या जागेवर लहान मुलांसाठी बगीचा, खेळण्यासाठी जागा होऊ शकते नानानानी पार्क होऊ शकतो.परंतू नगरपालिकेमध्ये तीस..तीस वर्षं सत्ता असूनसुद्धा या प्रभागात कामे केली नाहीत.हा प्रभाग सर्वात मोठा आहे.या प्रभागातील असंख्य कामे मी केलेले आहेत. कोणतीही सत्ता माझ्याकडे नसताना देखील मी या प्रभागातील असंख्य कामे केलेले आहेत माझे सर्व पक्षातील नेतेमंडळी व आमदार खासदार यांच्याशी माझे चांगले संबंध असल्यामुळे मला निधी मिळवण्यासाठी कुठलीही अडचण येत ना...

" प्रभाग क्रमांक १२ हा डिजिटल प्रभाग करणार" .....अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल .

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) असंख्य समस्याने भरलेला हा प्रभाग क्रमांक 12 या असंख्य समस्या बरोबरच या प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था मूलभूत मूलभूत सुविधाचा अभाव हा प्रभागामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही आणि या परिसरातील महिलांना आर्थिक बाबतीत सबला होण्याच्या उद्देशाने कुठला देखील उपक्रम या प्रभाग क्रमांक 12 मध्ये नाहीत. असा हा विकासाच्या सर्वच बाबतीत वंचित असलेला हा प्रभाग क्रमांक 12 मी पूर्णतः डिजिटल प्रभाग केल्याशिवाय राहणार नाही. असे प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.        या प्रभाग क्रमांक 12 मधील असंख्य महिलांच्या हाताला काम नाही. या महिलांना विविध बचत गटाच्या माध्यमातून व विविध लघु उद्योगाच्या माध्यमातून ,घरगुती उद्योगाच्या माध्यमातून या महिलांना संसारासाठी चार पैसे मिळवण्याच्या उद्देशाने मी विविध उपक्रम या प्रभागामध्ये राबवणार आहे. या प्रभागातील महिला या होतकरू व गरजू आहेत. अशा या महिलांचे आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी आणि माता भगिनींना आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने मी या प्रभ...

"श्रीनिवास उपळकर यांचे समाजकार्य या निवडणुकीमध्ये कामाला येणार" .. प्रभाग क्रमांक ३ब मध्ये मताची विभागणी होणार?.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी पंढरपूर शहरांमध्ये सध्या दिसून येत आहे.      पंढरपूर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर वाढत चालण्याचा दिसून येत आहे. यास पंढरपूर नगरीतील प्रभाग क्रमांक तीन अ आणि ब या प्रभागात काशी कापडी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून त्या समाजाच्या बरोबरीनेच मराठा समाजाची तसेच अन्य इतर समाजातील मते देखील मोठ्या प्रमाणात आहेत.       या प्रभागामध्ये गंगेकर यांच्या कडून सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे या समाजामधील दोन युवा कार्यकर्ते पानकर आणि उपळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला. उमेदवारासोबतच भाजपाचे कृष्णा कवडे तसेच गांडूळे, शिंदे, माने वैभव फसलकर हे देखील उमेदवार निवडणुकी त उभे आहेत . या ठिकाणी समाजसेवेच्या माध्यमातून पानकर आणि श्रीनिवास उपळकर यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे या प्रभागामध्ये मत विभागणीची शक्यता दाट निर्माण झाली आहे. अशी चर्चा या प्रभागामध्ये सुरू आहे.       श्रीनिवास उ...

"प्रभाग क्रमांक 9 आणि 10 या प्रभागांमध्ये भाजपाच्या कमळाची जोरदार चर्चा" ..... दोन्हीही प्रभाग भाजपामय झाल्याचे चित्र दिसून आले.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आज रोजी पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा या प्रभागामध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रचार फेरी आज मोठ्या प्रमाणामध्ये निघाली.       या प्रभागामध्ये प्रचार फेरीच्या दरम्यान सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनींने भाजपाच्या उमेदवाराचे सहर्ष स्वागत केले. विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते. प्रशांतराव परिचारक यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, उद्योगपती दीपकराव भोसले या प्रभागातील उमेदवार वैभव भोसले आणि पंढरपूर शहराचा नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार सौ शामल ताई लक्ष्मण शिरसाट त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील सर्व प्रभागांमधील भाजपचे उमेदवार आज या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते.        विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी या प्रभागामधील मतदार बंधू भगिनींना भाजपच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून भाजपाच्या कमळाला प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन केले. या प्रभागामधील सर्व मूलभूत सुविधा या ...

" सौ.अमृता विदूल आधटराव यांना प्रभाग क्रमांक १७ ब मध्ये बिनशर्त पाठिंबा".....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब या ठिकाणी असलेल्या महिला उमेदवार सौ.अमृता विदुल आधटराव यांना या प्रभागामध्ये मतदार बंधू भगिनींच्या कडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे.       या प्रभाग क्रमांक 17 ब मधील अपक्ष उमेदवार सौ आरती सागर चव्हाण यांनी आज रोजी सौ अमृता विदुल आधटराव यांना बिनशर्तपणे पाठिंबा दिला आहे. यावेळी महिला उमेदवार सौ आरती सागर चव्हाण पाठिंबा देत असताना त्या म्हणाल्या विदुल आधटराव आणि सौ अमृता विदुल आधटराव यांचे सामाजिक कार्य मोठ्या स्वरूपात असून या प्रभाग क्रमांक 17 ब मध्ये मताची विभागणी टाळण्याच्या उद्देशाने आम्ही सौ अमृता विदुल आधटराव यांना बिनशर्तपणे पाठिंबा दिला आहे. आम्ही देखील सौ अमृता विदुल आधटराव यांचा प्रचार करणार आहोत.अशी देखील माहिती सौ आरती सागर चव्हाण यांनी दिली.      अपक्ष उमेदवारांनी सौ अमृता विदुल आधटराव यांना पाठिंबा दिल्यामुळे एकच चर्चा सुरू असून सौ अमृता विदुल आधटराव याच निवडून येणार असे या प्रभागातील मतदार म्हणू लागले.

" आम्ही केलेली विकासकामे विरोधकांना दिसत नाही"....... प्रशांतराव परिचारक

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील विरोधकांना 2016 साली आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा दिला होता. त्या जाहीरनाम्यानुसार आम्ही केलेली विकास कामे दिसत नाहीत का? असा सवाल करत विधानपरिषद चे माजी आमदार व भाजपाचे जेष्ठ नेते प्रशांतराव परिचारक यांनी सवाल उपस्थित केला .     महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आलेला होता. या निधीमधून आम्ही पंढरपूर शहरातील व उपनगरांमधील रस्त्यांचे कामे ही दर्जेदार पद्धतीची केलेली आहे. पंढरपूर शहरातील ड्रेनेज लाईन संपूर्ण शहरभर जोडलेली आहे. वाखरी वरून येणारा पालखी मार्ग या मार्गाचे रुंदीकरण व रस्त्याचे काम हे पूर्णतः होत आलेले आहे. पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नागरिकांना व्हावी म्हणून आम्ही 19 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभा केल्या. त्याचप्रमाणे पंढरपूर शहरांमध्ये असलेला निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जाणारा यमाई तुकाई तलाव परिसर या परिसराचे सुशोभीकरण व तुळशी वृंदावन ही काम केलेले आहे. ही सर्व कामे आम्ही 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सर्वसामान्य जनतेला अभिवचन दिले होते...

"डॉ प्रणिता ताई भालके यांना रिक्षा....... आता कमळाची परीक्षा" तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना रिक्षा हे चिन्ह.

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 आज रोजी पंढरपूर नगरपालिकेमध्ये चिन्ह वाटपाच्या कारणांवरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने भगीरथ भालके डॉ. प्रणिता ताई भालके, नागेश काका भोसले मनसेचे नेते बापू धोत्रे आणि तीर्थविकास आघाडीचे उमेदवार यांनी आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या समोर तिर्थक्षेत्र विकास आघाडीने मागणी केलेली निवडणुकीतील  रिक्षा हे चिन्ह  तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी एक चिन्ह आणि त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना वेगळे चिन्ह दिले जाणार असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगिरथ भालके, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता ताई भालके, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, आणि तीर्थ विकास आघाडीचे उमेदवार या सर्वांनी उद्या संविधान दिनाच्या दिवशी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देताच रात्री उशिरा निवडणूक आयोगाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांना रिक्षा चिन्ह देण्याचे ठरले व तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 36 नग...

"मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या पत्नी सौ.माधुरी दिलिप धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून प्रचारात घेतली आघाडी "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 अ आणि 17 ब यामध्ये लोकेश नागेश यादव आणि सौ माधुरी दिलीप धोत्रे या तीर्थविकास आघाडीच्या उमेदवार असून या दोन्ही उमेदवाराने प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सद्यस्थितीला या प्रभागामध्ये दिसून येत आहे.      सौ माधुरी दिलीप धोत्रे याच प्रभागामधील कन्या असल्यामुळे या प्रभागामध्ये सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ माता भगिनी ,वडीलधारी मंडळी हे सौ माधुरी दिलीप धोत्रे यांना आपल्या मुलीप्रमाणे ,लेकीप्रमाणे मानतात. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 17 मध्ये त्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारच अशी ग्वाही या परिसरातील सर्वसामान्य मतदार बंधू देत आहेत.      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे या प्रभागामधील सर्वसामान्य जनतेशी ऋणानुबंधाची नाळ जोडली गेलेली आहे. या प्रभागामधून आपल्या पत्नी सौ माधुरी दिलीप धोत्रे यांना तीर्थ विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून त्या उभे आहेत. त्यांच्यास...

" एक संधी मतदार बंधू भगिनींनो मला द्या.....मी या प्रभाग क्रमांक १२ चा विकास केल्याशिवाय राहणार नाही" ....... सौ.पूनम युवराज भोसले

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेमध्ये उपनगर म्हणून ओळखले जाणारे इसबावी या परिसरामध्ये अद्यापही विकास कामे झालेली नाहीत. या परिसरातील सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेला कराच्या रूपामधून लाखो रुपये करांच्या रूपाने जमा करते. परंतु या परिसरामधील मूलभूत सुविधा रस्ते, पिण्याचे पाणी त्याचप्रमाणे दिवाबत्ती अशा अत्यंत गरजेच्या सुविधा या उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाहीत.विकासकामे मोठ्या प्रमाणात झालेली नाही. या प्रभागामधून निवडून गेलेले उमेदवार एकदा निवडून गेली की पुन्हा या मतदारसंघांमध्ये फिरकत देखील नाही. अशा या प्रभागामध्ये सतत सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे व त्यांच्या अडीअडचणीला, संकटाला ,मदतीसाठी धावून जाणाऱ्या नगरसेवकाची गरज आहे. या प्रभाग क्रमांक 12 मधून मी माझी उमेदवारी तीर्थ विकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेली असून मला या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींने फक्त मला एक संधी द्या मी प्रभाग क्रमांक बाराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. असे तीर्थ विकास आघाडीची उमेदवार सौ पुनम युवराज भोसले यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले...

"कमळ कोमेजून जाईल काय?" नेत्यांना वाटू लागली भीती....

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या या निवडणुकीच्या चिन्ह वाटपाच्या पूर्वसंध्येला आज पंढरपूर नगरपालिका या ठिकाणी चिन्ह वाटपाच्या कारणावरून मोठे वादंग झाल्याची दिसून आले.     या ठिकाणी तीर्थ विकास आघाडीच्या नेते मंडळींना चिन्ह वाटपाच्या संदर्भामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी असे सांगितले की अध्यक्ष पदासाठी निवडणूक चिन्ह हे वेगळे असेल आणि तीर्थ विकास आघाडीच्या अन्य उमेदवारांसाठी वेगळे निवडणूक चिन्ह असणार असल्याचे सांगण्यात आले. आज नगरपालिकेमध्ये विरोधी गटाचे तीर्थविकास आघाडीचे नेते भगीरथ भालके त्याचप्रमाणे मनसेचे दिलीप बापू धोत्रे , काँग्रेसचे अध्यक्ष आदित्य फतेपुरकर, नगराध्यक्ष पदाच्या डॉ. प्रणिता ताई भालके आणि तीर्थ विकास आघाडीचे 36 नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .     तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी मुलाखत वेळी बोलत असताना ते म्हणाले आमची तीर्थ विकास आघाडी ही अधिकृत असून निवडणूक आयोगाने अधिकृत केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आमचा तीर्थ विकास आघाडीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले आहे .हे एबी ...

प्रभाग क्रमांक 6 अ,व 6 ब मध्ये परिचारक गटाचे उमेदवार सुजीत सर्वगोड आणि रेहाना बोहरी यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद...... माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरांमधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये विविध जाती धर्मांचे लोक या प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहत असून या प्रभागामध्ये नगरसेवक सुजित सर्वगोड व महिला नगरसेविका उमेदवार रेहाना बोहरी यांचे कार्य मोठ्या प्रमाणात असून या प्रभागामध्ये भाजपाचे परिचारक गटाचे उमेदवार यांनी या प्रभागामधील सर्वसामान्य जनतेच्या आवडीनुसार आणि विनंतीनुसार त्यांनी कप बशी हे चिन्ह स्वीकारून या चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या. असे आवाहन या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार सुजित सर्वगोड आणि रेहाना बोहरी यांनी आज या प्रचार फेरीच्या रॅलीमध्ये त्यांनी सर्वसामान्य मतदारांना आवाहन केले.    विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी या प्रभागामधील मतदार बंधू भगिनींना मतदानासाठी आवाहन केले. भाजपा पक्षाच्या वतीने व परिचारक गटाच्या पांडुरंग परिवाराच्या वतीने या प्रभाग क्रमांक सहा अ व ब मध्ये कपबशी चिन्ह हे या परिसरातील लोकांच्या इच्छेनुसार कपबशी हे चिन्ह स्वीकारले असून या कपबशीच्या चिन्ह पुढील बटन दाबून सुजित सर्वगोड व रेह...

"अरे हा कसला नगरसेवक हा तर" काम का न काज" का दुष्मन सारे प्रभाग का"..... महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपालिकेच्या20 25 च्या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी पंढरपूर शहरांमध्ये सर्वत्र सुरू असून प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हे प्रचारांमध्ये आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर शहरांमध्ये प्रत्येक प्रभागांमधील रहिवाशांचे भेट घेऊन त्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी ऐकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व उमेदवार पंढरपूर नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी व वारकरी भावीक भक्तांसाठी विकासाची कोणती कामे करणार आहेत. याची माहिती त्यांनी दिली.        प्रभाग क्रमांक 17 मध्ये महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर या प्रचार फेरीमध्ये आले असता त्यांनी या प्रभागामधील घाणीचे साम्राज्य ,रस्त्यांची झालेली चाळण, खड्डेयुक्त असे रस्ते, ड्रेनेज तुंबलेले, त्या ड्रेनेज मधून वाहत जाणारे घाण मैला युक्त पाणी, संपूर्ण प्रभागामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पाहून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष...

विकासाची गंगा फक्त आम्हीच आणू शकतो. आम्ही केलेली विकास कामे विरोधकांच्या पचनी पडली नाही. ते फक्त विरोधाला विरोध करीत आहेत...... माजी आमदार प्रशांतराव परिचारक

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी....       पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये भाजपा व श्री पांडुरंग परिवार यांच्या सहयोगाने पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही लढवली जात आहे. या निवडणुकी मधून आम्ही पुढील काळामध्ये पंढरपूर शहराचा कायापालट करण्याचे उद्देशाने भावीक भक्तांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा सरकार व श्री पांडुरंग परिवार हा वचनबद्ध आहे विकासाची गंगा फक्त आम्हीच आणू शकतो ,कारण देशांमध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून पंढरपूर शहराला यापूर्वी देखील कोट्यावधी रुपयाचा निधी मिळालेला आहे व त्या निधीमधून असंख्य विकास कामे आम्ही केलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील पंढरपूर शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पंढरपूर शहरातील मतदार बंधू-भगिनींना पंढरपूर शहराच्या विकासासाठी भाजपाच्या कमळावर पुढील चिन्हाचे बटन दाबून नगराध्यक्ष पदासाठी सौ शामलताई लक्ष्मण शिरसाट व भाजपाचे सर्व प्रभागांमधील 36 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आव्हान विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आज रोजी प्रभाग क्रमांक तीन व ...

"शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट ) च्या उमेदवारांना विजयी करा".... .. रुपाली चाकणकर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) श्री विठुरायाचे पंढरपूर या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकी च्या प्रचार फेरीमध्ये त्यांनी कित्येक प्रभागांमध्ये आपला प्रचार दौरा करीत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर संवाद साधून पंढरपूर वाशी यांना आवश्यक असलेल्या सुधारणा व विकास कामे याबाबत त्यांनी चर्चा केली आणि पंढरपूर शहराला संपूर्ण देशभरामध्ये नावलौकिक मिळवून देण्यासाठी या शहरांमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन निधी देण्यामध्ये कमी पडणार नाही असे आश्वासन देत रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले.       या प्रचार फेरीमध्ये पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांच्या सोबत पंढरपूर शहर शहराध्यक्ष दिगंबर सुडके,...

" नागेश भोसले यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये यापूर्वी केलेल्या कामाचे श्रेय हे आता विरोधक घेतआहेत". .......सौ.साधनाताई भोसले ..

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण जनतेला सांगू लागले आहेत.आम्ही प्रभागांमध्ये, वार्डामधील वेगवेगळे रस्ते, पाण्याची सोय, ड्रेनेजची सोय, बाग बगीचा ,पथदिवे इत्यादी कामे केल्याची यादी सर्वसामान्य जनतेसमोर "खोटं बोल पण रेटून बोल "अशा अविर्भावामध्ये हे भाजपाचे प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार हे सर्वसामान्य जनतेला सांगू लागलेले आहेत. परंतु या प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व जनतेला माहित आहे. की नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी गत वेळी मिळण्याच्या अगोदर नागेश काका भोसले यांनी या प्रभागामधील वेगवेगळे रस्ते ,पाण्याचे सोय, तसेच ड्रेनेजची सोय ही स्वतः खर्च करून ही कामे केलेली होती. परंतु ऐनवेळी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यामुळे या ठिकाणी मिळालेली उमेदवारी नागेश काका यांनी नको म्हणून ती उमेदवारी त्यांनी या उमेदवारांना दिली . नागेश काका भोसले यांनी केलेले कामाच्या जोरावर हे उमेदवार सहज निवडून आले.  नगराध्यक्षा पद हे मला मिळाल्यामुळे नागेश काका यांनी या प्रभाग क्रमांक 13 मधील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता‌‌. परंतु या प्रभागामधील तत...

" मी पडद्या मागचा कार्यकर्ता आहे कधी? कुठे? कुणाला? उचलायचं हे मला चांगलं माहित आहे." ..... नागेश काका भोसले.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका या निवडणुकीमध्ये विरोधी गटाकडून अनेक अफवा पसरवल्या जातील ,आमिष दाखवले जातील. कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ म्हणतील .परंतु अशा अमीषाला व फसव्या जाळ्यामध्ये कोणीही कार्यकर्त्यांनी अडकता कामा नये. मी पडद्यामागचा कार्यकर्ता आहे कोणाला? कधी ?कुठे?  उचलायचे हे मला चांगले माहित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता तीर्थ विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके यांना प्रचंड मताने विजयी करायचे आहे. आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व 36 उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणायचे आणि गेली 35 वर्ष या विरोधकांची नगरपालिकेमध्ये सत्ता आहे. ती सत्ता उलटून टाकायची आहे.असे आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी शिवाजी चौक पंढरपूर येथील शिवतीर्थावर बोलत असताना नागेश भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.       यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ दादा भालके,शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिलसावंत, कल्या...

" दमबाजी कराल तर भालके शी गाठ आहे" .... भगिरथ भालके यांनी विरोधकांना ठणकावले

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेली गेली तीस-पस्तीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेमध्ये असलेले विरोधक हे सध्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. या विरोधकांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर दबाव आणल्यास दमबाजी केल्यास तर भालके शी गाठ आहे. हे लक्षात ठेवावे.असे तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवतीर्थ येथे विरोधकांना ठणकावून सांगितले.       या प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत, नागेश काका भोसले, साईनाथ अभंगराव, धनंजय कोताळकर आणि तीर्थविकास आघाडीचे सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.प्रणिता ताई भालके या उपस्थित होत्या.       पंढरपूर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य आहे. खड्ड्याने युक्त असे रस्ते आहेत. पंढरपूर शहरातील धुळीमुळे असंख्य वयोवृत्त माता भगिनी त्याचप्रमाणे लहान बालके हे आजारी आहेत. गेली 30-35 वर्ष एकाच गटाकडे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आला व आणला गेला. परंतु या शहराचा काय विकास केला? हे ...

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे या पंढरपूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सौ शामल लक्ष्मण शिरसट त्याचप्रमाणे तीर्थ विकास आघाडी कडून डॉ .प्रणिता ताई भालके या निवडणुकीस आपली उमेदवारी दाखल केलेली आहे.       दोन दिवसा खाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव पायरी परिसरामध्ये भाजपा या पक्षाने प्रचार फेरीचा शुभारंभ केला होता. त्याचप्रमाणे आज रोजी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. प्रणिता ताई भालके यांच्या प्रचार शुभारंभाचे सुरुवात आज रोजी  नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी या प्रचार शुभारंभाला व प्रचार फेरीला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी दिसून आली. सर्वसामान्य जनता आणि या मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशी जे लोक कॅरीडोर बाधित होणार आहे . अशा बाधीताची गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती.      भाजपाने प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार यांच्या उपस्थितीमध्ये केला. त्या प्रचार शुभारंभाच्या प्रचार फेरीपेक्षा क...

गेली पंचवीस तीस वर्षे सत्ता ताब्यात असूनही पंढरपूर शहर धुळ मुक्त करता आले नाही अशी सत्ता धुळीत मिसळा.......... डॉ प्रणिता ताई भालके

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नगरपालिका ही गेली 25 ते 30 वर्षे झाली परिचारक गटाच्या ताब्यात आहे. परंतु या पंढरपूर शहराचा विकास तर सोडाच या शहरातील साधी धूळीची समस्या देखील ते मिटवू शकले नाही. अशा सत्ताधारींना घरी बसवण्याची वेळ आली आहे. संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य आहे या विरोधकांना मतदार बंधू भगिनीने यंदा याच धुळीमध्ये त्यांची कारकीर्द मिसळा असे पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके यांनी मुलाखतीच्या वेळेस आपले मनोगत व्यक्त केले.       पंढरपूर शहरातील मतदार बंधू भगिनींनी नगरपालिकेमध्ये सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावेत, निष्कलंकित उमेदवार निवडून द्यावेत. सुशिक्षित उमेदवार निवडल्यानंतर ते उमेदवार आपल्या शिक्षणाचा उपयोग पंढरपूर शहराच्या विकास कामाला ते करू शकतात.     आज पर्यंत विरोधी गटाला 30-35 वर्ष सत्ता सतत ताब्यात दिलेली आहे. या विरोधकांनी भ्रष्टाचारा व्यतिरिक्त व ठेकेदारी व्यतिरिक्त आणि हुजरेगिरीच्या व्यतिरिक्त काही काम केलेले नाही. यंदाच्या या निवडणुकीमध्ये आमच्या तीर्थ विकास आघाडीला जनतेने निवडून द्यावे. फक्त ए...

" मतदार राजा जागा हो सुशिक्षित उमेदवार निवडण्याचा तू एक धागा हो"....

इमेज
 पंढरपूर) प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज पर्यंत असंख्य अशिक्षितांनी आणि धन दांडग्यांनी, ठेकेदारी जोपासणाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला आमिष दाखवून जनतेला खोटे आश्वासने देऊन नगरपालिकेतील नगरसेवक पद भूषविले आहेत. परंतु आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये उच्चशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर असलेली व अमेरिकेसारख्या राष्ट्रांमध्ये आपल्या ज्ञानाचा झेंडा फडकवणारे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून असंख्य कंपन्यामधून सेवा बजावलेली व्यक्ती म्हणजेच प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल यांनी पंढरपूर शहरांमधील दुरावस्था पाहून पंढरपूर शहराच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व माता-भगिनींना व्हावा म्हणून या पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.      पंढरपूर शहरातील वाढती बेरोजगारी, धुळीचे साम्राज्य, आणि रखडलेली विकास कामे या अनेक विकास कामाबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विठुरायाचा नगरीला समृद्ध करण्याचा उद्देशाने ...

"प्रभाग क्रमांक १६ मध्ये फक्त भाजपा चा बोलबाला ".... भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारात घेतली आघाडी.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि भाजपा पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा संपूर्ण शहरामध्ये प्रचाराचा बोलबाला सुरू असून संपूर्ण शहर हे भाजपाच्या कमळाने फुलून जाणार की काय ? असे दिसून येत आहे.        प्रभाग क्रमांक 16 अ आणि प्रभाग क्रमांक 16 ब या प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार अमोल विठ्ठल डोके आणि सौ संध्या मालोजी शेंबडे या भाजपाच्या उमेदवार असून त्या प्रभागांमध्ये आज रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकी मधील नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाठ यांच्यासह या प्रभागामध्ये मोठी प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट व तसेच अनेक नगरसेवक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या या प्रचारात सामील झाल्याचे दिसून आले. माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे स्वतः प्रत्येक वार्डामध्ये फिरून पंढरपूर वासींना भाजपला मतदान करण्याचे आव्हान करीत आहेत. कमळ चिन्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणा असे आवाह...

" भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे.पंढरपूराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही." पालकमंत्री जयकुमार गोरे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) भाजपा हा पक्ष संपूर्ण देशामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्र राज्यात व दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आहे. या कल्याणकारी सत्तेच्या माध्यमातून हे सरकार पंढरपूर शहरात चा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. असे आज रोजी पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी प्रचार फेरीचा शुभारंभ करते समय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपले मनोगत सर्व सामान्य जनतेच्या समोर व्यक्त केले.      आज भाजप या पक्षाच्या प्रचारफेरीच्या वेळी पंढरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शामल लक्ष्मण शिरसट माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसाट, विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक व  पंढरपूर शहरांमधील अठरा प्रभागांमधील भाजपाचे 36 नगरसेवक पदाचे उमेदवार व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.        पंढरपूर शहर हे तीर्थ क्षेत्र शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये लाखोच्या संख्येने भावीक भक्त येतात. त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी पंढरपूर शहराचा संपूर्ण...

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक 2025 या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज अनेक महिला भगिनींनी भरलेला होता .त्यापैकी एका उमेदवारांनी आज रोजी डॉ प्रणिता ताई भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे.       माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सारिका साबळे यांनी आज रोजी डॉ प्रणिता ताई भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये होणारी मताची विभागणी ही टळलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामल ताई शिरसाट आणि डॉ प्रणिता ताई भालके यांच्यामध्ये लढतीची रंगत पहावयास मिळणार आहे.      यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके म्हणाल्या सौ सारिका साबळे यांनी मला पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये मला निवडून येण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. पंढरपूर शहराच्या विकासासाठी मी कामे करणार आहे. असे डॉ. प्रणिता ताई भालके यावेळी त्यांनी सांगितले.     ...

"सर्व समाजाला आपलेसे करणारे व्यक्तिमत्व" आमदार समाधान दादा अवताडे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा आमदार समाधान दादा अवताडे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.       पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेच्या मतदार संघाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे नेतृत्व म्हणजे समाधान दादा अवताडे हे होय.     पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातील शेकडोच्या संख्येने असलेली खेडी व  वस्त्या ,पंढरपूर शहर व मंगळवेढा शहर या शहरांमधील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व कल्याणकारी कार्य करणारे नेतृत्व म्हणून समाधान दादा अवताडे हे ओळखले जातात. समाधान दादा अवताडे यांनी या मतदारसंघांमध्ये दोन वेळा पराभव पत्करला परंतु समाधान दादा अवताडे यांनी या दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ,तरुणांची, माता भगिनींची सेवा करण्याचे घेतलेले व्रत त्यांनी मोडले नाही की सोडले नाही. ते निराश न होता या मतदारसंघांमधून त्यांनी आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले. त्यांच्या या चिकाटीला व यशाला संत दामाजी आणि पंढरीच्या पांडुरंगानी शेवटी आशीर्वाद दिला व ते दोन टर्म आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. अशा या कर्तुत्वान...

" प्रभाग क्रमांक १८( अ) मधून भालके गटाचे उमेदवारांनी प्रचाराची केली सुरुवात " विनायक बसवेश्वर देवमारे आणि सौ.संगिता अंगद धुमाळ यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी साधला संपर्क...

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूर शहराच्या अंतर्गत असलेला हा प्रभाग क्रमांक 18 या प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आज पर्यंत अनेक मूलभूत गरजा पासून वंचित ठेवलेले आहे. कित्येक भागामध्ये रस्ते झालेले नाहीत., दिवाबत्तीची दुरावस्था आहे, त्याचप्रमाणे मैला मिश्रित पाणी नळाला येते. अशा प्रकारच्या असंख्य अडचणी या प्रभागांमध्ये आहेत. घाणीचे साम्राज्य पंढरपूर शहरांमध्ये सर्वात जास्त या प्रभागांमध्ये दिसून येते. अशा प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर सर्वसामान्य जाणकार मतदारांनी प्रभाग क्रमांक 18 मध्ये उभे राहिलेले श्री विठ्ठल परिवार तीर्थक्षेत्र विकास आघाडी या आघाडीच्या वतीने सौ डॉ प्रणिता ताई भालके यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये निवडणुकीस उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असलेले विनायक बसवेश्वर देवमारे आणि त्याच प्रमाणे सौ संगीता अंगद धुमाळ या दोन्ही उमेदवारांनी आज रोजी प्रचाराचा शुभारंभ करून बागवान मोहल्ला व या प्रभागातील विविध गल्लीमधून त्यांनी आपली प्रचार फेरी सुरू केलेली आहे‌ सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात ते जात आहेत. सर्वसामान्य जनतेचे अडीअडचणी ऐकून घेऊन य...

नागेश काका भोसले व‌ सौ.रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचाराचा घेतली आघाडी

इमेज
 पंढरपूर  प्रतिनिधी ‌       पंढरपूर नगरपरिषद निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील उच्चशिक्षित व उच्चभ्रू म्हणून ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक 13 या प्रभागांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या वतीने या प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार नागेश अण्णासाहेब भोसले तसेच सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी या प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचार प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे. या प्रभागामधील प्रत्येक घरोघरी जाऊन तेथील सर्वसामान्य वयोवृद्ध ,माता भगिनी तरुण ,तरुणी यांच्या भेटीगाठी घेऊन या परिसरामध्ये राहिलेली विकास कामे व अन्य मूलभूत सुविधांच्या उपाय योजनेसाठी पंढरपूर नगरपरिषद मध्ये आग्रहाने व अथक प्रयत्न करून सर्व विकासकामे करण्याचा निर्धार व आश्वासन या भागातील सर्वसामान्य मतदारांना त्यांनी दिले.      गेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये रस्ते, त्याचप्रमाणे ड्रेनेज, पिण्याचे पाण्याची सोय , दिवाबत्ती अशी अनेक कामे नागेश काका भोसले यांनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेले आहेत. यंदाच्या या नगरपालिकेच्या नि...

" देव दर्शन घेऊन सौ.शामल शिरसट यांनी केला प्रचाराचा शुभारंभ"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाठ यांनी आज प्रचाराचा शुभारंभ देवदर्शन घेऊन सुरू केला. त्यांच्यासोबत त्यांचे पती लक्ष्मण शिरसाट त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते हे प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.       गेली 30-40 वर्ष लक्ष्मण पापरकर यांनी परिचारक परिवारांची एकनिष्ठा बाळगून राजकारण तसेच समाजकारण हे करत त्यांनी आपल्या प्रभागातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची भाजपाच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. शामल लक्ष्मण शिरसट यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे.       लक्ष्मण शिरसट यांनी आपल्या प्रभागातील सर्वसामान्य जनतेची कामे, प्रभागातील रस्ते ,पाणी ,दिवाबत्ती, त्याचप्रमाणे पंढरपूर शहरांमध्ये महापूर काळामध्ये त्यांनी केलेली सेवा व मदत ही त्यांची उल्लेखनीय कार्य असून या असंख्य समाजसेवेच्या कार्याच्या जोरावर ती पंढरपूरचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी होतील. असा विश्वास सौ शामल लक्ष्मण शिरसाठ व लक्...

" फक्त एकदा संधी देऊन बघा मी प्रभाग क्रमांक १० ब चा विकास करुन दाखवतो" ... वैभव शहाजी भोसले

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा ब या प्रभागामध्ये आज रोजी वैभव शहाजी भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांच्यासोबत  प्रभाग क्रमांक दहा व मधील असंख्य ते कार्यकर्ते हे उपस्थित होते.       अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर प्रभाग क्रमांक दहा ब मधील अपक्ष उमेदवार वैभव शहाजी भोसले यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले "प्रभाग क्रमांक दहा ब हा प्रभाग गेल्या कित्येक वर्षापासून मूलभूत सुविधा पासून वंचित असलेला हा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागामधील सर्वसामान्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा  या उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये असंख्य अडचणी व समस्या मला दिसून आल्या या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर मला प्रभाग क्रमांक दहा ब मधील मतदार बंधू भगिनी आणि मातांनी मला एक वेळ संधी देऊन बघावी मी या प्रभागाचा विकास करून दाखवितो" असे अपक्ष उमेदवार वैभव शहाजी भोसले यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर मुलाखत देते प्रसंगी ...

" ना राजकीय सत्ता ना पैशाची सुबत्ता फक्त बुद्धीमत्ता" भावी उमेदवार श्री निवास उपळकर.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरामध्ये ओळखले जाते. अशा या वैकुंठ नगरी श्री विठुरायाची पंढरी या शहरांमध्ये वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळी बुक्का आणि विठुरायाचे दर्शन घेऊन धन्य होणारे भाविक भक्त आहेत .या भाविक भक्तांच्या साठी तुळशीचे माळा या पंढरपूर शहरांमध्ये बनवल्या जातात. ज्या तुळशीच्या माळा बनवणारे काशी कपडे समाजातील लोक हे अग्रगण्य असून त्यांचा हा तुळशीची माळ बनवण्याचा पीढीजात व्यवसाय आहे. या काशीकापडी समाजातील लोकांना तुळशीची माळ बनवण्यासाठी जागेची कमतरता ही पूर्वीपासूनच भासत आलेली आहे. लहान लहान घरांमध्ये राहणारी हे गरीब काशी कापडी समाजातील लोक आपला उदरनिर्वाह तुळशीच्या माळा बनवून त्या आषाढी, कार्तिकी, चैत्री माघी,या चार वारीच्या मधून ते विक्रीस ठेवतात. त्या माळा विकून झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह हा समाज करीत असतो. या तुळशीच्या माळा घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील भाविक भक्त येत असतात.      अशा या कष्टकरी काशी कापडी समाजातील गोरगरीब लोकांसाठी समाज म...

" अजात शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशीला ताई जगताप या वाखरी जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवणार"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) एक महिला शिक्षित झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करून सोडते त्याचप्रमाणे संपूर्ण गावाला शिक्षणाचे महत्त्व ,मूलभूत गरजा तसेच लोक कल्याणाचे विविध उपक्रम शासनाकडून कसे राबवावेत याचा अनुभव असलेले वाखरी ग्रामपंचायतच्या माजी महिला सरपंच म्हणून 2000 ते 2005 या कालावधीमध्ये सरपंच पद भूषवून संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पार पाडला गावामध्ये विविध विकासाची गंगा आणण्याचे काम सुशीलाताई जगताप यांनी केले आहे. या कार्याच्या जोरावर त्या वाखरी या गटामधून जिल्हा परिषद ची निवडणूक ही सर्वसाधारण महिला ंसाठी असल्यामुळे त्या या वाखरी गटामधून जिल्हा परिषद सदस्य च्या निवडणुकीसाठी त्या प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत.      पंढरपूर तालुक्यातील संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान मध्ये ग्रामपंचायतीला तालुक्यात सतत पाच वर्षे प्रथम क्रमांक मिळवून दिला तसेच बीमा ग्राम योजनेत प्रत्येक कुटुंबाला विमा देण्याचे काम केले. पंढरपूर येथे आधार महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून त्या पतसंस्थेच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करणे लघुउद्योगास शासकीय ...