" देव दर्शन घेऊन सौ.शामल शिरसट यांनी केला प्रचाराचा शुभारंभ"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाठ यांनी आज प्रचाराचा शुभारंभ देवदर्शन घेऊन सुरू केला. त्यांच्यासोबत त्यांचे पती लक्ष्मण शिरसाट त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते हे प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते. 

     गेली 30-40 वर्ष लक्ष्मण पापरकर यांनी परिचारक परिवारांची एकनिष्ठा बाळगून राजकारण तसेच समाजकारण हे करत त्यांनी आपल्या प्रभागातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची भाजपाच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. शामल लक्ष्मण शिरसट यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. 

     लक्ष्मण शिरसट यांनी आपल्या प्रभागातील सर्वसामान्य जनतेची कामे, प्रभागातील रस्ते ,पाणी ,दिवाबत्ती, त्याचप्रमाणे पंढरपूर शहरांमध्ये महापूर काळामध्ये त्यांनी केलेली सेवा व मदत ही त्यांची उल्लेखनीय कार्य असून या असंख्य समाजसेवेच्या कार्याच्या जोरावर ती पंढरपूरचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी होतील. असा विश्वास सौ शामल लक्ष्मण शिरसाठ व लक्ष्मण तात्या शिरसाठ यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "