पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" मालमत्ता कर पंधरा दिवसांत भरा 1%सूट मिळवा".... पंढरपूर नगरपालिका.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर शहरातील रहिवाशांना पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता कर त्वरित भरावा म्हणून एक योजना आयोजित केली आहे .मालमत्ता कराची पावती मिळाल्याच्या दिवसापासून पंधरा दिवसांमध्ये मालमत्ता कर हा ऑनलाइन व रोख रकमेच्या स्वरूपात भरल्यास एक टक्का सूट देण्याची योजना जाहीर केलेली आहे .अशी माहिती पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने दिली.       ऑनलाइन कर भरण्यासाठी खालील माहितीचा वापर करावा. म्हणून चीप ऑफिसर मुन्सिपल कौन्सिल पंढरपूर यांच्या नावे यांच्या खात्यावर बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आवाहन केलेले आहे. सोबत पंढरपूर नगरपालिकेने बँकेचा खाते क्रमांक दिलेला आहे. मालमत्ता धारकांनी ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट काढून पाठवावा व त्याची पावती घ्यावी. पंढरपूर नगरपालिकेतील कर विभागाचे कर्मचारी सौ शिंदे व देवकर यांच्याकडे संपर्क साधावा. अशी माहिती पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ. आवताडे

इमेज
 मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ. आवताडे पंढरपूर (प्रतिनिधी )  सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी तूर बियाणे उपलब्ध झाले असून मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे तरी तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून या चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे  यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की,केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात संपुर्ण देशात कडधान्य मिशन राबविण्याची घोषणा केली आहे. हे मिशन पुढिल सहा वर्षासाठी असेल. केंद्रिय कृषि मुल्य आयोग मार्फत खरीप सन २०२५-२६ साठीचे हमीभाव जाहीर करण्यात आले असून सर्व कडधान्याच्या हमिभावांमध्ये ५ टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. तूर पिकाचा हमिभाव मागील ७ हजार ५५० रुपये प्रती क्विंटल वरून ८ हजार रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. तसेच उडीद पिकाचा हमिभाव मागील ७ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल वरून ७ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. शेतक-यांकडून कडधान्याची नाफेड व एनसीसी...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ). टेंभुर्णी शहरातील नामवंत असलेली दि पंढरपूर को-ऑपरेटिव मर्चंट बँक या बँकेची टेंभुर्णी येथील नवीन शाखेच्या वास्तूचा उद्घाटन समारंभ आज रोजी ह.भ.प प्रभाकर दादा बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.       माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावी असलेली एक सुप्रसिद्ध व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या टेंभुर्णी येथील नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ह.भ.प प्रभाकर दादा बोधले महाराज यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले  आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेले काम ,वारसा तो वाढवण्याचे काम पुढील पिढीने करायचा असतो.नवीन काही करण्या अगोदर आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली जी ठेव आहे ती वाढवण्याचे काम केले पाहिजे.त्याप्रमाणे आपल्या पंढरपूर मर्चंट बँकेच्या आजी-माजी संचालकांनी सभासदांनी व ठेवीदारांनी ज्या ठेवींची वाढ व जपवणूक करण्याचे काम ही पुढील संचालक मंडळ कर्मचारी सभासद हे करीत असतात. अशाच प्रकारे या बँकेच्या ठेवी या वाढत जाव्यात अशी मनोकामना ह.भ प. प्रभाकर दादा बोधले महाराज यांनी आज उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त...

चंद्रभागा भरून वाहू लागली.... पूर सदृश्य परिस्थिती

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) यंदाच्या पाऊस काळामध्ये सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी उजनी धरण हे शंभरीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरून वाहू लागल्यामुळे उजनी या धरणामध्ये त्याचा विसर्ग होत आहे .त्यामुळे पंढरी नगरीतील चंद्रभागा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.       चंद्रभागा नदीपात्रातील सर्व मंदिरे हे पाण्याने वेढली गेलेली आहेत. भावीक भक्त नदीच्या पात्रामध्ये उतरून स्नान करताना दिसून येत आहे. चंद्रभागेच्या तटाला नाविकांनी आपल्या होड्या आणून उभ्या केलेल्या आहेत. भाविक या होडी मधून पुंडलिकाचे दर्शन घेत असल्याचे  दिसून येत आहे.    सोलापूर जिल्हा प्रशासनाने व पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा सावधानतेचा इशारा दिलेला आहे.

"टाकाल कचरा घाण....दंड होणार छान" पंढरपूर नगरपालिकेने केली जाहीर सुचना

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या आषाढी यात्रे निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये राहणारे रहिवासी व तसेच येणारे यात्रेकरू, भाविक भक्त ,वारकरी यांना सूचित करण्यात येत आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने भावीक भक्त येत असतात. त्यामुळे पंढरपूर शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य हे होत असते. घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच वारकरी भाविक भक्त हे आजारी पडू नये म्हणून स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून पंढरपूर नगरपालिका आरोग्य विभागाने भाविक भक्तांना तसेच रहिवाशांना यात्री करूना आव्हान करण्यात आलेले आहे. त्यांनी कोठेही उघड्यावर कचरा टाकू नये, घाण टाकू नये ,तसेच उघड्यावर शौच करू नये ,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये ,कचरा टाकू नये, उघड्यावर लघु शंका करू नये. असे केल्यास दोनशे रुपये पासून ते एक हजार रुपये पर्यंतचा दंड हा आकारला जाणार आहे. तरी पंढरपूर शहरातील रहिवासी तसेच मठाधिकारी आणि व्यावसायिक  किरकोळ विक्रेते, वारकरी भक्त, यांच्याकडून उल्लंघन झाल्यास दंड करण्यात येईल. असे पंढरपूर नगरपालिका पंढरपूर यांच्या वतीने जाहीर सूचना करण्यात आलेली आहे. " टाकाल कचरा...

"स्वच्छतागृह तुम्ही स्वच्छ करता की आम्ही करु" .... शिवसेना युवानेते विश्वजित( मुन्ना )भोसले .

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....     दरवर्षीप्रमाणे पंढरपूर या तीर्थक्षेत्री आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढू लागलेली आहे या भाविकांच्या साठी आवश्यक असलेल्या सुख सुविधा सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच पंढरपूर शहर व तालुका प्रशासन आरोग्य विभाग त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिका प्रशासन यांनी वारकरी भाव भक्तांच्या सोयी सुविधा साठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करीत असतात. परंतु पंढरपूर शहरांमध्ये वारीचे निमित्ताने येणाऱ्या माता भगिनी यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. या माता-भगिन्यांच्या साठी पंढरपूर शहरांमध्ये प्रवेश केल्यानंतर कोठेही सुलभ स्वच्छतागृह उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. जे काही स्वच्छतागृह उपलब्ध आहेत ते अतिशय घाणीच्या साम्राज्यामध्ये बंद अवस्थेत दिसून येत आहेत .आणि जे काही नवीन शौचालय बनवलेले आहेत ते अद्यापही बंद अवस्थेत आहेत.     पंढरपूर शहरांमध्ये मुख्य रस्त्याने प्रवेश केल्या असतात एसटी स्टँड ते मंदिर कडे  स्टेशन रोड मार्गे जाणारा रस्त्यावर कोठेही महिलांसाठी व पुरुषांसाठी सुलभ स्वच्छालय तसेच बाथरूम टॉयलेटची सुविधा नाही. प्रशास...

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सध्या पंढरपूर शहरामध्ये वारीच्या निमित्ताने अतिक्रमण हटाव मोहीम नगरपालिका पंढरपूरच्या वतीने राबवली जात आहे. काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेत असून पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूर शहरामध्ये असलेले अतिक्रमण हे त्वरित हटवावे असे आदेश दिले होते. त्यानुसार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच उपविभागीय पोलीस पोलीस अधीक्षक भोसले व पोलीस कर्मचारी व नगरपालिकेतील अतिक्रमण हटाव कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पंढरपूर शहरातील नगरपालिकेसमोरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाल्याचे दिसून आले.     पंढरपूर शहरांमध्ये होणाऱ्या चार यात्रेच्या निमित्ताने असे अतिक्रमण हटवण्याचे उपक्रम नगरपालिका फक्त वारीपुरतेच अमलात आणत असतात .त्यानंतर पुन्हा जैसे थे अतिक्रमण पंढरपूर शहरांमधून होत असते. असे हे होणारे अतिक्रमण कायमस्वरूपी कसे हटविले जाईल यावर उपचार यंत्रणा ही नगरपालिकेने व पोलीस प्रशासनाने राबवली पाहिजे. दुकानदाराने केलेल्या अतिक्रमणामुळे पंढरपूर शहरांमधील सर्व रस्त्यांमधून गाड्यांची गर्दी ,ग्राह...

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे व व्यापाऱ्यांचे उपोषण सुरुच.‌..उपोषणाचा दहावा दिवस..... श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे चेअरमन व संचालक कामगारांच्या उपोषणाला भेट का देत नाहीत?. कामगारांशी माध्यमांचा समोर खुली चर्चा करणार का?...कामगारांचा सवाल

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) मनुष्य काम करतो कशासाठी तर आपले कुटुंब जगविण्यासाठी, मुलामुलींचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी म्हातारपण सुखात जावे म्हणून चार पैसे बचत करण्यासाठी मनुष्य काम करतो.     जर या काम करणाऱ्या कामगारांना पगार जर कित्येक महिने मिळत नसेल तर त्या कामगाराने काय करावे कसे जगावे.याचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार न करणाऱ्या संस्था चालकांच्या वर शासन काही कार्यवाही करणार की नाही? आपल्या न्याय हक्कासाठी थकीत वेतनासाठी उपोषणाला बसावे लागते.कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पहाणाऱ्या श्री.विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या बोलघेवड्या चेअरमन व संचालकांनी गेली दहा दिवस आमरण उपोषणाला कामगार बसले आहेत दोनशे कामगारांचे ३१ महिन्याचे वेतन सेवानिवृत्त कामगारांचे ग्रॅज्युटी चे पैसे तसेच पंधरा टक्के,बारा टक्के फरक बोनस आदी लाखो रुपये ची रक्कम थकित आहे.     शासना कडून कोट्यावधी रुपयांचा निधी कामगारांचे थकीत वेतनासाठी व व्यापाऱ्यांची देणी भागवण्यासाठी दिली असता ती रक्कम का दिली जात नाही.कित्येक कामगार मृत पावले, कित्येक कामगार आजारी आहेत.त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम दिल...