"प्रभाग क्रमांक १६ मध्ये फक्त भाजपा चा बोलबाला ".... भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारात घेतली आघाडी.....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि भाजपा पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा संपूर्ण शहरामध्ये प्रचाराचा बोलबाला सुरू असून संपूर्ण शहर हे भाजपाच्या कमळाने फुलून जाणार की काय ? असे दिसून येत आहे. 

      प्रभाग क्रमांक 16 अ आणि प्रभाग क्रमांक 16 ब या प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार अमोल विठ्ठल डोके आणि सौ संध्या मालोजी शेंबडे या भाजपाच्या उमेदवार असून त्या प्रभागांमध्ये आज रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकी मधील नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाठ यांच्यासह या प्रभागामध्ये मोठी प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट व तसेच अनेक नगरसेवक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या या प्रचारात सामील झाल्याचे दिसून आले. माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे स्वतः प्रत्येक वार्डामध्ये फिरून पंढरपूर वासींना भाजपला मतदान करण्याचे आव्हान करीत आहेत. कमळ चिन्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणा असे आवाहन करीत आहेत. या प्रचार रॅलीला प्रभाग क्रमांक 16 मधून प्रचंड प्रतिसाद दिसून आला. या प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपाच्या उमेदवाराला भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "