"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे या पंढरपूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सौ शामल लक्ष्मण शिरसट त्याचप्रमाणे तीर्थ विकास आघाडी कडून डॉ .प्रणिता ताई भालके या निवडणुकीस आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. 

     दोन दिवसा खाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव पायरी परिसरामध्ये भाजपा या पक्षाने प्रचार फेरीचा शुभारंभ केला होता. त्याचप्रमाणे आज रोजी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. प्रणिता ताई भालके यांच्या प्रचार शुभारंभाचे सुरुवात आज रोजी  नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी या प्रचार शुभारंभाला व प्रचार फेरीला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी दिसून आली. सर्वसामान्य जनता आणि या मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशी जे लोक कॅरीडोर बाधित होणार आहे . अशा बाधीताची गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती.

     भाजपाने प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार यांच्या उपस्थितीमध्ये केला. त्या प्रचार शुभारंभाच्या प्रचार फेरीपेक्षा कितीतरी मोठी अशी प्रचार फेरी आज प्रणिता ताई भालके यांनी काढली.या रेकॉर्ड ब्रेक  प्रचार फेरी ची चर्चा सध्या पंढरपूर शहरामध्ये सुरू आहे.

     या प्रचार फेरीस उपस्थित भगिरथ भालके नागेश काका भोसले, शिवसेनेचे साईनाथ अभंगराव ,राष्ट्रवादीचे अनिल सावंत, काँग्रेसचे आदित्य फतेपुर कर ,धनंजय कोताळकर व तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "