पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातील असंख्य प्रश्नांची मांडणी करणारा आणि योजना कार्यान्वित करणारा आमदार " अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर.... .      मोजून तीन महिन्यात तीस वर्षाची एकाधिकार शाहीची निष्क्रिय राजवट उलटवून  टाकून माढा तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील 40 गावांच्या साठी जिवाचे रान करणारा सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी तरुण-तरुणी आणि वयोवृत्त जेष्ठ नागरिकांच्या साठी त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि माढा तालुक्यातील असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनाला असंख्य प्रश्नातून वाचा फोडणारे आणि आपली जनहिताची मागणी मान्य करण्यामध्ये आपली आमदारकी पणाला लावणाऱ्या युवा आमदाराला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

" पंढरपूर मंगळवेढा भागातील वीज प्रश्न तातडीने सोडविला जाणार "..... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर.... .    पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये वीज पुरवठा हा खंडित होत होता यावर उपचार म्हणून मग पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी विधानसभेमध्ये ऊर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना आठ तास वीज मिळावी म्हणून मागणी केली होती ती मागणी पूर्ण करत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबंधित वीज अधिकाऱ्यांना आदेश दिला या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वीस पुरवठा तसेच वीज विषयक अन्य प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा आदेश त्यांनी दिला. .    आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना वीज विषयक येणाऱ्या या अडचणी बाबत समस्या बाबत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मंगळवेढा येथे महावितरण चे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करणे पंढरपूर येथे महापारेषण चे नवीन विभागीय कार्यालय मंजूर करणे नागरिकांना किमान आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देणे तसेच अपूर्ण सब स्टेशनची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली गादेगाव सब स्टेशनचे अर्धवट स्थितीत अ...

"नियोजित कॉरिडोर ची व्याप्ती वाढवावी लागणार"...... . छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा कृष्ण मंदीर प्रदक्षणा मार्ग यंदा प्रचंड गर्दीचे दर्शन.

इमेज
पंढरपूर. .   यंदाची आषाढी यात्रेत गर्दीचा महासागर पंढरपूरवासीयाना पहायला मिळाला.अभूतपुर्व अशी आषाढी यात्रा भरल्यामुळे आलेल्या भक्ताची संख्या किती लाखाची आहे याचा अनुमान काढणे अशक्य  वाटत आहे. .   आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसर प्रदर्शना मार्ग चौफाळा, श्रीकृष्ण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, गजानन महाराज मठ तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आली. वारकरी बांधवांना चालताना अनेक अडचणी आल्याचे दिसून आले. .     वारकरी भाविक भक्त हे पंढरपूरला जोडणाऱ्या विविध मार्गावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपल्या राहुट्या व त्या परिसरातील मठामधून, घरामधून आपला मुक्काम केल्याचे दिसून आले. पंढरपूर शहरातील मंदिर परिसरांमधील अनेक घरांमधून तसेच प्रदर्शना मार्गावरील अनेक घरामधून वारकरी भाविक पिढ्यानपिढ्या मुक्कामास येत असतात या भाविकांना देखील या गर्दीचा त्रास झाल्याचा दिसून आला  .     कॅरिडोर ची व्याप्ती ही वाढवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून कॉरिडोर ची सुर...

" वारकरी संप्रदाय कडे सर्वाना सामावून घेण्याची क्षमता आहे".....ह.भ.प.भगवती बाई दांडेकर.

इमेज
 पंढरपूर.... .   महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ची मोठी परंपरा आहे वारकरी संप्रदाय हा नम्र आणि लिंग आहे त्याच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे तेथे जातीचा धर्माचा किंवा स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव नाही कोणी श्रीमंत कोणी गरीब नाही लहान थोर सर्व एक समजले जातात. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये जीवनाचे सत्य उद्दिष्टे सांगितलेली आहे. .  भगवती बाई दांडेकर आपल्या प्रवचनात पुढे सांगत असता त्या म्हणाल्या की ज्ञानेश्वरी समजून घ्यायचे असेल तर प्रथम माणूस कळला पाहिजे वारकरी संप्रदाय हे चांगलं जीवनाचे दर्शन आहे. परमात्मा पांडुरंग ज्ञानेश्वर ही माऊलीचे रूपे आहेत माऊली म्हणजे आई ची सर्व सोपे करून सांगते सर्वांवर जीवापाड प्रेम केले जाते जिच्या कुशीत विसावले की आराम मिळतो त्यामुळे अनुभवाच्या ज्ञानातून संत मार्गाने ईश्वर ईश्वराकडे जाता येते परमात्म्याच्या स्मरणाने आपल्याला हे साध्य करता येते असे भगवती बाई दांडेकर यांनी आपल्या प्रवचनांमधून सांगितले. .     विश्वशांती केंद्र माईर्स एम आय टी पुणे भारत चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या आशीर्वादान...

" आषाढी यात्रेमधील ही गर्दी पाहता कॅरिडॉर हा गरजेचा असून प्रदक्षना मार्ग व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी देखील कॅरिडॉर ची गरज "

इमेज
 पंढरपूर.... .   आज विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने एकादशीच्या दिवशी 25 ते 30 लाख लोकसंख्या ही पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत आहे. मंदिर परिसरामध्ये गर्दीने दाटीवाटी झालेली नेहमीप्रमाणे दिसत आहे. या भागांमधून कॅरिडॉर हा होणार आहे. मंदिर परिसरातील असंख्य घरे दुकाने हे बाधित होणार आहेत हे जरी सत्य असले तरी येत्या 25 ते 50 वर्षाच्या कालावधीमध्ये विठुरायाकडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही प्रत्येक वर्षी वाढत जाणार आहे. तरी पंढरपूर शहरातील जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो भला मोठा केला तरच भाविक भक्त हे या प्रदक्षिणा मार्गावर फिरू शकणार आहेत. अन्यथा पुन्हा या परिसरामध्ये गर्दीची दाटीवाटी आणि चेंगराचेंगरी ही उद्भवू शकते तरी शासनाने कॅरिडॉर प्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील देखील रस्ते डीपी अंतर्गत न घेता ते कॅरिडॉर मध्ये घेऊन रस्ते मोठे करण्याचे नियोजन केले तरच या गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. अन्यथा खूप मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते. .     काही वर्षांपूर्वी पंढरपूर शहरातील कॅरिडॉर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून होणार असल्याचे बोलले जात होते व...

. " शेतमाला ला योग्य भाव मिळावा ही विठूराया साकडं घालायला हवे होते".....सामान्य शेतकरीची मागणी..

इमेज
 पंढरपूर.... .   विठूरायाच्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने शासकिय पुजा राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या शुभहस्ते पार पडली.सोबत त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. .   यंदाच्या आषाढी यात्रेच्या महापुजाचा लाभ वारकरीभक्त बाबासाहेब माने सौ.प्रभावती माने याना झाला. .    यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या सोबत अन्य मान्यवर आणि मंदीर समितीचे अध्यक्ष गहणिनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. .   मुख्यमंत्री फडणवीस यानी विठूराया कडे साकडे घातले यंदा पाऊस भरपूर पडावा शेतकरी राजा सुखी समाधानी व्हावा.असे साकडे घातल्याचे फडणवीस यानी सागितले. .   राज्यातील तसेच संपूर्ण देशातील बळीराजा हा आपले शेतशिवार बहरुन यावा.धनधान्य भरपूर यावे देशातील सर्वसामान्य जनता सुखी व्हावा अशी अपेक्षा विठूरायाकडे मागतो.शेतीसाठी लागणारे बी बियाणे,खते स्वस्त व्हावे,शेतीमाला ला योग्य भाव मिळावा शेतकरी कर्जमुक्त व्हावा,आणि सुख समाधान आपल्या जीवनात यावे असे साकडे विठूराया ला घालतात. .   मुख्यमंत्री यानी भरपूर पाऊस पडावा.शेतकरी...

" ग्रामविकास व पंचायत राज विभाग वारकरी भावीक भक्तांच्या साठी सेवेसाठी सुरक्षे साठी सदैव तत्पर हजर"

इमेज
पंढरपूर... .  विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरी नगरीत येत असतात.या वारकरी बंधूभगिनी,वयोव्रृद्ध बालगोपाळ,हेआळदी ते पंढरपूर पायी चालत येतात.या भाविकाच्या सेवेसाठी महाराष्ट शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागा कडूनभक्ताच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येते.त्या निमित्ताने शासनाच्या वतीने विविध सुखदायक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. .   भाविकासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी,शौचालय,वैद्यकिय  मोफत केले जातात.भक्तासाठी राहण्याची प्रशस्त मोठे तंबू उभे केले जातात.अन्नदान केले जाते़. .  मुख्यमंत्री आरोग्य रथ,मोबाईल चार्जिग सुविधा,औषध उपचार,दिशा दर्शक फलक,अधुनिक औषधोपचाराची सुविधा,हजारोच्या संख्येने वैद्यकिय कर्मचारी,इत्यादी सुविधा ग्रामविकस विगाग पचायत राज विभागाच्यावतीने सोई उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  

" विठूरायाच्या भाविक भक्ताना पंढरपूर नगरपालिकाचे नम्र आवाहन"..…..मुख्याधिकारी

इमेज
 पंढरपूर..... .    विठूरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली वैकुठ नगर तीर्थक्षेत्र पंढरपूर या शहरात आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने येणार्या भाविक भक्ताचे पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत... .     वारकरी भाविकाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपालिके कडून नम्र आवाहन करण्यात येत आहे. .    भाविकानी आपला मुक्काम व राहण्याची सोय 65 एकर या परिसरामध्ये करण्यात आली आहे.कुणीही भाविकानी शहरातील धोकादायक घरे,मठ,इमारती मध्ये राहू नये,मुक्काम करु नये. .  उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये.शीळे अन्न खाऊ नये.बोरवेलचे पाणी पिऊ नये.नगरपालिकेने भाविकासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सर्वत्र केली आहे. .   भाविकानी कचरा घन कचरा,ओला कचरा हा घंटा गाडी मध्ये टाकावा.उघड्यावर कचरा टाकू नये. .     प्लस्टिक चा वापर करु नये तसेच शौचास उघड्यावर बसू नये नगरपालिकेने सुलभ शौचालय ठिकठिकाणी केले आहेत.त्याचा वापर करावा.किवा घरे,मठ याठिकाणी असलेल्या शौचालयाचा वापर करावा. .   एकादी अनुचित घटना घडल्यास तसेच सं...

" पंढरी नगरीमध्ये यात्रेनिमित्त येणारे भाविकाना सर्व सुविधा उपलब्ध केली जाणार"...... मुख्याधिकारी रोकडे.

इमेज
 पंढरपूर..... .        आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी पंढरपूर नगरपालिका ही सर्व सुख सोयी, सुविधा या उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रोकडे साहेब यांनी सांगितले. .     वारकरी भाविक भक्ताच्यासाठी पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने शहरामध्ये स्वछता,पिण्याच्या पाणीची सोय,दर्शनबारी मध्ये भाविकाना पाणी,तसेच सुलभ शौचालय याची सोय आणि आजारी रुग्णासाठी वैद्यकिय सुविधा उपलब्ध केलेली आहे. .    65 एकर या परिसरामध्ये असंख्य दिडी,पालखी या येतात.त्याच्यासाठी पिण्याचे पाणी,सुलभ शौचालय,आणि वीज,औषधे उपचाराची सोय करण्यात आली आहे. .     पंढरी नगरी मध्ये भाविकाना रस्त्ताची माहिती व्हावी म्हणून फलक लावण्यात आले आहे.कुठेही अतिक्रमण होऊ नये म्हणून अतिक्रमण विभाग दक्षता घेत आहे. .   चंद्रभागा नदी पात्रात स्वछता ही केली जात आहे.पंढरपूर शहर स्वछ आणि सुदर दिसावे म्हणून प्रयत्न केला जात आहे.चंद्रभागा नदी मध्ये महिला याच्यासाठी कपडे...

" वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यावतीने महाआरोग्य शिबिर आयोजित "

इमेज
 पंढरपूर.... .   विठुरायाच्या नगरीमध्ये लाखोच्या संख्येने विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर चालत येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी,त्याच्या आरोग्याची काळजी महाराष्टर शासन गेल्या काही वर्षापासून प्रत्येक यात्रेच्या काळामध्ये घेत असते.या महाआरोग्य शिबिराचा लाभ लाखोच्या संख्येनेभाविक भक्ताना होत आहे.विठूरायाचे वारकरी हे विठ्ठलाचे मुर्त स्वरुप म्हणून ओळखले जातात.असे भाविक भक्त आळदी ते पंढरपूर पायी चालत ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता ते विठूरायाच्या दर्शनासाठी,आपले सुखदुख विठूरायाला संगण्यासाठी वारकरी येतात. .   महाराष्ट शासन आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी यात्रा कालावधी मध्ये हजारोच्या संख्येने वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी,तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यंत्रना ही राबवली जात आहे.दिनाक24 ते 26 जुलै या काळात पंढरपूर येथील तीन रस्ता सोलापूर...बार्शी रोड या स्थळी महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे.तरी सर्व भाविक भक्तानी या आरोग्य शिबिराचा मोफत लाभ घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,आर...

" यात्रा कालावधी मध्ये दोन वेळेला पाणी पुरवठा करा" पंढरपूर करांची मागणी.....

इमेज
 पंढरपूर... .      पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भावी भक्त विठुरायाच्या नगरीमध्ये प्रवेश करीत आहेत आणि या वारकरी भावीक मठामधून  लॉजमधून त्याचप्रमाणे रहिवासी घरामधून हे भाविक भक्त राहत असतात या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची अत्यंत गरज असते परंतु पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रा च्या निमित्ताने सर्वत्र एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले की काय असे दिसून येत आहे कमीत कमी अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत या कालावधीमध्ये दोन वेळेस पंढरपूर नगरपालिकेने पाणीपुरवठा करावा अशी मागणी पंढरपूर शहरात राहणारे रहिवासी व भाविक भक्त करीत आहेत. .     पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन पंढरपूरकरांची यात्रा कालावधीमध्ये दोन वेळेच्या पाण्याची मागणी पूर्ण करेल काय?

" संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची बंधू भेट आज माळशिरस तालुक्यात झाली ".... पंढरपूर तालुक्याच्या दिशेने मार्गस़्त.....

इमेज
 पंढरपूर. .     आज आषाढ शुध्द अष्टमीला तोंडली येथील सोहळा आटपून तुफान काका व माऊली ज्ञानेश्वरांची बंधू भेट माळशिरस तालुक्यात हद्दीत झाली. .    माऊलींच्या पालखीचा विसावा टप्पा या ठिकाणी होत असतो त्याचवेळी संत सोपान काका यांच्या पालखीची व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्यातील हद्दीत झाली. सोपान काका व ज्ञानेश्वर माऊलींचे रथ शेजारी आल्यानंतर थोडा वेळ थांबतात यावेळी दोन्ही संस्थांच्या वतीने परस्परांना नारळ व प्रसाद भेट दिला जातो तत्पूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखीचे ठाकूर व समाधी येथे नेतृत्व रिंगण संपन्न झाले माऊलीचे पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर व समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदंग च्या जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. कुठे माऊलीची पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामास पोहोचले. .   यावेळी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुक्या प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे ग...

" नाही तमा ऊन वारा पाऊसाची . ओढ आम्हा विठूरायाची"... लाखोच्या संख्येनी वारकरी पंढरीत दाखल..

इमेज
 पंढरपूर.... .       आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत विठूरायाचा नगरीमध्ये दाखल होत आहे. .     संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अन्य राज्यांमधून लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत आहे आज पंढरपूरच्या दिशेने चोहोबाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर पावसाचे आगमन आज दिसून आले या पावसाच्या सरीमध्ये वारकरी भावी भक्त चिंब भिजत विठुरायाच्या ओढीने, विठुरायाच्या दर्शनासाठी व त्याच्याकडे आपली खुशाली सुखदुःख सांगण्यासाठी हे वारकरी भावीक भक्त पंढरपूर मध्ये दाखल होत आहे लहान थोर वयोवृद्ध भाविक भक्त पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत आहेत या सर्व भाविक भक्तांचे शिवाय न्यूज पंढरपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत

" कास्ता पाईप कंपनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरी नगरीत हजर "

इमेज
 पंढरपूर....     आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांना व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी यांना ऊन वारा पाऊस यापासून  बचाव होण्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून व कंपनीने तयार केलेले कास्ता पाईप कंपनीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना  रेनकोट चे वाटप करण्यात आले आणि त्याचप्रमाणे 15 फोटो बाय 50 या आकाराची चटई मंदिर समितीला भेट देण्यात आली . याशिवाय वारकरी भाविक भक्तांना प्रसाद वितरणासाठी 50000 उच्च प्रतीच्या प्रसाद पिशव्या तसेच वारकरी संप्रदायाच्या नित्यपटनातील महत्त्वाच्या ग्रंथ असलेल्या हरिपाठाच्या 75 हजार प्रति मंदिर समितीला भेट स्वरूपात देण्यात आल्या याशिवाय पोलीस शासकीय कर्मचारी पत्रकार यांनाही उच्च प्रतीचे रेनकोट वाटप करण्यात आले या साहित्याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना लाभ होणार असून यात्रेच्या व्यवस्थापनालाही यामुळे हातभार लागणार आहे कास्ता पाईप कंपनीकडून मार्केट हेड वैभव केळकर महाराष्ट्र सेल्स प्रमुख प्रद...

" महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये " शासनाच्या निधीचा योग्य तो वापर व्हावा.

इमेज
 पंढरपूर....      नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आषाढी यात्रे पूर्व नेहमीप्रमाणे पंढरपूर शहराला भेट दिली आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या असंख्य लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी सुखसुविसुविधा आरोग्य स्वच्छ पाणी निर्मल चंद्रभागा नगरी याकरिता पाच कोटी रुपये चा निधी काही मिनिटातच जाहीर केला यापूर्वी देखील पाच कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थ विकासासाठी दिलेला आहे आता दहा कोटी रुपये चा निधी या आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या असंख्य भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापर केला जाणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा अशी माफक अपेक्षा पंढरपूर रहिवासी आणि वारकरी संप्रदायांमधील असंख्य भाविक भक्त करीत आहे. महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये अशी मनोकामना पंढरपूर वाशी करीत आहे.      महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पंढरपूर येथे भेट दिली असता सर्व ठिकाणी जाऊन वारकरी भाविक भक्तांचे साठी कुठल्या...

" आजी-माजी नेते मंडळींनी लोकांच्या हाताला काम न दिल्यामुळे लोकांना अतिक्रमण करून व्यवसाय करण्याशिवाय पर्याय राहिला नाही "..... दिगंबर सुडके उपाध्यक्ष जिल्हा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस

इमेज
 पंढरपूर.....      नुकतीच आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण व फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्याचे नगरपालिका यांनी मोहीम राबवली आहे यामध्ये 30 ते 40 वर्ष बारीक सारीक खोके टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे असंख्य छोटे मोठे व्यापारी हे आज देशोधडीला लागले याची चित्र पंढरपूर शहरात सर्वत्र दिसून येत आहे. जगण्याचे साधनच पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केल्यामुळे या लोकांच्या मध्ये प्रचंड संताप व नैराश्य भरून राहिले आहे.       पंढरपूर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते मंडळींनी फक्त लोकांना औद्योगिक वसाहतीचे गाजर दाखवून आपली आमदारकी साजरी करत आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील लोकांना हाताला रोजगार नसल्यामुळे आणि पंढरपूर शहरांमध्ये भरणाऱ्या चार यात्रेच्या जीवावर आपला प्रपंच ते कसाबसा करीत आहेत. कुठलीही एमआयडीसी नाही किंवा कुठलाही मोठा उद्योग या परिसरामध्ये नसल्यामुळे चार वारी च्या नंतर लोकांना जगण्याचे काही साधन नसते म्हणून ते नगरपालिकेच्या जागेमध्ये उपजीविकेचे साधन म्हणून लहान सांन खोकी टाकू...

" कॅरीडोर बाधितांनी आता काळे झेंडे दाखवून उपयोग काय?"....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). नुकतेच पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांनी पंढरपूर येथे होणाऱ्या नवीन विकास आराखड्याला विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने येत्या आषाढी यात्रेच्या वेळी दशमी ते एकादशी च्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित भागामध्ये असलेले रहिवाशी व व्यापारी यांनी निषेध व्यक्त करण्याच्या उद्देशाने या परिसरातील दुकाने व घरे हे बंद ठेवली जाणार आहेत त्याचप्रमाणे काळे झेंडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्याची तयारी केली आहे असे असे संभाव्य बाधितांच्या वतीने बाबा महाराज बडवे महाजन यांनी सांगितले.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित व्यापारी व रहिवाशांना विश्वासात न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करीत त्यांनी दशक्रिया एकादशी या दिवशी मुख्यमंत्री हे महापूजेला येणार आहेत त्यावेळी  काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी कॅरिडॉर बाधित असंख्य रहिवासी व व्यापारी वर्ग उपस्थित होते.       गेल्या तीन-चार वर्षापासून  "शिवाई "न्यूज पंढरपूर ...

" ज्या रस्त्यावर वहातुक जास्त तेच रस्ते डी.पी.रस्त्या अंतर्गत का नाही?.. हा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर तीर्थ विकास आराखडा अंतर्गत कॅरीडोर योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. पंढरपूर शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन यांनी पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या करोडोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आणि त्यांचा पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामधील वावर हा सुखकर व्हावा म्हणून कॅरिडॉर ही संकल्पना कार्यान्वित करण्याचे योजले आहे. यासाठी 4000 कोटी रुपये  शासनाने मंजूर केले आहेत.    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर  च्या आजूबाजू चा परिसर हा मोकळा करून भाविकांसाठी त्यांचा वावर या परिसरामध्ये सुटसुटीत व्हावा,मोकळा व्हावा त्यांना कुठलीही अडचणी येऊ नये म्हणून या परिसरामधील कित्येक घरे व दुकाने कॅरीडोर बाधित ठरवून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले आहे. या कॅरिडॉर सोबतच पंढरपूर शहराला जोडणारे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात येणारे अंतर्गत रस्ते हे डीपी रस्त्या अंतर्गत मोठे करण्याचे नियोजन शासनाने योजले आहे. हे रस्ते 12 ते 18 मीटर या रुंदीचे असणार असू...

" डीपी रस्ता मध्ये जाणाऱ्या बाधितांना कॅरिडोर प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार का?"...... पंढरपूर वासियांना पडलेला प्रश्न.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतीच पंढरपूर विकास आराखड्यामध्ये कॅरीडोर या संकल्पनेला चालना मिळणार असे नुकतेच जाहीर झालेले आहे हजारो कोटी रुपये खर्च करून पंढरपूर या ठिकाणी येणाऱ्या विठुरायांच्या भाविक भक्तांच्या सुख सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे वारी कालावधीमध्ये होणारी अडचण ही आता या कॅरिडॉर च्या माध्यमातून  दूर केली जाणार आहे.      कॅरिडॉर अंतर्गत येणाऱ्या असंख्य बाधितांना चाळीस हजार ते वीस हजार रुपये पर्यंतचा चौरस फुटाचा दर मिळणार असे चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे. कॅरीडोर बाधितांप्रमाणेच पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्ते हे डीपी रस्त्याच्या अंतर्गत 12 ते 18 मीटर या रुंदीचे होणार असे जाहीर झालेले आहे पंढरपूर शहरातील एकूण 22 रस्ते जे रस्ते विठ्ठलाच्या मंदिराचे दिशेने येतील असे असून या रस्त्यामध्ये येणारे असंख्य इमारती घरे दुकाने हे बाधित होणार आहेत या बाधितांना महाराष्ट्र शासन नुकसान भरपाई म्हणून काय मोबदला देणार हे अद्यापही जाहीर झालेले नाही. ज्या लोकांची घरे इमारती दुकाने ही जाणार आहेत या सर्वांची चिंता आता वाढलेली आहे या डीपी र...

" मराठी पत्रकार संघ" पंढरपूर यांच्या वतीने पत्रकारांसाठी मोफत अपघाती विमा योजना " अधिक्षक डाक घर पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे बहुमोल सहकार्य...

इमेज
 पंढरपूर.( प्रतिनिधी). रोज बाबतीत अनिश्चितता आणि असुरक्षितता त्याचप्रमाणे तुटपुंजे मानधन यातच आपलं कुटुंब यांचा उदरनिर्वाह असे दे भर वर्षाचे जीवन लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारांची आहे हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.      बातम्यांच्या माध्यमातून सतत होणाऱ्या राजकीय सामाजिक घडामोडी कडे लक्ष देत बातमीचा शोध घेत आपले जीवनमान घोषित करणारे हे पत्रकार काही वेळा त्यांना संरक्षणाची देखील गरज भासते त्यांच्यावर असंख्य ठिकाणी हल्ले झालेले आहेत हे आपण दररोजच पाहत आहोत अशा पत्रकारांना येण्याचे कवच लाभावे म्हणून मराठी पत्रकार संघ यांचे संस्थापक अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचीव हरिभाऊ प्रक्षाळे यांचा अथक प्रयत्नातून मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना बजाज विमा कंपनीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण हे डाकघर पंढरपूर विभाग यांच्या सहकार्याने सर्व पत्रकारांचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून त्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मधील विविध योजना या कशा व कोणत्या आहेत याचा लाभ सर्वसामान्य जनतेला व पत्रकार ...

" आमदार समाधान दादा अवताडे यांनी मागणी केली आणि ती त्वरित पूर्ण झाली " पावसाचे वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेला सोडले.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याला अद्यापही पावसाने ओढ दिल्यामुळे या तालुक्यामध्ये व पंढरपूर तालुक्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी कृष्णा पंचगंगा नदीचे पावसाचे बोराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सोडून मंगळवेढा तालुक्याचे जल संकट दूर करणे बाबत आमदार अवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली होती त्या मागणीची दखल घेऊन म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोडले असून याचा मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाला मोठा फायदा होणार आहे.      या निवेदनामध्ये आमदारा उतारे यांनी मागणी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आगामी दिवसात पावसाचा जोर वाढल्यास सदर नदीपात्रात पूर महापौर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अध्यापिक पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी करण्यासा...

"नदीकाठच्या शेतीपंपासाठी आठ तास वीज द्या..... सीना माढा उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करावी.".... आमदार अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आज महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनामध्ये माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सेना माढा उपसा सिंचन योजना ही त्वरित सुरू करून 169 तलावे भरावेत आणि त्याच प्रमाणे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या पंपासाठी आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यांनी आपल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देऊन ही मागणी केली.        माढा तालुक्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणाच्या बोगद्यामधून सीना नदीत तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी करण्यात आली या दोन्ही मागण्यांची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.         यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन माढा तालुक्यातील पाणी प्रश्न बाबत सविस्तर चर्चा केली सीना माढा योजना सिंचन योजना स्वरूप कार्यान्वित करून 169 तलाव भरण...

" पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभाग कायमस्वरूपी कार्यरत राहणार की.... फिर वही दिल लाया हु "

इमेज
 पढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभर ओळखले जाते पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो करोडो च्या संख्येने भावीक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यांना मूलभूत सुविधा व सुख सोयी या मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र शासन पंढरपूर या ठिकाणी कॅरीडोर ची संकल्पना राबवत आहे. वाराणसी व उज्जैन या तीर्थस्थळाच्या धर्तीवर पंढरपूर शहराचे कॅरीडोरचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे. त्यासाठी चार हजार 150 करोड रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. मंदिर परिसरामध्ये होणारी दाटी वाटी आणि भाविक भक्तांना मार्गक्रमण करताना येणाऱ्या असंख्य अडचणी या जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाने हा परिसर कॅरिडॉर च्या नावाखाली मोठा करण्यात येणार आहे. या परिसरातील शेकडोच्या संख्येने घरे दुकाने हे बाधित होणार आहेत.    मंदिर व अन्य ठिकाणी अतिक्रमणचे प्रमाण जास्त दिसून येते पंढरपूर शहरात प्रवेश करताच सर्वत्र अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी असून देखील त्या फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे दुकाने मांडण्याचे दिसून येत आहे हे पंढरपूर नगरपालि...