" भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे.पंढरपूराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही." पालकमंत्री जयकुमार गोरे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) भाजपा हा पक्ष संपूर्ण देशामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्र राज्यात व दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आहे. या कल्याणकारी सत्तेच्या माध्यमातून हे सरकार पंढरपूर शहरात चा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. असे आज रोजी पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी प्रचार फेरीचा शुभारंभ करते समय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपले मनोगत सर्व सामान्य जनतेच्या समोर व्यक्त केले.

     आज भाजप या पक्षाच्या प्रचारफेरीच्या वेळी पंढरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शामल लक्ष्मण शिरसट माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसाट, विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक व  पंढरपूर शहरांमधील अठरा प्रभागांमधील भाजपाचे 36 नगरसेवक पदाचे उमेदवार व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

      पंढरपूर शहर हे तीर्थ क्षेत्र शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये लाखोच्या संख्येने भावीक भक्त येतात. त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी पंढरपूर शहराचा संपूर्ण कायापालट आणि सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने केले आहे.

    स्वार्थासाठी असंख्य पक्ष बदलणारे विरोधक आज पंढरपूर शहराचा विकास करू असे म्हणू लागले आहे. परंतु काय विकास करणार आहे हे ते सांगत नाहीत. विकासाचे व्हिजन विरोधकांच्या समोर नाही. विकासाचे नियोजन त्यांच्याजवळ नाही. असे विरोधक आज निवडणूक लढू लागले आहेत. कोणतेही विकासाचे नियोजन नसलेले विरोधक नगराध्यक्ष पद व नगरसेवकांची निवडणूक लढवीत आहे. 

    भाजपा पक्षाकडे विकास कामाचे नियोजन आहे. महाराष्ट्रात व देशात सरकार भाजपाचे असल्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. विकास कामासाठी निधी हा भरपूर आणला जाणार आहे. पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास या विकास कामाच्या निधीच्या माध्यमातून होणार आहे. तरी सर्वसामान्य जनतेने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामल ताई लक्ष्मण शिरसाट व त्यांचे सहकारी उमेदवार या सर्वांना आपण बहुमोल मताने निवडून द्यावे. असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये सर्वसामान्य जनतेला केले .

    पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे आणि विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे दोघे पंढरपूरचा विकास करणार आहे. भाजपा सरकार सर्वतोपरी या विकास कामाला मदत करणार आहे. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यावर प्रेम करणारा पंढरपूर शहरातील मतदार भाजपाचाच नगराध्यक्ष निवडणार आहे. असेही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले. 

      पंढरपूर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ५ ( अ) मधील महिला उमेदवार सौ कुसुमताई जगन्नाथ परचंडे या भाजपाच्या महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पंढरपूर शहरामध्ये होत असलेल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने विजयाचे खाते उघडले आहे. सुरुवात तर चांगली झालेली आहे या निवडणुकीमध्ये भाजपा या पक्षाला सर्वसामान्य जनता भरघोस मताने निवडून देणार आहे. असा ठाम विश्वास विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणामध्ये ते म्हणाले. 

संपूर्ण पंढरपूर शहरांमध्ये भाजपा या पक्षाने काढलेली प्रचार फेरीची मिरवणूक चर्चेची ठरू लागलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "