" अजात शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशीला ताई जगताप या वाखरी जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवणार"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) एक महिला शिक्षित झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करून सोडते त्याचप्रमाणे संपूर्ण गावाला शिक्षणाचे महत्त्व ,मूलभूत गरजा तसेच लोक कल्याणाचे विविध उपक्रम शासनाकडून कसे राबवावेत याचा अनुभव असलेले वाखरी ग्रामपंचायतच्या माजी महिला सरपंच म्हणून 2000 ते 2005 या कालावधीमध्ये सरपंच पद भूषवून संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पार पाडला गावामध्ये विविध विकासाची गंगा आणण्याचे काम सुशीलाताई जगताप यांनी केले आहे. या कार्याच्या जोरावर त्या वाखरी या गटामधून जिल्हा परिषद ची निवडणूक ही सर्वसाधारण महिला ंसाठी असल्यामुळे त्या या वाखरी गटामधून जिल्हा परिषद सदस्य च्या निवडणुकीसाठी त्या प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. 

    पंढरपूर तालुक्यातील संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान मध्ये ग्रामपंचायतीला तालुक्यात सतत पाच वर्षे प्रथम क्रमांक मिळवून दिला तसेच बीमा ग्राम योजनेत प्रत्येक कुटुंबाला विमा देण्याचे काम केले. पंढरपूर येथे आधार महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून त्या पतसंस्थेच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करणे लघुउद्योगास शासकीय योजना मिळवून देणे यासारखे असंख्य कामे त्यांनी केली आहेत. 

   गत निवडणुकीमध्ये गुरसाळे जिल्हा परिषद गटामधून त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना फक्त 140 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी असलेली सर्व गावे चालू जिल्हा परिषद गटात असून फक्त पटवर्धन कुरोली गणाचा समावेश झालेला आहे. साहजिकच जनसंपर्क व केलेली कामे या जमेच्या बाजू असल्यामुळे त्या वाखरी पंचक्रोशी मध्ये अजात शत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना सर्व स्तरातून निवडणुकीसाठी पाठिंबा मिळत आहे. सुशीला ताई जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या त्या कार्यकर्त्या असून आमदार अभिजीत आबा पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सुशीला ताई जगताप यांचे मुले सून हे सर्व उच्चशिक्षित असून यांच्या शिक्षणाचा लाभ पंचक्रोशीतील लोक घेतात. 

    सुशीला ताई जगताप यांच्या कार्याचा अनुभव संपूर्ण वाखरी गटाला असल्यामुळे या गटामधील सर्व महिलांची एकमेव पसंत म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून महिला गटामधून त्यांच्या नावाला पसंती व पाठिंबा मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "