" भगीरथ भालके यांनी परिचारक गटा सोबत न जाणेच योग्य" .......
पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यातील अडीच तीन वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद ,ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका या निवडणुकांमधून विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी इच्छुक उमेदवार हे आपापल्या परीने आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न आता सुरू झाल्याचा दिसून येत आहे. मध्यंतरी भालके गट तसेच परिचारक गट मिळून मंगळवेढा साखर कारखान्याची निवडणूकीत युती करुन यश मिळवले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये काँग्रेस आय च्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली एक लाखाच्या पुढे मतदान मिळवले .परंतु काही ठिकाणी भालके नियोजनामध्ये कमी पडल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भगीरथ भालके हे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. भालके गटाला मानणारा अजूनही मतदार या पंढरपूर शहरांमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिती ताई भालके यांनी आपली उमेदवारी जाहीर...