"मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या पत्नी सौ.माधुरी दिलिप धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून प्रचारात घेतली आघाडी "
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 अ आणि 17 ब यामध्ये लोकेश नागेश यादव आणि सौ माधुरी दिलीप धोत्रे या तीर्थविकास आघाडीच्या उमेदवार असून या दोन्ही उमेदवाराने प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सद्यस्थितीला या प्रभागामध्ये दिसून येत आहे.
सौ माधुरी दिलीप धोत्रे याच प्रभागामधील कन्या असल्यामुळे या प्रभागामध्ये सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ माता भगिनी ,वडीलधारी मंडळी हे सौ माधुरी दिलीप धोत्रे यांना आपल्या मुलीप्रमाणे ,लेकीप्रमाणे मानतात. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 17 मध्ये त्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारच अशी ग्वाही या परिसरातील सर्वसामान्य मतदार बंधू देत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे या प्रभागामधील सर्वसामान्य जनतेशी ऋणानुबंधाची नाळ जोडली गेलेली आहे. या प्रभागामधून आपल्या पत्नी सौ माधुरी दिलीप धोत्रे यांना तीर्थ विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून त्या उभे आहेत. त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक नागेश यादव यांचे चिरंजीव लोकेश नागेश यादव हे देखील त्यांच्यासोबत उमेदवार आहेत . या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत. या सर्व भागात विविध जाती धर्मातील लोकांच्या मध्ये सौ माधुरी दिलीप धोत्रे आणि लोकेश नागेश यादव हे दोन्ही उमेदवार लोकप्रिय असून त्यांना या प्रभागांमध्ये प्रचाराच्या दौऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद सर्वत्र दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा