पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"पाच वर्षांतून पहिल्यांदाच जनतेला शुभेच्छा मिळू लागल्या" भावी खासदारांना आताच कसा उमाळा येऊ लागला.?

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील पंचवार्षिक निवडणूक या जाहीर झाल्या आहेत .या निवडणुका जाहीर झाल्यापासून आजी-माजी आणि भावी खासदारांना जनतेची आठवण येऊ लागली आहे. जनतेच्या कामाची गोडी लागल्याने गल्लीतून दिल्लीत गेलेल्या लोकप्रतिनिधीला पाच वर्षातून एकदा तरी जनतेची आठवण ही यायलाच पाहिजे. एरवी वर्षातून, सहा महिन्यातून एकदा आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन विकास कामे सुरू केल्याची माहिती सांगून जनतेला आपण विकास कामे करीत आहोत. याची आवर्जून आठवण करून देत. पुन्हा गल्लीतून दिल्लीत जाणारे हे लोकप्रतिनिधी यंदाच्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीचे तारीख जाहीर झाल्यापासून देशभर आजी-माजी  आणि इच्छुक भावी खासदार,आजी माजी खासदार जनतेच्या भेटीसाठी आता गावोगाव फिरत असल्याचे दिसून येत आहेत .या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांनी एक गोष्ट मात्र विसरलेली नाही. ती गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा उत्सव प्रेमी आहे. सणवार साजरे करणारा आहे. या उत्सवाचे निमित्त साधून सणाचे निमित्त साधून या मतदार बंधू-भगिनींना आपल्या शुभेच्छा या फोन द्वारे पोहोचवण्याचे देण्याचे काम आता हे आजी-माजी आणि भावी खास...

"मतदारसंघातील विकासकामांच्यावर न बोलता उमेदवार एकमेकांची उणीधुणी काढू लागली."

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या या दोन जागा असून माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ हा अराखीव असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे, या  मतदारसंघांमधील उमेदवार भाजपाचे राम सातपुते त्याचप्रमाणे आय काँग्रेसचे आमदार प्रणिती ताई शिंदे या दोघांची उमेदवारी त्या त्या पक्षाने जाहीर केलेली असून सध्या ते दोघेही उमेदवार आपापल्या लोकसभा मतदारसंघांमधून गाव भेटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचे ते प्रयत्नात आहेत.     त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे असून अन्य पक्षाकडून अद्यापही उमेदवारी ही जाहीर झालेली नसल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्या मतदारसंघांमध्ये गावभेटीच्या माध्यमातून जनतेचा कौल घेण्यासाठी गाव भेट करीत आहे. या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील हे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे ते सध्या सबुरीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.         ...

"मी केलेली विकासकामे कार्यकर्ते नी जनतेला सांगावी" रणजितसिंह नाईक निंबाळकर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) भाजपाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी आपल्या या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मी केलेल्या विकास कामाची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. असे आज सांगोला येथे भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज सांगोला येथे कार्यकर्त्यांच्या मेळावा मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.      सांगोल्याचा पाणी प्रश्न व त्यासाठी लागणारा निधी आम्ही दिलेला आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. सांगोला तालुक्यामधून मला भरघोस मतदान मिळणार आहे. याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिल्यामुळे या परिसरातून मला भरपूर मताधिक्य मिळणार आहे.     सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी देशांमध्ये सर्वात जास्त विकास कामे केल्याची त्यांनी माहिती सांगितली. अशा या विकास कामे करणाऱ्या उमेदवाराला सांगोला तालुक्यातील जनता ही कदापि विसरणार नाही. असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.   ...

"सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे गेली दहा वर्षे रखडली" राम सातपुते.

 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे ही गेली दहा वर्षे रखडली गेली आहेत.याला जबाबदार प्रणिती शिंदे यांचे कुटुंब आहे.असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांनी पंढरपूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.          श्रीविठ्ठल रुक्मिणी चे आशिर्वाद घेण्यासाठी प्रथमच पंढरपूर येथे आले असता पांडुरंगाच्या चरणी त्यांनी आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी खासदार म्हणून निवडून द्यावे.अशी प्रार्थना त्यांनी केली.        मी या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे.असा आत्मविश्वास व्यक्त केला.पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जावे.  पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार आहोत.असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.देशाच्या विकासासाठी मोदींना पुन्हा एकदा जनतेनी निवडून द्यावे.असे आव्हान केले.      राम सातपुते यांच्या सोबत पंढरपूर शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवारांनी "सहजपणे" सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा धोक्यात आणल्या.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारकीच्या जागेच्या उमेदवारीसाठी भाजपामध्ये उमेदवार कोणता द्यायचा यावरून वादंग उठलेले होते. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार हा स्थानिक द्यायचा की उपरा द्यायचा यावरून वादंग उठलेले होते. स्थानिक उमेदवार भाजपाने न देता उपरा असाच उमेदवार राम सातपुते यांच्या रूपाने देण्यात आला आहे.           सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक भाजपाचे उमेदवार कित्येक असताना देखील त्यांना डावलण्यात आले. याचे शल्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी द्या म्हणून त्यांच्या मागणी होती. परंतु उमेदवारी कोणाला द्यायची या वादामध्येच कितीतरी दिवस गेले. आणि त्या कालावधीमध्ये आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपण आय काँग्रेसचे उमेदवार आहोत म्हणून मतदारसंघाचा फेरफटका देखील केला. या त्यांच्या ग...

"मोहिते पाटील यांना कार्यकर्ते चे ऐकावे लागले " तुतारी हाती घ्यावी लागली"

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ मधून भाजपाचे उमेदवार रंजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून अकलूजचे मोहिते पाटील हे नाराज झालेले होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचे म्हणावे तसे जमत नव्हते. मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहोत असे सांगून देखील त्यांना भाजपा कडून डावलण्यात आले. मोहिते पाटील यांच्या मताधिक्यामुळेच भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते.      भाजपने दिलेली माढा लोकसभा मतदारसंघातील हा उमेदवार बदला म्हणून सांगत होते. परंतु भाजपाने त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली.      पंढरपूरचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक पक्षाचे क्लस्टर हेड म्हणून कार्य करत होते. परंतु मोहिते पाटील यांचे समजूत काढण्यासाठी ते असमर्थ ठरले. हेच दिसून आले. मोहिते पाटील गटाचे बाळदादा मोहिते पाटील यांनी जाहीरप...

" सातपुुते उमेदवार " उपरा" आता फिरावं लागलं कानाकोपरा" शिवसेना ( शिंदे गट) कार्यकर्तेंचे ऐकावे लागणार

पंढरपूर ( प्रतिनिधी) उमेदवारी याला द्यायची का त्याला द्यायची या वादा नंतर अखेर भाजपाचा उमेदवार ठरला. राम सातपुते हे भाजपाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.      राम सातपुते सध्या ते माळशिरस विधानसभा चे आमदार असून त्यांची सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधील जनतेचे म्हणणं असे आहे. की आता आम्हाला उपरा उमेदवार नको आहे. आणि उमेदवार हा स्थानिक हवा म्हणून असा सध्या हट्ट धरला जात आहे. काँग्रेसच्या प्रणिती ताई शिंदे या स्थानिक उमेदवार आहेत. त्यांच्याच विरोधात आता भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी देऊन सोलापूर जनतेला उपरा उमेदवार देण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराला आता महा युतीतील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट,या  पक्षा तील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आता लोकसभेच्या प्रचार करावा लागणार आहे.      पंढरपूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले हे शिवसेना शिंदे गट शहर प्...

"मतदानाच्या दिवशी आम्ही मतपेटीतून आमचे म्हणणे सांगू"....माढा मतदार संघातील युवकांचे मनोगत

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक ही जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर विभागातील कौठाळी, लक्ष्मी टाकळी,आढीव,रोपळे,गुरसाळे, बाभुळगाव, गोपाळपूर अशा गावांमधून जनमत घेण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या गावातील युवकांचे मनोगत ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या मनामध्ये या निवडणूक विषयीची प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे व्यक्त झाल्या आहेत.      या युवकांच्या मनामध्ये सत्ताधारी असलेल्या सरकारवर प्रचंड नाराजीचा सूर हा ऐकायला मिळत होता. शेतकऱ्यांची मुलं हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. उच्च शिक्षण असून देखील त्यांना नोकरी नसल्यामुळे आपल्या गावांमधील आपल्या शेतामध्ये ते सध्या राबत आहेत. शेती हा पारंपारिक व्यवसाय असला तरी या शेतीच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे बी, बियाणे, खते ही प्रचंड महाग झाल्यामुळे शेतकरी राजाला शेती करणे देखील अवघड झालेले आहे. त्याचप्रमाणे या मतदार संघामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून देतो, म्हणून हे नेते प्रत्येक निवडणूकीला ते आश्वासन देतात. आणि एकदा निवडू...

"मराठा आरक्षण आंदोलनकर्ते च्या आडून भाजपा विरोध करीत आहे." प्रणिती ताई शिंदे.

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी)  मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांच्या आडून भाजपाचे कार्यकर्ते मला गाव भेटीच्या दौऱ्यामध्ये विरुद्ध दर्शवित आहेत. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज सांगितले.       सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पासून आमदार प्रणिती ताई शिंदे या आय काँग्रेसच्या वतीने उमेदवार म्हणून ते गाव भेटीचा दौरा सध्या ते करीत आहेत. त्यांना मंगळवेढा भागातून त्याचप्रमाणे पंढरपूर परिसरातील कवठाळी सरकोली गोपाळपूर दोन-तीन ठिकाणी त्यांना मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांनी गाव भेटीसाठी विरोध दर्शवला होता. या संदर्भात अभिजीत पाटील यांनी व प्रणिती ताई शिंदे यांनी आंदोलन करण्याची समजूत काढून शांत केले.     आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी हे आंदोलन कर्ते मराठा आरक्षण च्या आडून भाजपाचे हे कार्यकर्ते मला विरोध दर्शवीत आहेत. कारण भाजपाचा उमेदवार या भागातून अद्यापही या लोकसभेसाठी जाहीर झालेला नाही. भाजपाने या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणतेच विकास कामे न केल्यामुळे आणि भाजपाचा उम...

"मोहिते पाटील यांची समजूत काढणार " .... रणजीत सिंह नाईक निंबाळकर

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर आज रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि प्रशांत परिचारक यांच्या बंद खोलीतील चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.     ते पुढे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी ची विकासकामे केली आहे.देशामध्ये आपल्या माढा मतदार संघातील कामे ही देशातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे.म्हणून सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन एकजूटीने  भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे.    माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या मोहिते पाटील गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाकडून इच्छुक  उमेदवार म्हणून त्यांची भाजपाकडे उमेदवारीची मागणी होती. परंतु ती मागणी पूर्ण न होता, सदरहू माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते कुटुंब नाराज झाल्याचे सध्या तरी चित्र दिसून येत आहे. या मोहिते पाटील यांच्या नार...

"ईडी च्या भीतीने सोलापूर जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत". प्रणिती ताई शिंदे

इमेज
 प़ंढरपूर  (प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून मी उमेदवारी मिळवली असून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील असंख्य अडीअडचणी या सोडवण्यासाठी, त्याचप्रमाणे शेतकरी व त्यांचे शेतमालाला सध्या भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळवून देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यामधील रखडलेली विकास कामे ही पूर्णत्वास नेण्यासाठी मला आपल्या सहकारी ची गरज आहे. सध्या देशामध्ये वाढलेली महागाई त्याचप्रमाणे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारे वातावरण, दलित पद दलितांच्या वर अन्याय होत आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला आपल्या मदतीची गरज आहे. असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील शिरढोण या गावी व्यक्त केले.      गेली 25 वर्ष भाजपाने या सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्याचप्रमाणे काँग्रेसला फक्त 15 वर्ष प्रतिनिधित्व करण्यास मिळाले. काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये केलेली विकासकामेची श्रेय हे भाजपा घेत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या या मतदार संघाच्या विकासकामासाठी कधीही संसदेमध्ये आवाज न उठवणारे हे मौन बाळगून असलेले भाजपाचे ...

सोलापूर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (अ.जा) पंढरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम घोषित.

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोलापूर राखीव मतदार संघ अंतर्गत पंढरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. तो पुढील प्रमाणे १) उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 12 एप्रिल 2024 पासून सुरू तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2020 अशी असून उमेदवारी अर्ज काढून घेण्याची तारीख 22 एप्रिल 2024 अशी असून त्याचप्रमाणे मतदानाची तारीख सात मे 2024 अशी आहे. मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी होणार आहे.       प्रांताधिकारी सचिन इथापे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया विषयी माहिती दिली. त्यांच्यासोबत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे त्याचप्रमाणे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी मदन जाधव हे उपस्थित होते.         252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पुरुष मतदार एक लाख 83 हजार 292 आणि स्त्री मतदार एक लाख 71 हजार 823 इतर मतदार 23 असे एकूण तीन लाख 55 हजार 138 एवढे मतदार व 555 सैनिक मतदार आहेत. या मतदारसंघांमध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदार 6,147 असून 20 ते 29...

माढा आणि सोलापूर भाजपाच्या दोन्ही जागा धोक्यात?

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी ) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांसाठी सध्यातरी धोका होण्याचे संकेत मिळत असल्याचे दिसून येत आहे.माढा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे.परंतू या मतदारसंघातील भाजपाचे नेते मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साठी उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते.परंतू पुन्हा एकदा भाजपाने खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेली.     मोहिते पाटील यांच्या गटाशी गेली.तीन,चार वर्षांत सुसंवाद राहिलेला नाही.त्यामुळे आणि या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचे वर्चस्व अद्यापही असल्यामुळे त्यांनी भाजपा कडे उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते.परंतू त्यांच्या गटाला ऩाकारण्यात आले.सद्या मोहिते पाटील यांना मानणारे लाखोच्या संख्येने मतदार असल्यामुळे त्याचप्रमाणे त्यांची या मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावांमधून कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या कार्यकर्त्यांच्या मधून मोहिते पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी किंवा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीक...

"उद्या ची लोकसभा निवडणूक ही लोकशाही तील शेवटची निवडणूक असेल " तरी मतदारांनी विचार करून मतदान करावे...... सुशील कुमार शिंदे

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या देशाला अधोगतीला नेण्याचे काम करणारे हे भाजप सरकार आहे. हे सरकार फक्त आश्वासन देत राहते. काँग्रेसच्या राजवटीमध्ये केलेल्या विकास कामाचे श्रेय हे भाजप सरकार आज घेत आहे.  सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या सरकारने एनटीपीसी हा प्रकल्प आणला त्याचप्रमाणे तिन्ही राज्याला जोडणारे महामार्ग काँग्रेसच्या राजवटीमध्ये तयार करण्यात आले. परंतु या प्रकल्पाचे श्रेय हे आज भाजपा सरकार घेत आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेले विकास कामे यांची  आज भाजपा उद्घाटन करून श्रेय घेत आहे.      सर्वधर्मसमभाव मानणारी आपली राज्य प्रणाली असून देखील आज देशांमध्ये जाती-जातीमध्ये, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. हे आपल्या देशाच्या हिताचे नाही. आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारीआहे. ही परंपरा कायम राखायची आहे. उद्याची निवडणूक ही लोकशाहीतील शेवटची निवडणूक असेल. तरी जनतेने विचार करून मतदान करावे. या येत्या निवडणुकीनंतर भाजपा विजयी झाले तर लोकशाही जाऊन हुकूमशाही येईल. असे मनोगत केंद्रीय माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांन...

"शरद पवारांनी काय केले असे विचारणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे " अभिजीत आबा पाटील

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) शरद पवारांनी आजपर्यंत आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रा साठी तसेच शेतकऱ्यांच्या साठी काय केले?असे आजचा तरुण विचारत आहे.परंतू या तरुणाला हे माहित नाही. तो ज्या आयटी पार्क मध्ये भल्या मोठ्या पगारावर काम करतो .ती हिंजवडी येथील आयटी पार्क या शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये उभी राहिलेली आहे. ऊस कारखाने संपूर्ण महाराष्ट्रभर उभे करून त्यांना अर्थसहाय्य पुरवठा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून उसाच्या पिकाकडे शरद पवारांनी वळवले या उसाच्या बिलामधूनच या आजच्या तरुणांच्या मोबाईलचे रिचार्ज भरले जाते. हे तो तरुण विसरलेला आहे.     शरद पवार यांनी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण उभे करून या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना पाण्याच्या माध्यमातून प्रगतशील केलेले आहे. हे कोणीही विसरू शकणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी या शरद पवारांनी केलेली आहे. हे या आजच्या तरुणाला माहिती नसावं. राज्यातील कोरडवाहू जमिनीच्या मध्ये ठिबक सिंचनाच्या द्वारे फळभागाची लागवड करावी. म्हणून प्रोत्साहन देणारे हेच ते शरद पवार या फळबागाच्य...

पंढरपूर येथे काँग्रेस व इंडिया आघाडी च्या वतीने आज संकल्प सभेचे आयोजन

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने आज रोजी पंढरपूर येथे "हाती हात धरू संकल्प विजयाचा करू" यानुसार संकल्प सभा व शोध पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन शिबिर पंढरपूर येथे आयोजित केले आहे. श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड या ठिकाणी दुपारी दोन वाजता ही संकल्प सभा होणार असून या संकल्प सभेला सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश यलगुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश यल गुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश यलगुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा होणार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश शिरगुलवार व इंडिया आघाडीचे स...

"सोलापूर लोकसभा उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे या जनसंपर्का मध्ये अग्रेसर"

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 2024 ची मध्यवर्ती निवडणूक या जाहीर झालेल्या असून सध्या आय काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे नाव सर्वात जास्त चर्चिले जात असून या सोलापूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून या लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.      आय काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती ताई शिंदे या लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील गाव भेटींना प्रारंभ केलेला आहे. या त्यांच्या गाव भेटीला संपूर्ण मतदारसंघांमधून चांगला प्रतिसाद मिळून असल्याचे दिसून येत आहे. आज कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा निश्चित जाहीर झालेला नसून देखील उमेदवारी आपल्यालाच मिळेल या खात्रीने आमदार प्रणिती ताई शिंदे या प्रचार दौऱ्यामध्ये गाव भेटीच्या माध्यमातून ते मतदार संघातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.      भाजपा या पक्षाचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नसल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल. या संभ्रमा ...

"कोणत्याही क्षणी बाजू पलटून टाकणारा खेळ म्हणजे क्रिकेट" प्रा.शिवाजीराव सावंत.

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कोणत्याही क्षणी डाव पलटून टाकणारा असा खेळ आहे.असे मनोगत प्रा.शिवाजीराव सावंत यांनी आज रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभ मध्ये व्यक्त केले.      डॉ.तानाजीराव सावंत आरोग्य मंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्राॅफी ही देण्यात आली.      या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट फास्ट बॉलर म्हणून पंढरपूर येथील दिनेश शिंगाडे तसेच बेस्ट बॅट्समन म्हणून जय बनकर त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच धीरज कोळी मॅन ऑफ द सिरीज धीरज कोळी यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.     भैरवनाथ शुगर चे प्रथम क्रमांकाचे चॅम्पियनशिप ट्रॉफी ही बक्षीस रोख रक्कम एक लाख 31 हजार रुपयाचे पारितोषक जीएस १००० पी.पी संघ या संघाला देण्यात आले. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषक निमगाव टीम रोख रक्कम 75 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.त्याचप्रमाणे तिस...

" मोहिते नी तुतारी हाती घेतल्यास दुधारी चे बळ लाभणार "

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते गटामध्ये नाराजीचा सूर तीव्रपणे उमटत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.    भाजपाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी गेली तीन वर्ष पासून मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात सुसंवाद राहिलेला नाही. त्याचप्रमाणे विविध विकास कामांमध्ये मोहिते यांना सामील न करून घेतल्यामुळे नाराजी वाढतेच गेली. त्याचा परिणाम म्हणून मोहिते पाटील गटातील धैर्यशील पाटील यांनी भाजपाकडे माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून मागणी केली परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात येऊन पुन्हा एकदा खासदार रणजीतच्या नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या माढा लोकसभा मतदार संघामध्ये मोहिते पाटील गटाला मानणारा प्रचंड मोठा वर्ग असून हा नाराज झालेला आज दिसत आहे.     कालच मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची चौकशीसाठी म्हणून आलेले सांगोल्याचे डॉ. देशमुख शेकापचे  जयंत पाटील असे विरोधी गटाचे नेतेमंडळी विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटून गेले हे सर्व पाहताच भाजपा च्या नेतेमंडळीने मोहित...

" मोहिते पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपा पराभूत होण्याची शक्यता "

इमेज
     मोहिते पाटील परिवाराची समजूत कशी काढणार?  पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ही सर्वत्र जाहीर होत असताना महाराष्ट्रातील काही भाजपा खासदारांचे उमेदवारी  जाहीर झालेली . या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला पुनश्च भाजपा उमेदवारी मिळवत सध्या भाजपाचे खासदार पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधून खासदार होण्यासाठी तयार झाले आहेत. परंतु आपल्या मतदारसंघांमध्ये कोणती विकास कामे केली, की नुसतीच आश्वासने देऊन पाच वर्ष खासदारकीचे काढले. याचा लेखाजोखा आता या भाजपा खासदारांना जनतेसमोर द्यावा लागणार आहे.   नुकतीच माढा तालुक्याचे सध्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना माढा तालुक्यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यांच्या गाडीसमोर गाजरे ओतून त्यांच्या "गाजर दाखवू"  आश्वासनाला गाजरानेच त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. विकास कामाची खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केल्याची तक्रार या माढा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या कडून होत असल्याचे दिसून येत आहे.     ज्या अकलूजच्या मोहिते पाटील गटाच्या...

उमेदवार न पहाता कमळ पाहून लोक मतदान करतील का?

   पंढरपूर ( प्रतिनिधी) भाजपाने माढा मतदार संघातील लोकांना गृहीत धरून हे मतदार भाजपाने जो उमेदवार देतील त्याच्या कार्याकडे न पहाता फक्त कमळाचे चिन्ह पाहून मतदान करतील असे भाष्य सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील इच्छुक असलेले उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाचे वरीष्ठ नेते व निरिक्षकांनी आपल्या पक्षाचे धोरण स्पष्टपणे सांगितले.      माढा व सोलापूर येथील लोकसभेचे उमेदवारांच्या बद्दल लोकांच्या मध्ये नाराजी पसरली आहे.असे असताना भाजपा आम्ही जो उमेदवार देऊ त्याला लोक फक्त कमळाचे चिन्ह पाहून मतदान करतील असा त्यांचा अंदाज आहे.परंतू या दोन्ही मतदारसंघांत विकास कामे ही सर्वसामान्य जनतेपर्यंत अद्याप पोहचली नाहीत.भाजपाचे नेते तसेच कार्यकर्ते भाजपा ने केलेल्या कामाची माहिती ज  नतेपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरले आहेत.     सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.या मतदार संघात गत लोकसभेचे उमेदवार विषयी प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले.परंतू त्य...

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) ची राज्यात मोर्चेबांधणी जोरदार सुरू...

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटाची मोर्चेबांधणी संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू झाल्याचे दिसून येत आहे.      राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात सुरुवात केलेली असून आज पंढरपूर येथील यशवंत पतसंस्था च्या सभागृहामध्ये आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये जागतिक सदस्य चेअरमन कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्याध्यक्ष सुनील भीमराव जाधव सह .कार्य अध्यक्ष रशीद अकबर शेख शहर उपाध्यक्ष ओम कदम उपाध्यक्ष संजय महादेव मामाने खजिनदार संदीप किसनराव रणवरे संघटक संजय वामन सातपुते, सचिन माधव सोळंके, सदस्य बाळासाहेब दिगंबर देवमारे, सदस्य राजू सदाशिव चव्हाण, यांच्या निवडी करण्यात आल्या असून अजित पवार गटाचे हात बळकट करण्याचे सांगण्यात आले. चेअरमन कल्याणराव काळे...

"पंढरपूर शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर "

 राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) शहर अध्यक्ष दिगंबर सुडके. पंढरपूर ( प्रतिनिधी) माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पंढरपूर शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यासाठी निधी ची मागणी करण्यात आली होती.ही मागणी मंजूर करण्यासाठी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दिगंबर सुडके यांनी अथक प्रयत्न करून शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.     शहरातील कुष्ठरोग वसाहतीत पेव्हर ब्लॉक बसवणे.,इसबावी येथील श्री विठ्ठल मंदिर तसेच श्री मारुती मंदिर येथे पेवर ब्लॉक बसवणे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले चौक ते नवनाथ राऊत यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्ता हा काँक्रिटीकरण करणे आधी शहरातील विकास कामे पूर्ण होण्यासाठी 55 लाख रुपये चा निधी नगरपालिकेला सुपूर्त करण्यात आला. अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी आज रोजी दिली.

"रस्ता रोको आंदोलन करु म्हणताच मागण्या मंजूर " तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध.. लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या प्रयत्नामुळे यश.

 "रस्ता रोको आंदोलन करु म्हणताच मागण्या मंजूर "  तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध.. लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या प्रयत्नामुळे यश. पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रामध्ये येणाऱ्या अन्य ग्रामीण भागातील गावे व वाड्यावर या येथील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे रस्ता रोको हे आंदोलन करण्याची ठरले होते परंतु लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या प्रयत्नामुळे पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने आदेश देऊन तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्वरित मान्य झाले 15 मार्च 2024 पासून सर्व वैद्यकीय सुविधा या तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध होणारा असून या सुविधांमध्ये शस्त्रक्रिया ग्रह त्याचप्रमाणे सर्पदंश लस स्वांग लस आणि आरोग्य कर्मचारी यांची उपलब्धता ही झालेली आहे.      11 मार्च रोजी भैरवनाथ वाडी येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तात्या धनवडे यांनी तुंगत प्राथमिक ...