"श्रीनिवास उपळकर यांचे समाजकार्य या निवडणुकीमध्ये कामाला येणार" .. प्रभाग क्रमांक ३ब मध्ये मताची विभागणी होणार?.....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी पंढरपूर शहरांमध्ये सध्या दिसून येत आहे. 

    पंढरपूर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर वाढत चालण्याचा दिसून येत आहे. यास पंढरपूर नगरीतील प्रभाग क्रमांक तीन अ आणि ब या प्रभागात काशी कापडी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून त्या समाजाच्या बरोबरीनेच मराठा समाजाची तसेच अन्य इतर समाजातील मते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. 

     या प्रभागामध्ये गंगेकर यांच्या कडून सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे या समाजामधील दोन युवा कार्यकर्ते पानकर आणि उपळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला. उमेदवारासोबतच भाजपाचे कृष्णा कवडे तसेच गांडूळे, शिंदे, माने वैभव फसलकर हे देखील उमेदवार निवडणुकी त उभे आहेत . या ठिकाणी समाजसेवेच्या माध्यमातून पानकर आणि श्रीनिवास उपळकर यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे या प्रभागामध्ये मत विभागणीची शक्यता दाट निर्माण झाली आहे. अशी चर्चा या प्रभागामध्ये सुरू आहे. 

     श्रीनिवास उपळकर हे समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य या प्रभागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेले आहे. श्रीनिवास उपळकर हे स्वतः उच्च विद्या विभूषित असून पत्रकारितेची पदवी त्यांनी मिळविले आहे. एक सुशिक्षित युवक म्हणून त्यांची ओळख या प्रभागांमध्ये आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये श्रीनिवास उपळकर यांनी आपल्या समाजासाठी समाज मंदिरासाठी जागेचे मागणी शासनाकडे केले असता त्या समाज मंदिराच्या जागेची रीतसर परवानगी व मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या समाज मंदिरामध्ये काशी कापडी समाजामधील तरुण व ज्येष्ठ नागरिक हे आपला पारंपारिक तुळशीच्या माळा बनवण्याचा व्यवसाय ते करतात. त्यांना आपला तुळशी माळा निर्मिती चा व्यवसाया साठी जागा अपुरी पडत असल्यामुळे याची दखल घेऊन श्रीनिवास उपळकर यांनी पंढरपूर नगरपालिका तसेच नगर विकास खाते महाराष्ट्र शासन आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडे पाठपुरावा करून त्यांनी समाजासाठी जागा मंजूर करून घेतले. त्यामुळे त्याच्या या कार्याची दखल काशी कपडी समाजातील लोक घेतील अशी आशा श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केले.

    श्रीनिवास उपळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्ष म्हणून भरलेला आहे पाहूया अपक्ष या पक्षाला या प्रभागातील लोक कसे व किती मतदान होईल ते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "