" प्रभागात प्रसंग असेल बाका तर बोलवा नागेश काका"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये सध्या पंढरपूर शहरांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शहरात थंडीचा जोर वाढत असतानाच निवडणूक आणि प्रचारामुळे संपूर्ण शहरात गरम वातावरण पंढरपूर निवासी अनुभवू लागले आहेत. 

      पंढरपूर शहरातील उपनगर म्हणून ओळखले जाणारे लिंक रोड नागालँड परिसर या प्रभाग क्रमांक 13 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नागेश काका भोसले यांच्यासोबत तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या महिला उमेदवार रुक्मिणी धनाजी धोत्रे या महिला उमेदवार या प्रभागामध्ये निवडणुकीस उभे असून या प्रभागांमध्ये गत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागेश काका  हे या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते . या प्रभागामध्ये त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवण्या पूर्वीच या भागामध्ये नागेश काका भोसले यांनी रस्ते व त्याचप्रमाणे या प्रभागामधील मूलभूत सुख सुविधा नागेश काकांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांनी उमेदवारी मागे घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सौ साधनाताई नागेश भोसले यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी उमेदवारी नाकारली. आता या प्रभागामध्ये निवडणुकीस उभे राहिलेले विरोधक नागेश काका यांच्या कामाचे श्रेय आता हे विरोधक घेऊ लागले आहेत. या प्रभागातील सर्वसामान्य सुज्ञ मतदार या सुख सुविधा कोणी उपलब्ध करून दिल्या हे जाणतात. आता याच प्रभागांमधून नागेश काका भोसले आणि रुक्मिणी धनाजी धोत्रे या तीर्थविकास आघाडी कडून निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे या प्रभागातील लोकांना नागेश काका भोसले हे आवर्जून सांगतात. "प्रभागात प्रसंग असेल वाका तर बोलवा नागेश काका* असे नागेश काका भोसले हे मतदार बंधू भगिनींना सांगत आहेत. या प्रभागामधील सर्व माता भगिनी बंधू जेष्ठ नागरिक तरुण युवा युवती यांना ते आवाहन करीत आहेत.  कुठलीही अडचण असो समस्या असो कुठलेही संकट असो मला फक्त एक फोन करा मी तुमच्याकडे लगेच हजर होईन. या प्रभागांमधील रखडलेले सर्व विकासकामे आम्ही करणार आहोत. येत्या दोन तारखेला या प्रभागामधील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता ताई भालके यांच्या पुढील रिक्षाचे चिन्हा पुढील बटन दाबून मतदान करावे व त्यांच्या सोबतच मला व रुक्मिणी धनाजी धोत्रे यांना आपले बहुमोल मतदान करावे. असे आवाहन प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व माता-भगिनींना नागेश भोसले यांनी केले. 

   यावेळी उपस्थित या प्रभागांमधील तीर्थ विकास आघाडीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते मंडळी हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "