"डॉ प्रणिता ताई भालके यांना रिक्षा....... आता कमळाची परीक्षा" तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना रिक्षा हे चिन्ह.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 आज रोजी पंढरपूर नगरपालिकेमध्ये चिन्ह वाटपाच्या कारणांवरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने भगीरथ भालके डॉ. प्रणिता ताई भालके, नागेश काका भोसले मनसेचे नेते बापू धोत्रे आणि तीर्थविकास आघाडीचे उमेदवार यांनी आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या समोर तिर्थक्षेत्र विकास आघाडीने मागणी केलेली निवडणुकीतील रिक्षा हे चिन्ह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी एक चिन्ह आणि त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना वेगळे चिन्ह दिले जाणार असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगिरथ भालके, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता ताई भालके, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, आणि तीर्थ विकास आघाडीचे उमेदवार या सर्वांनी उद्या संविधान दिनाच्या दिवशी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देताच रात्री उशिरा निवडणूक आयोगाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांना रिक्षा चिन्ह देण्याचे ठरले व तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 36 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील रिक्षा चिन्ह हे देण्याचे ठरले असे समजते.
आज दुपारी नगरपालिकेच्या मुख्य द्वारा जवळ पत्रकारांना मुलाखत देतेवेळी भगीरथ भालके म्हणाले होते निवडणूक आयोग हे दुजाभाव करत आहेत त्यांच्या वर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. निवडणूक अधिकारी मॅनेज झाले आहेत असे आरोप यावेळी करण्यात आले होते. यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या या रणधुमाळी मध्ये विरोधी पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजपा पक्ष व त्यांचे नेते मंडळी यावेळी संशयाच्या फेऱ्यात अडकतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते यांच्यामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती. कमळ उमलायच्या अगोदरच कोमेजले जाऊ लागले की काय? भाजपाच्या या कमळाच्या प्रचाराचा वेग मंदावतो की काय? अशी शंका देखील नागरिकांमधून व्यक्त केली जाऊ लागली.
चिन्ह वाटपाच्या कारणावरून सत्ताधारी पक्षाने नाराजी ओढवून घेतली. या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षाला बसू शकतो आणि विरोधी गटाला लाभ होऊ शकतो असेच सध्या दिसून येत आहे."डाॅ. प्रणिता ताई भालके यांना निवडणूक चिन्ह रिक्षा तर आता भाजपाच्या कमळाची होणार परीक्षा" अशी चर्चा पंढरपूर शहरांमध्ये सध्या सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा