" एक संधी मतदार बंधू भगिनींनो मला द्या.....मी या प्रभाग क्रमांक १२ चा विकास केल्याशिवाय राहणार नाही" ....... सौ.पूनम युवराज भोसले
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेमध्ये उपनगर म्हणून ओळखले जाणारे इसबावी या परिसरामध्ये अद्यापही विकास कामे झालेली नाहीत. या परिसरातील सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेला कराच्या रूपामधून लाखो रुपये करांच्या रूपाने जमा करते. परंतु या परिसरामधील मूलभूत सुविधा रस्ते, पिण्याचे पाणी त्याचप्रमाणे दिवाबत्ती अशा अत्यंत गरजेच्या सुविधा या उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाहीत.विकासकामे मोठ्या प्रमाणात झालेली नाही. या प्रभागामधून निवडून गेलेले उमेदवार एकदा निवडून गेली की पुन्हा या मतदारसंघांमध्ये फिरकत देखील नाही. अशा या प्रभागामध्ये सतत सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे व त्यांच्या अडीअडचणीला, संकटाला ,मदतीसाठी धावून जाणाऱ्या नगरसेवकाची गरज आहे. या प्रभाग क्रमांक 12 मधून मी माझी उमेदवारी तीर्थ विकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेली असून मला या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींने फक्त मला एक संधी द्या मी प्रभाग क्रमांक बाराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. असे तीर्थ विकास आघाडीची उमेदवार सौ पुनम युवराज भोसले यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवार सौ पूनम युवराज भोसले यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन वडीलधारी मंडळी, तरुण बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेऊन आपण या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर काय कामे करणार आहेत याची माहिती त्यांनी दिली. या प्रभागामधून एका नवीन चेहऱ्याला आपण संधी द्यावी. असे देखील प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व सामान्य मतदारांना त्यांनी आवाहन केले.
प्रभाग क्रमांक 12 मधून विकास आघाडीच्या उमेदवार पुनम युवराज भोसले यांना सर्वच ठिकाणांहून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा