"शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट ) च्या उमेदवारांना विजयी करा".... .. रुपाली चाकणकर


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) श्री विठुरायाचे पंढरपूर या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकी च्या प्रचार फेरीमध्ये त्यांनी कित्येक प्रभागांमध्ये आपला प्रचार दौरा करीत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर संवाद साधून पंढरपूर वाशी यांना आवश्यक असलेल्या सुधारणा व विकास कामे याबाबत त्यांनी चर्चा केली आणि पंढरपूर शहराला संपूर्ण देशभरामध्ये नावलौकिक मिळवून देण्यासाठी या शहरांमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन निधी देण्यामध्ये कमी पडणार नाही असे आश्वासन देत रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले. 

     या प्रचार फेरीमध्ये पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांच्या सोबत पंढरपूर शहर शहराध्यक्ष दिगंबर सुडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समाधान काळे उमेश पाटील व महिला कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "