" सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या प्रिन्स ला समाजाच्या जमीनी कमी पडू लागल्या".... .... भगिरथ भालके.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळी मध्ये एकमेकांवर टीका करण्याचे सत्र आता सुरू झाले आहे. आज रोजी तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी प्रचार सभेमध्ये भाजपाचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या प्रिन्सला समाजाच्या जमिनी कमी पडू लागले आहेत. अनेक गोरगरीब त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजातील काही जमिनी या लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपाच्याच आमदारांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून पंढरपूर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या मौल्यवान अशा जागेचा कागद हा 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासनाचे सर्व कार्यालय बंद असतात. अशा 26 जानेवारीच्या दिवशी हे भूखंड लाटू लोक खरेदीचा व्यवहार करू लागले आहेत. अशा भ्रष्ट सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या प्रिन्सला पंढरपूर शहरातील मतदार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
सोन्याचा चमचा घेऊन आलेले हे प्रिन्स पंढरपूर शहराच्या विकासाचा व्हिजन सांगू लागले आहेत. या प्रिन्सने प्रथमता पंढरपूर शहरातील धूळ कमी करून दाखवावी, पिण्याचे पाणी सर्वसामान्य जनतेला शुद्ध पाणी देण्याचे त्यांनी काम करावे, विष्ठा मिश्रित मैला मिश्रित पाणी पंढरपूर शहरवासीयांना दिले जात आहे. सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेला कराच्या रूपाने लाखो रुपये भरत असते. परंतु कुठल्याच मूलभूत सुख सुविधा गेली तीस वर्ष राज्य करणारे राज्यकर्ते देऊ शकत नाहीत. अशा मस्तवाल आणि निष्क्रिय अशा या सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. अशा कडक शब्दांमध्ये तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके टीकास्त्र सोडले.
जुनी पेठ परिसरामध्ये कॉर्नर सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत होती. यावेळी उपस्थित या प्रभागातील उमेदवार पूनम साईनाथ अभंगराव तसेच धनंजय दशरथ कोताळकर या तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेला पंढरपूर शहरातील सर्व प्रभागातील तीर्थ विकास आघाडीचे उमेदवार त्याचप्रमाणे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा