"प्रभाग क्रमांक 9 आणि 10 या प्रभागांमध्ये भाजपाच्या कमळाची जोरदार चर्चा" ..... दोन्हीही प्रभाग भाजपामय झाल्याचे चित्र दिसून आले.
पंढरपूर ( प्रतिनिधी) आज रोजी पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा या प्रभागामध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रचार फेरी आज मोठ्या प्रमाणामध्ये निघाली.
या प्रभागामध्ये प्रचार फेरीच्या दरम्यान सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनींने भाजपाच्या उमेदवाराचे सहर्ष स्वागत केले. विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते. प्रशांतराव परिचारक यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, उद्योगपती दीपकराव भोसले या प्रभागातील उमेदवार वैभव भोसले आणि पंढरपूर शहराचा नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार सौ शामल ताई लक्ष्मण शिरसाट त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील सर्व प्रभागांमधील भाजपचे उमेदवार आज या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते.
विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी या प्रभागामधील मतदार बंधू भगिनींना भाजपच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून भाजपाच्या कमळाला प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन केले. या प्रभागामधील सर्व मूलभूत सुविधा या पुरवल्या जातील त्याचप्रमाणे या प्रभागांमध्ये ज्या काही अडीअडचणी समस्या आणि विकास कामे ही कामे लवकरात लवकर करण्यात येणार आहेत. असे आश्वासन प्रशांतराव परिचारक यांनी आज रोजी दिले.
या प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा या प्रभागामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यांच्या अडीअडचणी प्रशांतराव परिचारक आणि सौ शामल ताई शिरसाट यांनी सोडवण्याचे आश्वासन दिले.
या प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा मध्ये निघालेल्या प्रचार फेरीस या प्रभागातील सर्वसामान्य जनता या प्रचार फेरीमध्ये सामील होऊन भाजपाच्या कमळालाच आम्ही मतदान करणार असे त्यांनी आवर्जून सांगितले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा