पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"तन्मय जाधव यांनी मिळवले एस.एस सी.मध्ये.98.60.टक्के मार्क" बी.एफ.दमाणी विद्यामंदिर च्या नावलौकिकात मानाचा तुरा...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकताच शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सोलापूर येथील बी एफ दमानी विद्यामंदिर येथील विद्यार्थी चि. तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेमध्ये 98.60 इतके मार्क घेऊन बी एफ दमाणी विद्यामंदिर सोलापूर या शाळेच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा त्यांनी रोवला.     तन्मय बाळासाहेब जाधव हा विद्यार्थी या शाळेमध्ये इयत्ता पहिल्या वर्गापासून अग्रक्रमांक मिळवत असलेला हा विद्यार्थी त्यांनी बी एफ दमाणी शाळेतील शिक्षकांच्या कष्टाचे व त्यांच्या मार्गदर्शनाचे चीज केले. तन्मय जाधव याला शाळेतील मुख्याध्यापक तसेच त्याचे सर्व विषयाचे शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळेच व अभ्यासामध्ये सातत्य राखल्यामुळे हे त्याला यश मिळवता आले. असे तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांनी आज आमच्या प्रतिनिधीला सांगितले.      तन्मय ची आई या  शिक्षिका असून तन्मय चे वडील बाळासाहेब जाधव हे देखील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे दुःखद निधन कोरोना कालावधीमध्ये कोरोना रुग्णाची सेवा करत असतानाच त्यांचे कोरोना या आजारामुळे दुःखद निधन झाले. अतिशय लहान वयामध...

"श्री मुदगुलेश्वर देवस्थान कडे जाणारा रस्ता कधी दुरुस्त होणार?"भाविकांचा संतप्त सवाल.

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील सिंदफळ या गावी असलेले श्रीमुदगुलेश्वर देवस्थान हे महादेवाचे पुरातन मंदिर असून, या मंदिराला या परिसरातील तसेच राज्यभरातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तुळजापूर बार्शी रोडवरील एक किलोमीटर अंतरावर असलेले हे महादेवाचे मुदगुलेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे जाणारा एक किलोमीटर रस्ता हा पूर्णता खड्डेमय झालेला असून या रस्त्याची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. या मंदिराला या परिसरातील असंख्य भाविक लोक कार, मोटरसायकलवर तसेच पायी जात असतात. हा रस्ता दुतर्फा निसर्गरम्य झाडांनी नटलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे श्री मुद्गुलेश्वर देवस्थान हे महादेवाचे मंदिर असून या मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास असून हे प्राचीन पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला संपूर्णतः झाडी असून असंख्य झाडांच्या मध्ये असलेले हे श्री मुद्गुलेश्वर मंदिर भाविकांना मनशांती तसेच समाधान देणारे हे मंदिर आहे. अशी आख्यायिका या परिसरामध्ये ऐकवली जाते.       या मुदगुलेश्वर मंदिराचे पर्यटन विकास च्या वतीने पर्यटन क्षेत्र म्हणून या भागामध्ये...

"आला आला वारा संगे पावसाच्या धारा" पंढरी नगरी भिजून चिंब झाली.

 पंढरपूर ( प्रतिनिधी) जवळपास 43 ते 44 सेल्सिअस चे तापमान आपला सोलापूर जिल्हा सहन करीत होता. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या धारा आज पंढरपूरकरांनी अनुभवले.       पंढरी नगरी मध्ये येणारे भावीक भक्त पंढरपूर शहरांमध्ये आल्यानंतर या पंढरी नगरीतील उष्ण तापमान आला सामोरे जात होते. चंद्रभागेमध्ये सोडलेल्या पाण्यामध्ये मनसोक्त डुबंण्याचा आनंद हे भाविकभक्त घेत होते. आज सायंकाळच्या दरम्यान ला झालेल्या या मुसळधार पावसामुळे भावीक भक्त तसेच पंढरपूर रहिवासी आज आनंदून गेले.         पंढरपूर शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये आज या पावसाच्या धारा बरसल्या शेतकरी वर्ग तसेच उन्हाने हैराण झालेले पंढरपूर वाशी नागरिक यांनी आज पावसामध्ये भिजून आनंद व्यक्त करत असल्याचे चित्र आज पंढरपूर तालुक्यांमध्ये व पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत होते. या झालेल्या पावसामुळे हवे मधील उष्णता कमी होऊन थंडगार अल्हाददायक चित्र सर्वत्र पसरल्याचे दिसून येते.

"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य स्टॅंडिंग शो संपन्न" आयोजित शिवसेना शहरप्रमुख विश्वजीत ( मुन्ना)भोसले.मित्रमंडळ.पंढरपूर

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील कर्नल भोसले चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने,त्याचप्रमाणे देशभक्ती जागृत करण्याचे उद्देशाने शिवसेना शिंदे गट चे पंढरपूर शहर प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आयोजित केलेल्या या स्टॅंडिंग शोचे कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला.       धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने या स्टँडिंग शोचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित शिवसेनेचे अनिल सावंत साहेब, संभाजी ब्रिगेडचे दीपक दादा वाडदेकर, काँग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे, पंढरपूर मर्चंट बँकेचे तज्ञ संचालक श्याम भोगाव सर, कर्नल भोसले चौकाचे आधारस्तंभ किरण आप्पा भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते.       धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या शौर्याची गाथा या स्टॅंडिंग शोच्या माध्यमातून तरुण पिढी...

"तू किस झाड की पत्ती " अजित पवार. उमेदवार निलेश लंके विषयी चे वक्तव्य.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार सभेचा अंतिम टप्पा सुरू असताना नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर कडाडून टीका करीत असताना ते म्हणाले निलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघासाठी भरपूर निधी देण्यात आला. परंतु ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे हाताची मुठ बंद आहे, आता मुठ उघडायची वेळ आली आहे. असे ते म्हणाले निलेश लंके यांच्या विषयी एकरी शब्दात "तू किस झाड की पत्ती" असे देखील तुच्छपणाने त्याने आपल्या प्रचार सभेमध्ये त्यांचा उल्लेख केला.      अजित पवार यांच्या सडेतोड बोलण्याने अनेक जणांची मने दुखावले गेलेले आहेत. काही वर्षापूर्वी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विषयी देखील त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये "उद्याच्या विधानसभेमध्ये तू दिसणार नाही." असे म्हणून विजय शिवतारे यांना पराभूत केले होते.  याचा रोष देखील विजय शिवतारे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दर्शविला होता.       सतत वरिष्ठ नेत्यांना त्याचप्रमाणे सहकारी नेतेमंडळींना, अधिकाऱ्यांना खडसावू...

भाजपा ने आमदारकी चे गाजर दिले कुणा...कुणाला?..

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका या पार पडल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील अनेक राजकीय नेत्यांना भाजपाने आमदारकीचे गाजर दाखवलेले आहे. हे या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले.       या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील येणारे आमदार या सर्वांना त्याचप्रमाणे भावी आमदारांना आणि माजी आमदारांना भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी सक्त ताकीद व आदेश देऊन सांगितले होते. की या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताच्या फरकाने निवडून आणावे. ज्या विधानसभेच्या तालुक्यामधून जास्ती जास्त भाजपाचा उमेदवाराला मतदान अधिक मिळेल, आणि ते मताधिक्य कोण मिळवून देईल. त्या व्यक्तीला आमदारकीची तिकीट दिले जाईल. असे संकेत  भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील असंख्य नेते मंडळी ही भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला निवडून देण्यासाठी अथक प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून येते.       ज्या विधानसभा च्या क्षेत्रामधून भाजपच्या उमेदवाराला कमी मते मिळेल. त्या भा...

"दादा,.,.. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तरीही?"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत काही राष्ट्रवादीचे आमदार भाजपा व शिंदे शिवसेना यामध्ये सामील होऊन सत्ता स्थानी विराजमान झाले. त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह देखील सोबत घेऊन गेले. या राष्ट्रवादीमधील  घडामोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ राजकारणी माणसाच्या सहवासात व सानिध्यात राहून अजित पवार यांनी केलेले बंड हे शरद पवार तसेच त्यांचे कुटुंब व संपूर्ण महाराष्ट्रातील शरद प्रेमी जनतेला आवडले नाही.      अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधील काही आमदारांना घेऊन भाजपा व शिंदे सेना बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी जी होणार होती, ती टळली. व त्यांच्यावरील असलेले घोटाळ्याचे आरोप हे देखील थंड  झाले.भ्रष्टाचाराच्या या आरोपाला घाबरून अजित पवार हे भाजपच्या सोबत गेले की काय?  अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली.       मध्यावधी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये क...

"बारामती येथे चंद्रकांत पाटील यांच्या मुळे मतदान कमी"

इमेज
 पंढरपूर.(प्रतिनिधी) भाजपा मधील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक पूर्वी शरद पवार यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य ते म्हणजे "शरद पवारांचे बारामतीतील राजकीय अस्तित्व संपवणार" या त्यांच्या वक्तव्यामुळे बारामती परिसरातील शरद पवार प्रेमी तसेच अन्य सामाजिक संघटना हे नाराज झाल्याचे दिसून येत आहे.        सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये सांगोला त्याचप्रमाणे टेंभुर्णी या ठिकाणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या कार्याला अडचणीचे ठरले होते. टेंभुर्णी येथील सर्वसामान्य मतदाराला त्यांनी "तू कोणता पक्षाचा आहे?" म्हणून विचारणा करून त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांची केलेली  हेटाळणी व त्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते व मतदार आणि त्या घटनेनंतर सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी "सोलापुरातील लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागा माढा व सोलापूर या भाजपाच्या हातून निसटतात की काय तसेच दोन्ही जागा या धोक्याच्या स्थितीत आहेत." असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध...

" श्रीविठ्ठल आई आणि सभासद हे बाळ या दोघांना जगवणार".. देवेंद्र फडणवीस.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघ, आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते तसेच रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीतील प्रचाराच्या समारोपाच्या जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे वर्णन आणि सभासदांचे वर्णन हे श्री विठ्ठल म्हणजे आई आणि त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद म्हणजे बाळ अशी उपमा देऊन त्यांनी श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना वरील आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी व या कारखान्याला कर्जमुक्त करून प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत करणार आहे."आई ही जगली पाहिजे आणि बाळ ही जगले पाहिजे"  अशी साहित्यिक उपमा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील संचालक व सभासद व या दोन्ही मतदारसंघातील मतदारांचे मन जिंकले.       बंद स्थितीत असलेले साखर कारखाने, अडचणीत असलेले साखर कारखाने हे ताब्यात घेऊन हे बंद कारखाने तीस-पस्तीस दिवसांमध्ये सुरू करण्याची किमया या तरुण होतकरू आणि प्रामाणिक अशा अभिजीत आबा प...

"धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने भाजपाला चांगले पळवले आहे ". शरद पवार

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने चांगलेच पळवले आहे. गेली पाच वर्ष सत्तेची खुर्ची उबवत बसलेल्या या भाजपाच्या उमेदवाराला धैर्यशील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपाच्या उमेदवाराची धावपळ सुरू झाल्याची दिसून येत आहे .परंतु या माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याने त्रस्त असलेला शेतकरी ,बेरोजगार तरुण हा या भाजपाच्या उमेदवाराला ज्वलंत प्रश्न विचारून अक्षरशा हैराण करीत आहे.       मोदी सरकार हे काही मोजक्या कारखानदारांसाठी व त्यांच्या समूहासाठी काम करीत आहेत. महाराष्ट्रातील असंख्य उद्योगधंदे त्यांनी गुजरात या राज्यात नेले आहेत. देशाचा पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो. परंतु या मोदी सरकारने काही विशिष्ट लोकांनाच खुश करण्याचे काम केले आहे.     पंतप्रधान मोदी हे आपल्या भाषणामधून वारंवार म्हणत आहेत हे विरोधक लोक महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेणार आहेत, त्यांच्या संपत्ती जप्त करणार आहेत. असे बोलून ते सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा...

"भाजपात आम्ही असलो की चांगले भाजपा सोडून बाहेर गेलं की आम्ही वाईट असे दुटप्पी धोरण भाजपाचे आहे"...... धैर्यशील मोहिते पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगलेच घोंगावत आहे.       आज अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याचप्रमाणे शेकापा व अन्य सहयोगी पक्षाच्या वतीने जाहीर सभा अकलूज येथे झाली.       या जाहीर सभेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजेश टोपे ,उत्तम जानकर, साईनाथ अभंगराव, जयंत पाटील असे मान्यवर उपस्थित होते      माढा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील  मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये ते पुढे बोलत असताना म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सर्व तालुक्याचा गाव भेट दौरा करून या मतदारसंघांमधील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरूण यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला .त्याचप्रमाणे त्यांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न अडीअडचणी समस्या या जाणून घेऊन त्यांनी या सर्वसामान्य शेतकरी ...

"बैठकी वर बैठकी घोंगडी बैठकी" अभिजीत आबा पाटील महायुती साठी सक्रिय...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रंजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवाराला आपला  पाठिंबा दिला आहे.        अभिजीत पाटील यांचे जण माणसांमध्ये असलेले एक उजळ प्रतिमा ही भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला लाभदायक ठरणार आहे. अभिजीत आबा पाटील यांना मानणारा बहुसंख्य तरुण वर्ग त्याचप्रमाणे शेतकरी, कष्टकरी, ऊसउत्पादक सभासद हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अभिजीत आबा पाटील यांनी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून भाजपा सरकारला देश पातळीवर निवडून आणण्याचे आवाहन ते करीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी, शेळवे ,भंडी शेगाव, उपरी या भागामधून त्यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मोदी सरकारने केलेल्या कार्याचे माहिती सर्वसामान्य जनतेला ते देऊन भाजपाला मतदान करण्याचे आव्हान त्यांनी के...

"देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना बळ देणार".... अभिजीत पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते तसेच रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना बळ देण्याचे उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. श्री विठ्ठल साखर कारखान्याचे हजारोच्या संख्येने असलेले सभासद या सभासदांच्या कल्याणासाठी व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आर्थिक बळ प्राप्त होण्याचे आश्वासन तसेच योग्य ते मार्गदर्शन देण्याची भूमिका महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघ, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचा म्हणून निश्चय अभिजीत आबा पाटील व श्री विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक व सभासद यांनी व्यक्त केला.      पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सर्वात मोठा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना असल्यामुळे या साखर कारखान्याचे सभासद हजारों...

"भाजपाला फटका अन् देवेंद्र ला झटका बसतोय की काय?"....... मराठा,धनगर समाजाची नाराजी भोवणार

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये देशाच्या पंतप्रधानांची सभा झाली. या सभेच्या वेळी देशाच्या प्रथम नागरिकांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येऊन या मतदार संघातील जनतेला भावनिक आव्हान करण्याचे प्रयत्न केला. येळकोट येळकोट जय मल्हार आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं असे भावनिक आव्हान करून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील मराठा व धनगर समाजाला आपलंस  करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.       भाजपा सरकारने मराठा समाज त्याचप्रमाणे धनगर समाज हे दोन्ही समाज ज्या आरक्षणासाठी ते कित्येक वर्षापासून धडपडत आहेत. परंतु या दोन्ही समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे काम या सरकारने राजकीय सोयीनुसार त्यांनी दूर ठेवलेले आहे. फक्त राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने या मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून त्यांनी झुलवत ठेवलेले आहे. असे मनोगत माढा लोकसभा मतदारसंघातील जनसंवादाच्या माध्यमातून मतदारांनी आमच्याशी व्यक्त केले.         माढा येथील याच जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विरोध...

"माझा संसार बळकट झाला आहे,आता मोदी सरकारच्या माध्यमातून जनतेचा संसार बळकट करायचा आहे.".. समाधान आवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आपल्या देशातील लोकसभेची ही निवडणूक ही देशातील सर्वोच्च अशी निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची, जिल्हा परिषद ची अशी ही निवडणूक नसून ही निवडणुक देशामध्ये स्थिर सरकार, त्याचप्रमाणे देशाची जर का प्रगती करायचे असेल, देश सुरक्षित ठेवायचा असेल तर लोकशाही पद्धतीने चांगले सरकार निवडून देण्याची ही प्रक्रिया आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारने देशांमध्ये स्थिर असे शासन दिलेले आहे. मोदी सरकारच्या कालावधीमध्ये असंख्य कल्याणकारी योजना या राबविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व योजना म्हणजे महिलांसाठी उज्वला गॅस, सर्वसामान्य जनतेला मोफत राशन, त्याचप्रमाणे ज्यांना घरे नाहीत त्या गरीब बेघरांना घरकुल दिलेला आहे. वैद्यकीय सुविधा मोफत त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये विजेची सोय केलेली आहे. रस्ते आणि पाणी हे गावोगावी वाड्यावस्ती वर त्यांनी आणलेले आहे. हे सर्व कार्य भाजप सरकारच्या राजवटीमध्ये मोदी सरकारने केलेले आहे. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार एक प्रतिनिधी म्हणून राम सात...

"आता सर्वसामान्य जनतेने ठरवले आहे....भाजपाला घरी बसवायचे ".... प्रणिती ताई शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . आता सर्वसामान्य जनतेनेच ठरवलेलं आहे की भाजपाला घरी बसवायचे. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज पंढरपूर येथे बुथ बैठकी मध्ये वक्तव्य केले.       भाजपाचा गेल्या दहा वर्षाच्या राजवटीमध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी ,बेरोजगार तरुणही होरपळून निघालेला आहे. त्यामुळे आज सोलापूर लोकसभा मतदारसंघ असो किंवा अन्य लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही भाजपाला घरी बसवायचं म्हणजे बसवायचं असं म्हणू लागली आहे.       सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी फिरत असताना शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण, महिला यांनी या भाजपा सरकारच्या संदर्भामध्ये असंख्य तक्रार या त्यांनी सांगितल्या आहेत. गेल्या दहा वर्षातील दोन्ही खासदाराने सोलापूर मतदार संघासाठी काही विकास कामे केलेली नाही. किंवा कुठले मोठे प्रोजेक्ट आणले नाहीत. सोलापूर शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. अशा असंख्य कारणाने आज मतदार राजा नाराज झाला आहे.       सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे...