" मी पडद्या मागचा कार्यकर्ता आहे कधी? कुठे? कुणाला? उचलायचं हे मला चांगलं माहित आहे." ..... नागेश काका भोसले.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका या निवडणुकीमध्ये विरोधी गटाकडून अनेक अफवा पसरवल्या जातील ,आमिष दाखवले जातील. कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ म्हणतील .परंतु अशा अमीषाला व फसव्या जाळ्यामध्ये कोणीही कार्यकर्त्यांनी अडकता कामा नये. मी पडद्यामागचा कार्यकर्ता आहे कोणाला? कधी ?कुठे?  उचलायचे हे मला चांगले माहित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता तीर्थ विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके यांना प्रचंड मताने विजयी करायचे आहे. आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व 36 उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणायचे आणि गेली 35 वर्ष या विरोधकांची नगरपालिकेमध्ये सत्ता आहे. ती सत्ता उलटून टाकायची आहे.असे आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी शिवाजी चौक पंढरपूर येथील शिवतीर्थावर बोलत असताना नागेश भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

     यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ दादा भालके,शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिलसावंत, कल्याणराव काळे ,गणेश पाटील, आदित्य फतेपुर कर धनंजय कोताळकर व तीर्थ विकास आघाडीचे उमेदवार व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "