" फक्त एकदा संधी देऊन बघा मी प्रभाग क्रमांक १० ब चा विकास करुन दाखवतो" ... वैभव शहाजी भोसले


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा ब या प्रभागामध्ये आज रोजी वैभव शहाजी भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांच्यासोबत  प्रभाग क्रमांक दहा व मधील असंख्य ते कार्यकर्ते हे उपस्थित होते.

      अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर प्रभाग क्रमांक दहा ब मधील अपक्ष उमेदवार वैभव शहाजी भोसले यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले "प्रभाग क्रमांक दहा ब हा प्रभाग गेल्या कित्येक वर्षापासून मूलभूत सुविधा पासून वंचित असलेला हा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागामधील सर्वसामान्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा  या उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये असंख्य अडचणी व समस्या मला दिसून आल्या या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर मला प्रभाग क्रमांक दहा ब मधील मतदार बंधू भगिनी आणि मातांनी मला एक वेळ संधी देऊन बघावी मी या प्रभागाचा विकास करून दाखवितो" असे अपक्ष उमेदवार वैभव शहाजी भोसले यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर मुलाखत देते प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "