पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"भव्य नोकरी महोत्सव" आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी बेरोजगारांसाठी जे केले नाही ते अनिल दादा सावंत करणार.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामधून उदयास येत असलेले उमलते नेतृत्व भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील असंख्य बेरोजगारांच्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशाने भव्य नोकरी महोत्सव उपक्रम राबवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी पंढरपूर शहरातील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी लिंक जाहीर केलेली आहे.https// maharastrajo fair.com/ anil sawant/  https// forms.gle  /Ld9KSTyfuo9zg2H29 त्यावरील लिंक वर नाव नोंदणी करावी असे आव्हान बेरोजगार तरुणांना करण्यात आले आहे.        अनिल दादा सावंत यांनी काही मोजक्याच दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये आपल्या विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून, सांस्कृतिक कार्यक्रमामधून आणि त्याचप्रमाणे बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशाने हा भव्य नौकरी महोत्सव 2024 हा आयोजित करण्यात आलेला आहे.       आज पर्यंत पंढरपूर मंगळ...

"मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा गाव भेटीच्या झंझावात सुरू"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली, असून दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर शहरांमधील विविध ठिकाणी भेटी देऊन जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली आहे.      पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे ३ ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2024 या तीन दिवसाच्या दरम्यान मध्ये पंढरपूर मतदार संघातील खर्डी येथील ग्रामदैवत सीताराम महाराज यांचे दर्शन घेऊन गाव भेटीचा दौरा सुरू करण्यात येणार आहे. तपकीर शेटफळ, तावशी, सिद्धेवाडी, शिरगाव, एकलासपूर, अनवली ,रांजणी, मुंडेवाडी, गोपाळपूर ,उंबरगाव, बोहाळी, कोर्टी, टाकळी, गादेगाव, कवठाळी ,शिरडोण वाखरी आणि कासेगाव या पंढरपूर तालुक्यातील महत्त्वाच्या गावामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे गाव भेटीचा दौरा हा सुरू करणार आहे. त्या गाव भेटीच्या दरम्यान मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आजपर्यंतचे कार्य पंढरपूर मंग...

"सर्वात जास्त दर देण्याची कै.औदुंबर आण्णा पाटील यांची परंपरा चालू ठेवणार ".... चेअरमन अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नुकतीच 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या प्रसंगी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी यांना संबोधन करत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा कै.औदुंबर अण्णा पाटील यांनी सुरू केली होती. ही परंपरा कायम चालू ठेवण्याच्या उद्देशाने शेतकरी ऊस उत्पादक सभासदांना जास्तीचा दर मिळवून देण्याच्या उद्देशाने 3500 चा दर ऊसाला देण्याचे त्यांनी जाहीर केलेले असून अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव मिळावा, त्याचप्रमाणे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद हे आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत या भूमिकेतून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला 3500 चा दर देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.      श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपयाचा दर जाहीर केल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये सहकारी क्षेत्रातील सर्व साखर कारखाना मध्ये एकच खळबळ उडाली आहे. एवढा जा...

"शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या हिताची भूमिका घेणाऱ्याला निवडून देणार"..माढा मतदारांची स्पष्ट भूमिका

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये जनमत चाचणी आणि मतदार राजाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेली स्पष्ट भूमिका काय आहे.या विषयी चाचपणी केली असता या माढा मतदार संघामधून धक्कादायक माहिती पुढे येत आहे.     माढा मतदार संघातील आमदार बबनदादा शिंदे यांनी गेली तीस वर्षे एकहाती सत्ता असूनसुद्धा काही गावातील समस्या या मिटल्या नाहीत.पाणी शेजारील गावांना येते परंतु काही गावे पाण्या पासून वंचीत ठेवल्याचे लोक उघडपणे व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामिण भागातील रस्ते ही दुरुस्तीसाठी वाट पहात आहेत. ठेकेदार पोसण्याचे काम सत्ताधारी मंंडळीने केल्याचे देखील बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर कर्ज काढून त्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे.असा आरोप देखील मतदार करीत आहेत.     सत्ताधारी मंडळींकडे साखर कारखाने असून या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर दिला जात नाही.पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा अभिजीत आबा पाटील यांच्या ताब्यात असून या कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी ३५०० रुपये चा दर जाहीर केला आहे.या कारखान्याची तुलना माढा तालुक्यातील ...

"उमेश परिचारक यांना माढा मतदारसंघात लोक ओळखत नाहीत." जनतेशी थेट संवाद....

इमेज
 पंढरपूर (  प्रतिनिधी) माढा मतदार संघ हा पंढरपूर तालुक्यातील 40 ते 45 गावाचा समावेश होऊन हा माढा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे. या मतदारसंघातील सद्यस्थितीतील आमदार बबनदादा शिंदे हे असून गेली पाच ते सहा विधानसभेची टर्म आमदार म्हणून प्रतिनिधी करतात ,परंतु आमदार बबनदादा शिंदे यांनी येणारी विधानसभा ही आपण लढवणार नाही. आपल्या मुलाला येत्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी संधी द्यावी.असे आवाहन केल्यामुळे या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये असंख्य उमेदवार आमदारकीच्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उतरलेले सद्यस्थितीला दिसून येत आहे.       पंढरपूर तालुक्यातील कित्येक गावे माढा विधानसभेला जोडलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील परिचारक कुटुंबातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे तसेच पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे उमेश परिचारक हे या माढा मतदार संघामधून आपली उमेदवारी जाहीर करावी म्हणून पांडुरंग परिवार व परिचारक प्रेमी परिवार यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून उमेश परिचारक यांनी उमेदवारी जाहीर करून माढा विधानसभा लढवावी अशी इच्छा परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी नु...

"मैं मुस्लीम हूॅं,तू हिंदू है आवो तुम कुराण पढलो मैं गीता पढ लूॅं" असा हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जस्ने ईद-ए-मिलाद ची भव्य मिरवणूक आज रोजी काढण्यात आली.      यावेळी कोर्टी गावातील ग्रामस्थांनी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून" मै मुस्लिम है   तू हिंदू है  आवो तुम कुराण पढलो    मै गीता पढलूॅं "असा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश कोर्टी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी  आज रोजी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने भव्य अशा मिरवणुकी मधून एक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने कोर्टी गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील बांधवांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये पैगंबर जयंती साजरी करण्यात आली.      पैगंबर जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी यावेळी येऊन कोर्टी गावातील मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीचे निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवशंभु प्रतिष्ठानचे महेश शेडगे त्याचप्रमाणे कोर्टी गावाचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे  के जी एन ग्रुपचे असंख्य कार्...

"दिवाळीची खरेदी एकाच छताखाली".. आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) दिनांक 19, 20 ऑक्टोबर दीपावली सणाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व जनतेने दीपावली निमित्तने खरेदीसाठी पंढरपूर येथील स्मारक मंदिर च्या मैदानामध्ये वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनशे स्टॉल या ठिकाणी महिला या आपापले  बनवलेले खाद्यपदार्थ साहित्य त्याचप्रमाणे आकाश कंदील पणती,दिवे आधी विक्रीसाठीचे स्टॉल हे या ठिकाणी भरणार आहेत.       या ठिकाणी आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व मनसेच्या वतीने विविध स्टॉलच्या माध्यमातून महिलांना आपले बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी या ठिकाणी एकाच छताखाली दीपावली निमित्ताने सर्वसामान्य ग्राहकांना या ठिकाणी विविध पदार्थ व वस्तू खरेदी करता येणार असून आद्य वीरशैव महिला मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेने  च्या माध्यमातून मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर मध्ये भव्य असा एक्सपो एका छताखाली दिवाळीची खरेदी व्हावी या उद्देशाने हा  एक्सपो  भरवला जात आहे. या ठिकाणी महिला आपापला स्टॉल  मधून विविध दीपावलीनिमित्त पि...

आमदार होण्यापूर्वीच " आमदार" म्हणून मिरवणुक... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी निवडणूक पूर्वीच गावभेटीचा दौरा संपूर्ण माढा मतदारसंघांमध्ये सुरू केल्यामुळे त्यांचे सर्वत्र उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. माढा तालुक्यातील वडोली या गावांमध्ये अभिजीत आबा पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजीत पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले. घोड्यावर बसण्याचा व मिरवणूक काढण्याचा प्रसंग आयुष्यामध्ये लग्नाच्या वेळेस येतो. परंतु वडोली गावच्या ग्रामस्थांनी माझ्यावरील प्रेमापोटी त्यांनी मला घोड्यावर बसून हलगी ताशाच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक गाव ग्रामस्थांनी काढली. त्यांच्या या प्रेमाने मी भारून गेलो आहे असे मनोगत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये असंख्य प्रश्न हे प्रलंबित आहेत. विकास कामे रखडलेले आहेत. यावर एकच तोडगा तो म्हणजे बदल करणे. आपल्याला या मतदारसंघांमध्ये प्रचंड का...

"जनतेचा लाडका आमदार म्हणून समाधान आवताडे यांची क्रेझ वाढतेय "

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पोटनिवडणुकीमधील विजयानंतर त्यांना कार्य करण्यासाठी मिळालेल्या दोन तीन वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील विकास कामे तसेच रस्ते, समाज मंदिर, मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न, पंढरपूर शहरातील, उपनगरातील असंख्य रस्ते दुरुस्ती त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कार्याची झलक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला दाखवलेली आहे.‌ तीर्थक्षेत्र आराखड्यातील विकास कामे साठी लागणारा कोट्यावधीचा निधी हा आमदार आवताडे यांनी खेचून आणलेला आहे. सतत लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व कामे करण्याचा आमदार अवताडे यांचा जोश पाहून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता त्यांना लाडका आमदार म्हणू लागले आहेत. मध्यंतरी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व गावांमधून भाजपा सरकारने केलेले कामाची माहिती व आपण स्वतः केलेल्या कामाची माहिती व  आणलेला निधी आपण केलेली विकास कामे हे जनत...

"कुस्तीगीरांच्या अडीअडचणी आखाड्यात येण्या आधी दिलीप बापू नी सोडवल्या"- मनसे नेते अमीत ठाकरे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मंगळवेढा येथे मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी येथे मनसेच्या वतीने भरवलेल्या मनसे केसरी या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.       या प्रसंगी ब़ोलत असताना अमीत ठाकरे म्हणाले, पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कुस्तीगीर यांच्या काही अडचणी समस्या या जाणून घेऊन त्याचप्रमाणे या दोन्ही तालुक्यातील असंख्य तालमींच्या बाबतीत काही अडी अडचणी व तालीमी मधील सुविधा त्याचप्रमाणे या तालमींना आर्थिक मदत व सुधारणा या करण्याच्या उद्देशाने कुस्तीगीरांच्या  काही अपेक्षित अशा या मागण्या या पूर्ण करण्याच्या व सोडवण्याचा प्रयत्न दिलीप बापू धोत्रे यांनी केलेला आहे. आणि त्याला यश देखील आले आहे . कुस्तीगीरां च्या अडचणी कुस्तीगीर आखाड्यात येण्याअगोदर दिलीप बापूंनी त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. असे अमीत राज ठाकरे यांनी आज या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.       पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेच्या वतीने दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पहिल्...

"उद्या मनसेच्या वतीने कुस्तीची दंगल". विधानसभेला " मनसे" आता "दिलसे "उतरणार.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाच्या वतीने येणारी विधानसभा लढवली जाणार आहे.       पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मनसेचे उमेदवार म्हणून दिलीप बापू धोत्रे यांची सर्वप्रथम उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्या दोन दशकापासून मनसेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते दिलीप बापू धोत्रे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धडपडणारे एक युवा नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. कोरोना कालावधीमध्ये असंख्य कुटुंबांना आधार देणारे व्यक्तिमत्व म्हणून दिलीप बापू धोत्रे यांची ओळख संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्याला झालेली आहे. दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या आजपर्यंतच्या कार्याला सर्वसामान्य जनता ही प्रतिसाद देणार आहे असा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवा कुस्तीप्रेमी व व्यायाम प्रेमी यांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणू...

" महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा अजूनही अंत पाहू नये"..... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेले मनोज दादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अंतरावरील सराटी येथील उपोषण स्थळी भेट दिली. असता अभिजीत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जीवाची पर्वा  न करता ते मराठा समाजासाठी झटत आहेत, लढत आहेत. त्यांची सध्या तब्येत खालवलेली असून त्यांना बसायला किंवा बोलायला देखील येत नाही. त्यांच्या शरीरामध्ये त्राण राहिलेला नाही. मराठा समाजाचे भले व्हावे म्हणून तडफडणारा जीव बघितल्यानंतर महाराष्ट्र शासनाला विनंती करावीशी वाटते की महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मराठा समाजाचा अजूनही अंत पाहु नये. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या भावना या जरांगे पाटील यांच्याशी जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घ्यावा व मागण्या मान्य कराव्यात. अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र शासनाला अभिजीत पाटील यांनी केली.       अंतरावली सराटी येथे भेटीदरम्यान औदुंबर महाडिक दे...

" मनसेच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती चे आयोजन " ... दिलिप बापू धोत्रे.मनसे नेते

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे मनसेचे नेते दिलिप बापू धोत्रे यांनी मंगळवेढा येथे दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीचे आयोजन केले आहे.     या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नेते अमीत राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कुस्ती स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामधील मल्ल हे सहभागी होणार आहेत.     या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांना शंभर रुपये पासून ते पाच लाख रुपये पर्यंत चे बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा मनसेचे नेते दिलिप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.      पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील तालमींना आर्थिक निधी म्हणून मदत करण्याचे मनसे चा मनोदय आहे राज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या तालमींना दुरुस्तीसाठी व तेथील वस्तू व साहित्यांना आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.     या पत्रकार परिषदेस उपस्थित मनसेचे मान्यवर शशिकांत पाटील महाराष्ट्र केसरी समाधान घोडके माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद अरुण कोळी आदी उपस्थित होत...

"आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आपले पाय घट्ट रोवले"

इमेज
"पंढरपूर ( प्रतिनिधी) विधानसभेच्या निवडणुकीचे वारे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर वाहू लागलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये देखील असेच निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागलेले आहे. प्रत्येक पक्षाचे नेते म्हणवणारे आता भावी आमदार म्हणून स्वतःला डिजिटल फ्लेक्स वर झळकवू लागलेले आहे.      पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गत विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये समाधान अवताडे यांनी बाजी मारत भाजपाचा उमेदवारीवर ते निवडून आले. एकूण तीन विधानसभेचा अनुभव गाठीशी असलेले समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या मतदारसंघांमध्ये मतदार आपल्याला आपल्या कार्याला प्रतिसाद देतात किंवा कसे हे जाणून घेतलेले आहे. 60 ते 65 हजार मतदान त्यांनी कायमस्वरूपी आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेले आहे. आमदार समाधान दादा अवताडे यांना मानणारा मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील मतदार त्याचप्रमाणे पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये देखील त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून आता समाधान दादा अवताडे यांच्या कार्याला मानणारा व त्यांच्या कार्...

" आमदार साहेबांना मतदारांचे "समाधान" करण्यासाठी खूप पळावे लागणार" ... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेचे मत.

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) येत्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका या जाहीर होतील, आणि या विधानसभेच्या  निवडणुकीमध्ये आजी-माजी आमदार, भावी आमदार, आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.      पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सध्याचे आमदार समाधान दादा अवताडे त्याचप्रमाणे भाजपा या पक्षाचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि त्याचबरोबर गत विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये थोडक्या मताने पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके असे तगडे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये  ठामपणे उभे रहाणार समजले जातात .आणि आता नवीन भावी आमदार म्हणून प्रसिद्धीला येऊ पाहत असलेले डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांचे पुतणे अनिल सावंत हे देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहण्याची त्यांची तयारी आता सुरू झाल्याची दिसून येत आहे. मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी तर आपली उमेदवारी केव्हाच जाहीर केलेली आहे ते देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सक्रिय झाल्याचे आज रोजी ला दिसत आहे.     या सर्व पक्षीय इच...

गौराई घ्या सणाला " लाडकी बहीण योजनेचा देखावा" देगाव येथील घाडगे वस्ती येथील लखन घाडगे यांच्या घरी नाविन्यपूर्ण देखावा

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावातील घाडगे वस्ती या ठिकाणी लखन विलास घाडगे, व अविनाश विलास घाडगे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गौराईचे स्वागत केले जाते.       गौराईच्या सणानिमित्त घाडगे कुटुंब हे प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण देखावा ते आपल्या गौराईच्या सणानिमित्त करतात प्रत्येक वर्षी समाज प्रबोधनात्मक तसेच समाज जागृती चे देखावे ते तयार करत असतात त्यामुळे संपूर्ण देगाव या गावातील घाडगे वस्ती या ठिकाणी देगाव ग्रामस्थ हे घाडगे कुटुंबीयांच्या घरी गौराईचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून जातात.      कोरोना कालावधीमध्ये गौराईच्या समोर कोरोना रोगापासून कसा बचाव करावा याचा देखावा तयार करण्यात आला होता. या देखाव्याला भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली मिळाली होती सतत नाविन्याचा शोध व समाज प्रबोधन करण्याची घाडगे कुटुंबीयांची धडपड पाहता यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली असून या लाडक्या बहिणीची माहिती त्याचप्रमाणे बँक खाते कसे उघडावे व लाडके बहीण योजनेचा अर्ज कसा भरावा अशा पद्धतीचा देखावा घाडगे यांनी...

दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेत " लाडकी बहीण योजना" सुरू...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या वय वर्ष 21 ते 65 वर्ष मधील भगिनींसाठी दरमहा पंधराशे रुपये भगिनीच्या खात्यामध्ये जमा होणार असून अशी खाते पंढरपूर येथील ती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटर येथे आपले बँकेतील खाते उघडून या या बँकेतील खात्यावर भगिनींसाठी शासनाने लाडकी बहीण योजना चे पैसे जमा होतील. या लाडकी बहीण योजनेचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन मर्चंट बँकेचे अध्यक्ष शितल तंबोली व उपाध्यक्ष वसंत शिखरे यांनी केले आहे.      पंढरपूर शहरातील अन्य बँकेच्या बरोबरीने दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेने महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे याचा लाभ आता भगिनींनी घ्यावा

अनिल सावंत झाले सक्रिय... गणेशोत्सव निमित्ताने विविध उपक्रम..

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून येत्या विधानसभेलाआपली उमेदवारी असणार असल्याची माहिती अनिल सावंत यांनी देऊन पंढरपूर तसेच मंगळवेढा शहर व तालुक्यामधून आपला जनसंपर्क वाढवण्यावर सावंत यांनी भर दिलेला आहे.         मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मंगळवेढा तालुका व शहर या परिसरातील बेरोजगार तसेच शेतकरी ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक संजीवनी देण्याचे काम अनिल सावंत यांनी केलेले आहे. त्यामुळे मंगळवेढा व सर्व तालुक्यामधून अनिल सावंत यांचा जन संपर्क हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि त्याच प्रमाणे पंढरपूर शहर येथे ते राहत असल्यामुळे पंढरपूर शहर व या परिसरातील ग्रामीण भागामधील अडीअडचणी समस्या याची त्यांना जाण आहे. या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामे त्याचप्रमाणे तरुण बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम आणि  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्याचे काम अनिल सावंत यांनी केले आहे.      अनिल सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने येत्या गणेशोत्सव सणानिमित्त पंढरपूर शहर व वि...

डॉ. निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले मोफत जन आरोग्यदायी योजना त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या योजनेचे उद्घाटन आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते झाले.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे राज्य शासन यांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य मोफत योजना त्याचप्रमाणे केंद्र शासनाचे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य मोफत योजना या दोन्ही योजनेचे शुभारंभ  ट्युलिप हॉस्पिटल या डॉ निकम यांच्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब बांधवांसाठी मोफत उपचार केले जाणार आहेत.       आज रोजी या महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मोफत आयोग आरोग्यदायी योजनेचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य तालुक्यामधील गोरगरीब जनतेचे आरोग्यविषयक तपासणी या मोफत करण्यात आले. या मोफत शिबिराला सर्वसामान्य जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला.     डॉक्टर निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सर्व रोगावरील उपचार हे केले जातात. या ठिकाणी हृदयरोग, मेंदू विकार ,अस्थिरोग त्याचप्रमाणे पोटाचे विकार त्वचा विकार ,प्लॅस्टिक सर्जरी सांधेदुखी सांधेरोपनअसे अनेक रोगांच्यावर उपचार केले जातात. आता हे उपच...

"राजकारणी लोकांनीच राजकीय स्तर खालवला आहे" .....असे वाटत नाही का?.

इमेज
 पंढरपूर (  प्रतिनिधी) 1990 नंतर राजकारणामध्ये बदल होत चालल्याचा आपल्याला दिसून येत आहे. तत्पूर्वी राजकारणामधील राजकीय नेते मंडळी हे सर्वसामान्य जनतेचे हित, त्याचप्रमाणे लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या सामाजिक संकेताला हे नेते मंडळी घाबरून होती. आपण दिलेले आश्वासन आपण जर पूर्ण करू शकलो नाही. तर लोक काय म्हणतील? याची भीती या राजकारणी नेते मंडळींना होती. परंतु जसजसे काळ पुढे जात राहिला त्याप्रमाणे समाजकारण, राजकारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चाललेला आपण पाहत आलो आहोत.       90 च्या दशकाच्या अगोदर कुठलीही निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये गावातील तसेच शहरातील त्याचप्रमाणे प्रत्येक गल्ली आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना, त्याचप्रमाणे तरुणांना या येत्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर कोणकोणती कामे करायचे आहेत. किंवा करणार आहोत याची माहिती देण्यासाठी हे नेतेमंडळी घरोघरी, गल्लोगल्ली व वाड्यावर जात असे. तेथील मतदारांच्या अपेक्षा त्यांची कामे ही काय आहेत. याची माहिती घेऊन व त्याप्रमाणे शासन दरबारी ही कामे केली जात असे. आणि सर्वसामान्...