पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने माझ्या प्रचार सभेत तेअडथळा आणतं आहेत." मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये माझ्या गाव भेटीच्या माध्यमातून मला मिळणारा प्रतिसाद तसेच बेरोजगार युवक तरुण आणि महिला वर्गांच्या मधून मला मिळणारा वाढता प्रतिसाद मतदारसंघातील विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी या गावी प्रचार सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले.      महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणावर तसेच विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून आम्ही असंख्य कामे केलेली आहेत. पंढरपूर शहर असो पंढरपूर तालुका असो किंवा मंगळवेढा तालुका असो या सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून गेलो आहोत. कित्येक गरजूंना मदत केली आहे. सर्वसामान्य जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेने पाहत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये प्रचार दौरा मध्ये फिरत असताना प्रत्येक गावांमधून वाड्यावस्ती मधून आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. त्यामुळेच माझ्या प्रचार सभेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्...

"मी केलेल्या कामामुळे मतदार मला पुन्हा निवडून देतील " .... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मी केलेल्या विकास कामामुळे मला पुन्हा एकदा मतदार निवडून देतील अशी मला खात्री आहे. असे मनोगत आमदार समाधान आवताडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.     आज भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या दुसऱ्या यादीमध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील उमेदवारी जाहीर करून त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याला कामाला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने त्यांना या ठिकाणातील उमेदवारी देऊन केलेली आहे.       आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले मला मिळालेला आमदारकीचा मोजका कालावधी, या कालावधीमध्ये मी अनेक विकास कामे या मतदारसंघांमध्ये आणलेले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न असो, तामदर्डी बंधाऱ्याचे काम असो, पंढरपूर शहरातील बेरोजगारांना हाताला काम मिळावे म्हणून एमआयडीसी मंजूर करण्यासाठी केलेले प्रयत्न असो, असे असंख्य विकासकामे मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक...

" समाधान आवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे जल्लोषात केले स्वागत "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी भाजपा पक्षाने जाहीर केली.      भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पंढरपूर येथे समाधान आवताडे व परिचारक यांच्यामध्ये समेट घडवण्याच्या उद्देशाने आलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत पंढरपूर शहरांमध्ये समाधान दादा अवताडे यांच्या कार्यालया समोर समाधाना अवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.     समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा भाजपाची उमेदवारी मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत होते. समाधान आवताडे हे आपल्या कार्याचे जोरावर पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून विजयी होणार. समाधान आवताडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देऊन आपला आनंद व्यक्त केला.

"दि पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ बॅंकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा " ....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने पंढरपूर येथील व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून ओळखली जाणारी आणि सर्व सुविधा व तत्पर सेवा ग्राहकांना देणारी सहकार क्षेत्रातील अग्रेसर बॅंक म्हणून ओळखली जाणारी दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर या बॅंकेला मोबाईल बॅंकींगची सेवा ग्राहकांना देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे.      सोलापूर जिल्ह्यातील दि.पंढरपूर मर्चंट काॅ.र्ऑफ.बॅंक पंढरपूर ही ग्राहकांना मोबाईल सेवा देणारी पहिली बॅंक म्हणून मान मिळाला आहे.ग्राहकांना तत्पर सेवा देणारी,व हीत जपणारी बॅंक म्हणून ओळख असलेल्या या बॅंकेतील सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद ‌कार्यामुळे ही सेवा ग्राहकांना देण्याचा बहुमान मिळाला आहे.     दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर चे व्यवस्थापक, शाखा प्रमुख, सर्व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

"निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्ते माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले तर मी निवडणूक लढवणारच"...... वसंत नाना देशमुख

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आजच्या शुभ मुहूर्तावर वसंत नाना देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.        उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये वसंत नाना देशमुख म्हणाले आम्ही आज शुभ मुहूर्त पाहून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षातील अध्यक्षांना खासदारांना त्याचप्रमाणे पवार साहेबांना आम्ही भेटून उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्यांनीं आमच्या या भेटीमध्ये सकारात्मक भूमिका नेते मंडळींनी व्यक्त केली आहे. म्हणून आम्ही आज उमेदवारी अर्ज भरत आहोत. असे वसंत नाना देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले.       वसंत नाना देशमुख आपल्या मुलाखतीमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं ठरवलं तर मी निवडणूक माघार घेणार नाही. पवार साहेबांच्या कडे या निवडणुकीसाठी 11 जणांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. कुणाला राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाची उमेदवारी मिळते हे लवकरच कळेल. माझ्या या विचाराशी सहमत असलेले असंख्य ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते व मित्र मंडळ ते माझ्य...

"मनसेचे नेते दिलीप बापू यांनी महिलांना सतत सहकार्य केले आहे " डॉ.कराळे ताई

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सतत सहकार्य करण्याचे काम मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे करीत आहेत.पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य महिला या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जावा म्हणून प्रयत्न करीत असतात.असंख्य महिला आपले गृहोपयोगी वस्तू तयार करून आपले कुटुंब चालवत असतात.अशा गरजू महिलांना आर्थिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून यंदाच्या दिपावलीच्या निमित्ताने पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिर येथे आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमानाने दिपावलीच्या निमित्ताने खाद्यपदार्थाचे व अन्य दिवाळीनिमित्त आकाश कंदील, फराळ सामान,पणती,मेणबत्त्या, हस्तकलेच्या वस्तू वीजेची उपकरणे,आदी महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी या ठिकाणी स्टॉल वर ठेवण्यात आले आहेत.अशी माहिती आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्या अध्यक्षा डॉ.कराळेताई यांनी या एक्सपो च्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी दिली.     मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.दिलिप ब...

"पंढरपूर शहरातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत "..... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत म्हणून आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एक्सपो भरवला आहे.     मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील व पंढरपूर शहरातील महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी मनसे व आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्यातर्फे आयोजित हा उपक्रम असून दिपावलीच्या सणानिमित्त सर्वसामान्य जनता ही सणाची खरेदी करत असते.या सणाची खरेदी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित केले आहे.दोनशे स्टॉल हे महिलांच्या साठी मोफत ठेवले आहे.या स्टॉल मधून विविध प्रकारच्या दिपावलीच्या वस्तू,दिवे, पणती,उटणे, आकाशकंदील,दिपावलीचे गोडधोड पदार्थ, तसेच रेडीमेड कपडे,आदी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.     या स्टॉल वरुन लोकांनी खरेदी करावी.जेणे करुन महिलांना आर्थिक बाबतीत लाभ होईल.महिला आर्थिक बाबतीत सक्षम झाल्यास त्या आपले कुटुंब व्यवस्थीत चालवू शकतात.महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‌तर...

"सुधीर भोसले यांची जिल्हा संघटक म्हणून निवड" ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा संघटक पदी निवड

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) देशाचे नेते शरद चंद्रजी पवार यांच्या विचाराचा वारसा पक्षाची तत्वे व ध्येय धोरणे ही तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. असे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ भोसले यांची सोलापूर जिल्हा संघटक पदी निवड झाली त्या प्रसंगी बोलत असताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.      पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे कट्टर समर्थक शरद पवार प्रेमी सुधीर भोसले यांची पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते जिल्हा संघटक पदी निवडीचे पत्र देण्यात आले.      यावेळी उपस्थित मान्यवर माजी महापौर महेश कोठे, सांगली व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाब मुलानी यांच्यासह राष्...

तुतारी कोणाच्या हाती द्यावी? साहेबांना पडलेले कोडे.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील उमेदवार यांची उमेदवारी मागण्यासाठी चाललेली धडपड, या धडपडी वरून काही दिवसापूर्वी "शरद पवार संभ्रमा अवस्थेत" हे वृत्तांकन केले होते. आम्ही केलेले हे वृत्तांकन आजच्या स्थितीला देखील बरोबर ठरते की काय?  असे वाटू लागले आहे.      पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि त्याच भाजपा पक्षाचे विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजप निवासी असलेले उमेदवार त्यापैकी समाधान आवताडे ही भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि प्रशांतराव परिचारक भाजपा कडून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही?  या शंके मुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या तुतारीला हाती घ्यावे की काय?  असे विचार करत त्यांनी आपले असंख्य कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते मंडळी शरद पवार यांच्या भेटीला पाठवून अंदाज घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या प्रयत्नाला अद्याप तरी यश आलेले दिसून येत नाही.     परिचारक गटाचे कार्यकर्ते व पांडुरंग परिवार या परिवारातील अ...

"साहेब....मला वाचवा असे विरोधक म्हणू लागले " ... पायाखालची वाळू घसरू लागली वाटतं....... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा तालुक्यातील प्रत्येक गावांमधून आपली भूमिका स्पष्ट करताना अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यातील असंख्य समस्या अडचणी,रखडलेली कामे, पाणीप्रश्न, तरुण बेरोजगारांचे प्रश्न,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला मिळत असलेला कमी दर अशा अनेक गोष्टी वर कायम स्वरुपी तोडगा गेल्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत या विरोधकांनी का काढला नाही? ज्या शरद पवारांच्या पक्षामधून त्यांनी सत्तास्थाने मिळवली त्याच शरद पवारांना ऐनवेळी संकटात टाकून पळ काढणारे हे विरोधक आता " साहेब..मला वाचवा " म्हणू लागले.मी माढा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार म्हणून उभा राहणार आहे .हे विरोधकांना कळाले पासून त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.असे श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.      माढा तालुक्याला विकासापासून दूर ठेवण्याचे पाप विरोधकांनी केले आहे.त्याचे प्रायश्चित्त त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून घ्यावे लागणार आहे.     माढा तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत.उद्योग व्यापारासाठी आवश्यक रस्ते चा...

" पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये" कमळ" प्रशांत परिचारक यांनी फुलवले"....प्रणव परिचारक

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता जाहीर होताच सर्व पक्षांमधील हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे आज दिसून येत आहे.      पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील भाजपच्या गोठा मध्ये यंदाची विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा भाजपामध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांना गेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांचा परिचारक गट आणि पांडुरंग परिवार या परिचारक गटाच्या समूहाने भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांना निवडून आणण्याचे मोठे काम केलेले आहे. यापूर्वी भाजपाचे कमळ या पंढरपूर मंगळवेढा परिसरामध्ये कधीही फुललेले नव्हते. परंतु या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भाजपाचे कमळ फुलवण्याचे काम प्रशांत परिचारक यांनी केले आहे. असे वक्तव्य युवा नेते प्रणव परिचारक यांनी पत्रकारांच्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.      गेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपाचे समाधान आवताडे यांना निवडून आणण्याचे काम केल्यानंतर काही दिवसातच समाधान आवताडे व परिचारक यांच...

"निवडणूकी मध्ये परिवर्तन होणार हे दिसू लागले "..... मतदार आता दादा नव्हे फक्त आबा म्हणू लागले

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदरच मतदार म्हणू लागले आता दादा नव्हे फक्त आबा म्हणू लागले .     माढा मतदारसंघात गेली पस्तीस वर्षे एकच बाजूने भाकरी भाजली जात होती .आता ती भाकरी करपू लागली आहे.याची जाणीव या मतदारसंघातील मतदारांना होऊ लागल्याने आता या माढा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.असे चित्र या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येऊ लागले आहे.     गेली पाच सहा टर्म विधानसभेच्या निवडणुकीत बबनदादा शिंदे यांना जनतेनी निवडून दिले परंतु कोणताच अमुलाग्र बदल या मतदारसंघात झाला नाही.शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असो की तरुण बेरोजगारांचा प्रश्न असो.पाणी उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था या माढा तालुक्यात कित्येक गावांमधून दिसून येते.आपले बगलबच्चे सांभाळण्यात इतकी वर्षे गेली.अशी समजूत माढा मतदार संघातील जनतेची झाली आहे.     या विधानसभा निवडणुकीत बदल हवा आहे.परिवर्तन हवे आहे.अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात तयार झाली आहे.प्रस्थापित आमदारांनी विकासाची गंगा फक्त आपल्या भोवतीच फिरवली , विकासाची गंगा माढा मतदारसंघात कुठेच...

"आम्ही गरीब आठ ते दहा विद्यार्थ्यांंची फी माफ करुन त्यांना मदत करतो"..... डॉ.शीतल शहा.

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) आम्ही गरजू गरीब मुलांना शालेय फी माफ करुन त्यांना मदत करतो.त्यांना शालेय आवश्यक वस्तू देऊन मदत करतो.असे आपल्या मनोगत व्यक्त करताना डॉ.शीतल शहा म्हणाले.     आज माॅडर्न एज्युकेशन सोसायटीचे अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर येथे या अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर या शैक्षणिक संस्थाची पन्नास वर्षांकडे वाटचाल सुरू झाली असून त्या प्रसंगी बोलत असताना डॉ.शीतल शहा पुढे म्हणाले की काही वर्षांपूर्वी कोरोना ही महामारी संपूर्ण जगभर पसरली होती.या दोन वर्षांच्या काळामधील शैक्षणिक फी ही ५०/टक्के रक्कम ही माफ केली आहे.गरीब हुशार गरजू विद्यार्थ्यांना मदत ही कायमस्वरूपी केली जाते.या अरिहंत पब्लिक स्कूल ला पंढरपूर मधील सर्व पालकांनी नेहमी प्रोत्साहन दिले आहे.या पालकांच्या मुळे आम्ही या संस्थेला प्रगती पथावर नेत आहोत.असे संस्थेचे अध्यक्ष डॉ शीतल शहा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.    या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर डॉ.अर्जुन भोसले डी वाय एस पी पंढरपूर, किर्तनकार जयवंत बोधले महाराज, डॉ.पटवा , उज्ज्वल दोशी, वैशाली दोशी,प्रतिभा दोशी, मिलिंद शहा, पत्रकार वीरेंद्र उत्पात,तोंडे ता...

तात्यासाहेब साळुंखे " महाराज" यांनी केला बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांचा यथोचित सत्कार

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) आजच्या युवकांनी व्यायामाची आवड जोपासली पाहिजे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढते. शरीर व मन सुदृढ राहण्यास व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे. असे पंढरपूर येथील मुद्रांक लेखणिक तात्या महाराज साळुंखे यांनी आज पंढरपूर येथे एकलव्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांचा यथोचित सत्कार करतेवेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.       या सत्कार समारंभा वेळी उपस्थित मान्यवर भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे प्रभारी अक्षयजी वाडकर, अर्जुन महाराज जाधव, मुकेश लकेरी, आबासाहेब जगताप, किशोर झेंड ,प्रदीप साळुंखे, युगंधर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.        एकलव्य पुरस्कार प्राप्त विजेते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी आपल्या सत्कार समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले सध्याच्या जीवनामध्ये सर्वत्र धक्काधकीचे जीवन शैली ही दिसून येत आहे. सध्याच्या काळामध्ये युवकांचे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे. तरुणांनी दररोज व्यायाम करावा व आपले शरीर सुदृढ ठेवा...

"जे दलित बांधव दीक्षाभूमी यात्रेला जाऊ शकले नाहीत.त्यांना ही यात्रा घडवणे हे माझे कर्तव्य ".... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दलित बांधव हे बांधव नागपूर या ठिकाणी धम्मचक्र या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेऊ शकत नव्हते, जेणेकरून या ठिकाणी जाऊन दीक्षाभूमी चे घेतलेले नाहीत. असे असंख्य दलित बांधव, माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जाण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार ही धम्म यात्रा आज रोजी सायंकाळी नागपूरच्या  दीक्षाभूमीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. अशी माहिती मनसेचे नेते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी पत्रकारांना दिली.        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पर्यंतच्या कार्य काळामध्ये असंख्य सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे करत असते. सर्व धर्म समभाव या या भावनेने ही धम्मयात्रा आयोजित केलेली आहे.       यापूर्वी काही दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अजमेर या पवित्र ठिकाणी जाण्...

"जो काबील होगा, वही आमदार होगा"......... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये काल रोजी माढा महोत्सव व कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला. त्याचप्रमाणे विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी अभिजीत आबा बोलत असताना आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले की, एक पारंपारिक म्हण आहे." राजा का बेटा राजा बनेगा "परंतु आजच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे." जो काम करेगा ,जो काबिल होगा वही राज करेगा, वही आमदार होगा " असे त्यांनी माढा विधानसभेमधील विरोधक असलेले बबन दादा शिंदे यांच्यावर खोचक टीका केली.       माढा तालुक्यातील असंख्य गावे ही विकासापासून वंचित आहेत. शेतकरी बांधव हा आपल्या ऊसाला व अन्य पिकांना योग्य दर मिळत नाही म्हणून नाराज आहे. या शेतकरी बांधवांना आम्ही त्यांच्या ऊसाला चांगला दर देऊ ,जास्तीचा दर देऊ असे आश्वासन दिलेले आहे. व ते आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे. गेली 35 वर्ष या माढा तालुक्यामध्ये शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे. परंतु या सत्तेचा वापर त्यांनी कधीही सर्वसामान्य माढा मतदारसंघातील जनतेसाठी केलेला दिसून येत नाही. त्यांनी जर विकास...

"मुंबई, पुणे सारखी प्रगती व सुधारणा माढा मतदार संघात करणार " ..... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा मतदारसंघातून आपला संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यास सुरुवात केली आहे.गावभेट दौरा, घोंगडी बैठक, त्याचप्रमाणे विविध सामाजिक, सांस्कृतिक महोत्सव व कार्यक्रम करून आणि माढा तालुक्यातील शेतकरी बांधवांचा आवडती बैलगाडा शर्यत, तरुणांच्या आवडीचा कुस्ती स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित करुन अभिजीत आबा पाटील हे माढा तालुक्यातील मतदारांना आपलेसे करण्यात यशस्वी झाले चे दिसून येत आहे.     माढा तालुक्यातील असंख्य तरुण मतदार हे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात स्थायिक झालेले आहेत. या आपल्या मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी गुरुवारी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी विकासाची व्हिजन असलेले चेअरमन अभिजीत पाटील यांना या मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. पिंपरी चिंचवड भागातील मतदारांना कलासागर हॉल येथे सकाळी तर पुणे येथील मतदारांशी हडपसर येथील राजीव लॉन्स या ठिकाणी जनस...

"मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) धम्म चक्र परिवर्तन दिन दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर १४ आक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी आपल्या अनुयायी सोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.हा धम्म चक्र परिवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो.      पंढरपूर येथील या धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या मिरवणुकीत मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे सहभागी होऊन त्यांनी या परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.      यावेळी दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.     या मिरवणूकीचे आयोजन भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ चे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्व गोड, जेष्ठ नेते नानासाहेब कदम,अमितराज उबाळे, शिवाजी चंदनशिवे,रवि सर्वगोड, सचिन भोरकडे, किशोर खिलारे, विठ्ठल वाघमारे, सागर गायकवाड,आदी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.     यावेळी गाण्याच्या तालावर लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

"माढ्यातील मतदारांना अभिजीत आबा पाटील यांनी " वेड" लावले."

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी या माढा तालुक्यातील राजकीय वातावरण हे ढवळून निघू लागलेले आहे.     श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आपण माढा विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगून माढा विधानसभेला जोडून असलेले पंढरपूर तालुक्यातील 40 ,42 गावांचा समावेश आणि या गावांमधून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्याचा उद्देशाने व या ऊस उत्पादकांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्याच्या महत्वकांक्षामुळे त्यांनी या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे. माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी प्रचंड प्रमाणात जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यानिमित्ताने सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचा आवडता बैलगाडा शर्यत आणि कुस्तीप्रेमी तरुणांसाठी माढा केसरी या कुस्त्यांचे आयोजन करून त्यांनी एक प्रकारे संपूर्ण माढा तालुका ढवळून काढलेला आहे. आणि माता भगिन...

" मालक.... तुम्ही निवडणूकीला उभा रहा ढील्ल पडू नका, आम्ही हाय संगतीला" ... कार्यकर्ते

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) २०१९ च्या पोट निवडणूक लागली असता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये विधानसभेची ही जागा कै.भारत भालके यांनी विविध पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.व ते यशस्वी झाले होते.  त्यांच्या दुःख द निधनानंतर या ठिकाणी पोट निवडणूक लागली.तेव्हा प्रशांत परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य होते.त्यामुळे त्यांनी भाजपा कडे उमेदवारी मागुन देखील मिळाली नाही.आमदार समाधान दादा अवताडे यांना उमेदवारी दिली गेली.व त्यांना या निवडणुकीत सहकार्य करावे अशी विनंती भाजपा चे  श्रेष्ठींनी केल्यामुळे ते या निवडणुकीत उमेदवार म्हणून नव्हते.सर्व यंत्रणा व  लोकसंग्रह मोठा असूनसुद्धा ते दूर राहिले.आणि समाधान दादा अवताडे यांना भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यास मदत केली.    नैसर्गिक नियमानुसार प्रशांत परिचारक यांना आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत समाधान दादा अवताडे यांनी मदत करायला हवी.कारण समाधान दादा अवताडे यांना निवडून आणण्यासाठी परिचारक यांनी प्रयत्न केले व त्यांना विजयी करून दिल्यामुळे प्रशांत परिचारक यांना येत्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी संधी द्यावी.व समाधान दाद...

"मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा दुष्काळ कायमचा संपणार"..... आमदार समाधान दादा अवताडे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) मंगळवेढा उपसा सिंचन या योजनेला समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यातील 111 कोटीचे टेंडर निघून नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला.     या पाणी उपसा सिंचनाच्या कार्यक्रमानंतर आमदार समाधान दादा अवताडे यांनी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मंगळवेढा उपसा सिंचनासाठी दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आवश्यक असलेला निधी अष्टयात्तर कोटी रुपये 43 लाख हे टेंडर काल रोजी प्रसिद्ध झाले असून निविदा मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या मंगळवेढा उपसा सिंचनावर टीका करणाऱ्या विरोधकांचे तोंड आता बंद होणार आहे.      मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावांचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे. असे समाधान आवताडे यांनी आज रोजी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मंजुरी मिळाली होती. परंतु त्यावेळी केवळ राजकारणासाठी ही लोकसभेच्या तोंडावर मंजुरी दिली असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका विरुद्धकांनी केली होती. परंतु मंजुरीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपर...

शरद पवार संभ्रमात?.... पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये" तुतारी " कुणाच्या हाती द्याची?....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) विधानसभेच्या निवडणूकीचे सद्या वारे वाहू लागले आहे.लोकसभेच्या निवडणूकी मध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद जनतेतून मिळाल्या मुळे सद्या या महाविकास आघाडीला महत्व प्राप्त झाले आहे.    शरद पवार यांच्या पक्षाकडे सद्या उमेदवारी मिळावी म्हणून सर्व पक्षीय राजकारणी प्रयत्न करत आहेत.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपण आपल्या मतदारसंघा मधून कसे निवडुन येऊ शकतो हे सांगू लागले आहेत.     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये देखील अशीच अवस्था निर्माण झाली आहे.पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांची भेट घेऊन उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत.शरद पवार यांच्या पक्षाला  महाराष्ट्र मधून मिळणार प्रतिसाद आणि शरद पवारांच्या सारख्या किमयागार माणसा मुळे आपण निवडून येऊ शकतो याची खात्री या सर्व इच्छुक उमेदवारांना  झाल्या मुळे ते शरद पवारांना भेटून उमेदवारी साठी प्रयत्न करु लागले आहेत.     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक मान्यवर नेते मंडळी हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.शरद पवार यांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून त...

"स्त्री ही नवनिर्मितीची देवता आहे" .... अनिल दादा सावंत

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) स्त्री ही नवनिर्मितीची देवता आहे. नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव मानला जातो. धरती माता ज्याप्रमाणे माणूस जातीचे पालन पोषण करते नवनिर्मिती करते त्याचप्रमाणे स्त्री देखील नवनिर्मितीची देवता आहे. ज्याप्रमाणे धरणी माता विविध अन्नधान्य देऊन मानव जातीचे पालन पोषण करते त्याचप्रमाणे स्त्री ही देखील नवनिर्मितीची ज्वलंत मूर्ती असून तिच्या नवनिर्मितीमधून अनेक शूरवीर, विद्वान, संशोधक यांना जन्म देण्याची स्त्री शक्ती मध्ये ताकद आहे. या स्त्री शक्तीला प्रत्येक मानव जातीने वंदन करायला हवं तिचं रक्षण करायला हवं तिचा आदर करायला हवा. असे मनोगत आज रोजी अनिल सावंत यांनी दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी त्याने आपले मनोगत व्यक्त केले.       दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री शक्तीला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या कला कौशल्याला वाव देण्याच्या उद्देशाने व चार भिंतीमध्ये कायमस्वरूपी आपल्या स्वतःला बंदिस्त करून घेणाऱ्या या स्त्रीला नवरात्राच्या महोत्सवाच्या निमित्ताने तिला या दांडियाच्या माध्यमातून एक प्रकारे प्रे...

"आराधी व तृतीय पंथीय असलेल्या लोकांना शासनाच्या सर्व योजना चा लाभ मिळवून देणार"...... मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी स्टेशन रोड नवरात्र महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमानाने शारदीय महोत्सव यांच्या निमित्ताने पंढरपूर येथे संपन्न झाला.       महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी बोलताना म्हणाले की नवरात्र महोत्सव असल्याकारणाने वंचित दिन दुबळ्या सर्वसामान्य घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजातील आई भवानीचे भक्त म्हणून सेवा करणारे आराधी भक्त गोंधळी देवदासी तसेच तृतीयपंथीय यांचा सन्मान करण्यात यावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व देवी भक्तांचे त्यांच्या उपवासा निमित्ताने फराळ वाटप साडी चोळीचा आहेर देण्यात आला. याप्रसंगी सुमारे 300 देवी भक्तांचा सहभाग होता.        दिलीप बाबू धोत्रे यांनी आपल्या मनोगतामधून त्यांनी बोलत असताना म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचा लाभ करून देणार आहे आई भवानी मातेच्या चरणी नतम...

"विकासकामे पाहून विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरुन लागली आहे ".... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . विरोधक माझ्यावर टीका करीत आहेत की हजारो कोटीची विकास कामे कुठे दिसून येत नाही. परंतु मी त्या विरोधकांना सांगू  की तुम्ही मतदार संघातील गावांमधून फेरफटका मारलाच नाही तर तुम्हाला विकासकामे कशी दिसून येतील. आम्ही केलेली विकास कामे ही पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे.       पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सामाजिक आणि सार्वजनिक विकास कामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सरकारने खूप निधी व सहकार्य केले आहे.उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व सहकारी मंत्री या सर्वांनी सहकार्य केले आहे.     मंगळवेढा उपसा सिंचन योजना मुळे मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.तामदर्डी बंधाराची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.त्यामुळे शेकडो एकर जमीन ओलीता खाली येऊन या भागा मध्ये सुजलाम सुफलाम होईल.त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी द्यावा.म्हणजे या भागात पाणी कमी पडणार नाही.पूर्वी पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था होती.या बंधारा मुळे लोकांचा पाणी प्रश्न सुटला आहे.     टेंबूचे येणार नाही असे लोक म्हणत होते....

"विठ्ठल परिवाराबाबत चुकीचा संदेश देणाऱ्याना सडेतोड उत्तर दिले जाणार " भगिरथ भालके

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये "विठ्ठल परिवारा बाबत चुकीचा संदेश विरोधक पसरवत आहेत. त्यांना सडेतोड उत्तर दिले.  जाणार" असे विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल परिवाराच्या वतीने कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात होता. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.   विठ्ठल परिवार हा एकजूट असून या विठ्ठल परिवाराची चुकीची माहिती काही विरोधक मतदारसंघांमध्ये पसरवीत आहेत. अशा विरोधकाला सर्वसामान्य जनतेने व कार्यकर्त्यांनी विरोध करावा.      पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार अवताडे म्हणतात की तीन हजार कोटी रुपये निधी आणून विकास केला. परंतु हा विकास कुठे दिसून येत नाही. अशी टीका देखील भगीरथ भालके यांनी आज रोजी केली.      नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर शहरातील तसेच अन्य गावांमधून आलेले फेरीवाले व रस्त्यावर बसून आपली दुकाने थाटणारे गोरगरिबांच्या वर अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांनी त्यांची रोजी रोटी हिसकावून घेण्याचे काम तत्कालीन प्रशासकांनी केले. परंतु या विरोधात आवाज आमदार अवताडे यांनी उठव...

" समाधान आवताडे हे पाणीदार आमदार आहेत. समाधान आवताडे यांनी जनतेचे समाधान केले आहे".. देवेंद्र फडणवीस

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान अवताडे हे या तालुक्याचे पाणीदार आमदार आहेत.असा गौरवपूर्ण उल्लेख करीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी कौतुक केले.आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मधील  मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी,तामदर्डी बंधारा कर्जाळ कात्राळ हुलजंती,पौट,गोणेवाडी,ले.चिंचाळे NH 166.रस्ता या सर्व विकासकामांचा कार्यारंभ सोहळा प्रसंगी व्यक्त केले.     2019 च्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये मंगळवेढा येथे आल्यानंतर मी तुम्हा सर्वांना एक आवाहन केले होते. मला 106 वा आमदार मला निवडून द्या. मी करेक्ट कार्यक्रम करेन. आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनो समाधान दादा अवताडे यांना विजयी करून दिल्यामुळे समाधान आवताडे यांच्या सहकार्याने मी करेक्ट कार्यक्रम करू शकलो. असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी मनोगत व्यक्त केले.      आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे पंढरपूर मंगळवेढा भ...

"आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कार्याचा आज गौरव होणार " देवेंद्र फडणवीस आज विकासाची नवीन घोषणा करणार....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये शासनाकडून खेचून आणलेल्या हजारो कोटीच्या कामाचा त्याचप्रमाणे नवीन मंजूर असलेल्या 24 गावचा पाणी योजना, त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा कार्यारंभ आणि पंढरपूर तालुक्याला आज पर्यंत बेरोजगार तरुणांना अनेक विरोध-माजी आमदार लोकांनी एमआयडीसी करतो म्हणून झुलवत ठेवले होते. त्या एमआयडीसीच्या कार्यारंभचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.      पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मोजक्याच आमदारकीच्या कारकिर्दीच्या वर्षामध्ये असंख्य विकासकामे ही शासनाकडून खेचून आणलेली आहेत .हजारो कोटीचा निधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध कामासाठी मंजूर करून आणला. त्याचप्रमाणे आपल्या गाव भेटीच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला आपलेसे करण्याचे कौशल्य त्यांनी मिळवलेले असून या गाव भेटीच्या दौऱ्यामुळे त्यांची कार्यसम्राट म्हणून ओळख ...

माढा विधानसभा निवडणुकीत दोन साखर सम्राट आमनेसामने..... " अभिजीत आबा पाटील धुरळा उडवणार "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध उपक्रम आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.महिलांच्या साठी खेळ मांडियेला, माढा केसरी कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यत इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित करुन माढा तालुक्यातील सर्व गावांमध्ये गावभेट दौरा करून शेतकरी कष्टकरी, व्यापारी, तरुण वर्ग, महिला भगिनी,या सर्वांना आपलेसे करण्यात अभिजीत आबा पाटील यशस्वी झाले चे दिसून येत आहे.        माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळाची हमी आणि सर्वात जास्त दर देण्याची त्यांनी दिलेली हमी यामुळे अभिजीत आबा पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याच दिवसात लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.एक शेतकऱ्यांचा मुलगा साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर फक्त शेतकऱ्यांचे हीत जपत असतो. हे अभिजीत आबा पाटील यांनी दाखवून दिले आहे.      माढा तालुक्यात अभिजीत आबा पाटील यांचा शिरकाव झाल्यामुळे माढा तालुक्यातील सत्ताधारी आमदारांचे "टेंशन" वाढल्याचे दिसून ये...

"मी बोलतो कमी....…..पण कामे माझी जास्त असतात" ... आमदार समाधान दादा अवताडे विकासकामांचा कार्यारंभ सोहळा

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पहिल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो कोटींचा निधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामासाठी आणलेला आहे.आपल्या मतदारसंघातील विविध गावांमधील रस्ते,समाज मंदीर, पिण्याच्या पाण्याची सोय, संविधान भवन, मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना भेडसावणारा पाणी प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून एम आय डी सी ची मंजुर करुन आणण्यासाठी केलेले अथक प्रयत्न या प्रयत्नांना आलेले यश पहाता आमदार समाधान दादा अवताडे म्हणतात ते बरोबर आहे." मी बोलतो कमी...पण कामे माझी जास्त असतात" अशी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांत समाधान दादा अवताडे यांची झालेली आहे.      ‌आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा उद्या दिनांक ७ आक्टोबर २०२४ रोजी  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.   आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास योजना मंगळवेढ...

"शाळेचे संस्थापक किंवा शिक्षणाधिकारी त्रास देत असतील तर मला सांगा.....त्यांचा बंदोबस्त केला जाईल." .... मनसे म्हणजे एक प्लान प्राॅब्लेम स्वाॅल ".....मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माझ्या शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनींना शाळेचे संस्थापक किंवा शिक्षणाधिकारी त्रास देतात किंवा देत असतील तर मला सांगा त्यांचा बंदोबस्त केला जाईल. मनसे म्हणजे एक प्लान प्रॉब्लेम सॉल्व असे मनसेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना शाखा पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी आपले मत व्यक्त केले.       शिक्षक शिक्षिका या बंधू-भगिनींना कोणतीही अडचण त्यांच्या शैक्षणिक कार्याचे बाबतीत येत असेल तर मला जरूर सांगा मी इथे अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही. आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवंत शिक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत. या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागामधून आलेली आहे ती तिचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून आलेल्या शिक्षिका भगिनीने जे मत व्यक्त केले त्या आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की 80 टक्के आदिवासी मुलं हे शिक्षण घेत आहेत आणि अशा दुर्गम भा...

"तरुणांनी आपले शहर सोडून परराज्यात व अन्य ठिकाणी नोकरीला जाण्याची मानसिकता तयार ठेवावी" ..... संदीप मांडवे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून आपल्या बेरोजगार सुशिक्षित युवक युवतींना भव्य नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याचा लाभ आपल्या परिसरातील तरुणांनी घ्यावा.      आपल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आजच्या या भव्य नोकरी महोत्सवा मधून नोकरी प्राप्त होताच त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे व त्याचप्रमाणे परराज्यात व अन्य जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास ती सोडू नये आपले शहर व गाव सोडल्याशिवाय मनुष्याची प्रगती होत नसते. तरी या तरुणांनी आपले गाव सोडून अन्य परराज्यात व जिल्ह्यात जाऊन काम करण्याची मानसिकता ही बाळगायला हवी. असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंढरपूर शहराचे युवक नेते संदीप मांडवे यांनी आज या भव्य नोकरी महोत्सवाच्या प्रसंगी व्यक्त केले.      आज अनिल दादा सावंत यांच्या भव्य नोकरी महोत्सवास पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व अध्यक्ष नेते हे या नोकरी महोत्सव कार्यक्रमास आ...

"तरुणांना रोजगार मिळणे ही काळाची गरज " "मी आमदार होऊ न होऊ मी काम करीत रहाणार "...... अनिल दादा सावंत

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही वाढलेली आहे. ही वाढलेली बेरोजगारांची लोकसंख्या पाहता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भव्य नोकरी मेळावा आयोजित करून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा मुलांना नोकरी मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या भावी नोकरी महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध 50 कंपन्या या ठिकाणी आलेल्या असून या कंपन्या मधून फार्मासिस्ट इंजिनियर ,आयटी इंजिनियर त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील उद्योग, आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी मोटार कंपन्या तसेच अन्य उद्योगधंद्यामधून या अनुभवी व कुशल पात्र, त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या युवकांना नोकरी दिली जाणार आहे.         ५० कंपन्यांमधून पाच हजाराच्या वरील कामगारांची संख्या या कंपन्यांना अपेक्षित असून आपल्या या रोजगार भव्य मेळाव्यामध्ये हजार ते दीड हजार युवकांनी आपली नोंदणी केलेली आहे. उपलब्ध नोकरीच्या संख्येने या दीड हजार विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध झालेली आहे. अशा तरुणांच्या कुटुंबाला आर्थिक...