" प्रभाग क्रमांक १२ हा डिजिटल प्रभाग करणार" .....अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल .
पंढरपूर ( प्रतिनिधी) असंख्य समस्याने भरलेला हा प्रभाग क्रमांक 12 या असंख्य समस्या बरोबरच या प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था मूलभूत मूलभूत सुविधाचा अभाव हा प्रभागामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही आणि या परिसरातील महिलांना आर्थिक बाबतीत सबला होण्याच्या उद्देशाने कुठला देखील उपक्रम या प्रभाग क्रमांक 12 मध्ये नाहीत. असा हा विकासाच्या सर्वच बाबतीत वंचित असलेला हा प्रभाग क्रमांक 12 मी पूर्णतः डिजिटल प्रभाग केल्याशिवाय राहणार नाही. असे प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
या प्रभाग क्रमांक 12 मधील असंख्य महिलांच्या हाताला काम नाही. या महिलांना विविध बचत गटाच्या माध्यमातून व विविध लघु उद्योगाच्या माध्यमातून ,घरगुती उद्योगाच्या माध्यमातून या महिलांना संसारासाठी चार पैसे मिळवण्याच्या उद्देशाने मी विविध उपक्रम या प्रभागामध्ये राबवणार आहे. या प्रभागातील महिला या होतकरू व गरजू आहेत. अशा या महिलांचे आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी आणि माता भगिनींना आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने मी या प्रभागामध्ये काम करणार आहे.
या प्रभाग क्रमांक 12 मध्ये असंख्य तरुण हे बेरोजगार आहेत. या बेरोजगार मुलांना मोठ मोठ्या परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून या ठिकाणी मार्गदर्शनपर केंद्र सुरू करणार आहे. की ज्या माध्यमातून या प्रभागातील मुले लोकसेवा आयोग त्याचप्रमाणे केंद्रीय सेवा आयोग या ठिकाणी उच्च पदस्त नोकरी मिळवण्यासाठी या मार्गदर्शन कार्यालयाचा व शिबिराचा लाभ या तरुणांना होणार आहे. या प्रभागातील मुला-मुलींना कॉम्प्युटर चे ज्ञान मिळवून देण्याचे उद्देशाने विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत. असे प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल यांनी आज मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रभागाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. या प्रभागामधील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मी कामे करणार आहे. असे देखील त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
या प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांच्या प्रचार फेरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा