"सर्व समाजाला आपलेसे करणारे व्यक्तिमत्व" आमदार समाधान दादा अवताडे.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा आमदार समाधान दादा अवताडे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. 

     पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेच्या मतदार संघाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे नेतृत्व म्हणजे समाधान दादा अवताडे हे होय.

    पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातील शेकडोच्या संख्येने असलेली खेडी व  वस्त्या ,पंढरपूर शहर व मंगळवेढा शहर या शहरांमधील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व कल्याणकारी कार्य करणारे नेतृत्व म्हणून समाधान दादा अवताडे हे ओळखले जातात. समाधान दादा अवताडे यांनी या मतदारसंघांमध्ये दोन वेळा पराभव पत्करला परंतु समाधान दादा अवताडे यांनी या दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ,तरुणांची, माता भगिनींची सेवा करण्याचे घेतलेले व्रत त्यांनी मोडले नाही की सोडले नाही. ते निराश न होता या मतदारसंघांमधून त्यांनी आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले. त्यांच्या या चिकाटीला व यशाला संत दामाजी आणि पंढरीच्या पांडुरंगानी शेवटी आशीर्वाद दिला व ते दोन टर्म आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. अशा या कर्तुत्वान सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, माता-भगिनींचा लाडका नेता आमदार समाधान दादा अवताडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना आरोग्य ,यश व पुढील राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता देत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "