पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" हुकूमत तीस साल की तीन महिनोंमे पलट दी शहेनशहा समझने वालोंकी नींद उडा दी" ... आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील या युवा नेतृत्वाने माढा तालुक्यातील तीस वर्षाची हुकूमत मक्तेदारी मोजक्या तीन महिन्यात पलटून टाकली.अशा युवा आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक  1ऑगस्ट रोजी माढा तालुका तसेच पंढरपूर तालुक्यामधून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. याचा लाभ संपूर्ण  माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनता, वयोवृद्ध त्याचप्रमाणे महिला व लहान मुला मुलींची आरोग्य तपासणी व विविध रोगावर उपचार केले जाणार आहे. यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर डॉक्टर हे उपस्थित राहणार आहेत. व रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.       आमदार अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार  आहेत.अशी माहिती आमदार अभिजीत आबा पाटील मित्र मंडळ यांनी दिली...

" माढा चे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.त्या उपक्रमा मध्ये माढा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने माढा येथे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.अशी माहिती विठ्ठल प्रतिष्ठान चे सदस्य नितीन सरडे यांनी दिली.    नितीन सरडे पुढे माहिती देत असता ते म्हणाले,माढा तालुक्यातील महिला , पुरुष, लहान मुले,मुली यांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टर यांच्या कडून केली जाणार आहे.या मध्ये हाडांचे विकार,एक्सरे,वाचा दोष,मोफत शस्त्रक्रिया, नेत्ररोग तपासणी,चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंतरोग, स्त्री रोग, कॅन्सर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी,केली जाणार आहे.कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून देण्यात येणार आहे.      वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजीत चोपडे डॉक्टर प्रशांत निकम, डॉक्टर सुयोग बुरकुटे, डॉक्टर अनिल कोरे, डॉक्टर सारंग बुरकुटे जगदाळे हॉस्पिटल बार्शी, डॉ.गणेश इंदुलकर, डॉ.अन...

" बोलो. बोलो. कुछ तो बोलो कॅरिडाॅर का राज तो खोलो".... पंढरपूरकरांची मागणी.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही आषाढी यात्रेनिमित्त महापूजेला येऊन गेले त्यानंतर लगेचच आज रोजी संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी यात्रेनिमित्त आल्यानंतर आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये वारकरी भाविक भक्त व तसेच रहिवासी यांना सर्व सोयी सुविधा सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काशी आणि उज्जैन या शहराच्या धर्तीवर पंढरपूर शहरांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये संकल्पना ते राबवणार आहेत. स्थानिक दुकानदार व रहिवासी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विरुद्ध दर्शवलेला आहे. परंतु भाविक भक्त वारकरी यांची पंढरपूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने होणारी येजा पाहता कॅरिडॉर व मोठे रस्ते आणि वारकरी भाविक भक्तांना सोयी सुविधा या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा कॅरिडॉर बहु चर्चित राहिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी यात्रेच्या वेळी देखील त्यांनी आपले मनोगत स्पष्ट...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस "महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस" हा खऱ्या अर्थाने साजरा होत आहे...... आमदार समाधान दादा अवताडे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशीपूजन व नामदेव पायरी येथे महाआरती व मतदार संघात रक्तदान शिबिर आणि वृक्ष लागवड व संवर्धनाच्या संकल्पाने उत्साहात साजरा होत आहे.       मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कुठलीही जाहिरात होर्डिंग व मनोरंजनाच्या कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार श्री समाधान आवताडे यांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिर तसेच55, 555 झाडांचे वृक्षरोपण व संवर्धन असे व यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघात व राज्यात ही महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने सेवाभाव व समर्पित कार्यातून साजरा होत आहे. हीच नेतृत्वाची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.     यावेळी उपस्थित  श्री विठ्ठल रुक्म...

"पांडुरंग आपल्या संत सावतामाळी यांच्या अरण या माढा तालुक्यातील गावी येतात ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे" .. आमदार अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर /प्रतिनिधी  पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे. कामातच देव मानणाऱ्या कांदा, मुळा, भाजी आवघी विठाई माझी अशी ओळख असणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी रविवारी कानड्या विठुरायाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान झाले.  हा सोहळा अध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या सोहळ्याचा पहिला मुक्काम पंढरपूर ते रोपळे पर्यंत असतो यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच आमदार अभिजीत पाटील हे पांडुरंगाच्या पालखीसोबत आणि तमाम वारकरी भाविकांसोबत जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत "कांदा,मुळा,भाजी अवघी विठाबाई माझी" म्हणत पालखीत पायी चालत सामील झाले होते. दि.२०जुलै रोजी पंढरपूरहून संत शिरोमणी सावता माळी यांच्या अरण (ता. माढा) येथील समाधीस्थळाकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पांडुरंगाची पालखी प्रस्थान ठेवून तीन दिवसांच्या पायी प्रवास केल्यानंतर २६ जुलै रोजी अरण येथे पोहोचणार आहे. दरम्यान संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पारंपरिक भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचे प्रतीक असणारा...

आमदार अभिजीत आबा पाटील यांनी "सोलापूर जिल्ह्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित हमाली व लेव्ही च्या प्रश्नांसाठी आवाज उठवला"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील हे विधानसभेमध्ये सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत आहेत मग ते प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीतले असो किंवा माथाडी कामगारांचे असो किंवा पर्यटनाच्या संदर्भातील असो ,विकास कामाच्या बाबतीतील असो असंख्य प्रश्न अभिजीत आबा पाटील यांनी विधान भवनामध्ये लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न मांडलेले आहेत व त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देखील त्यांनी मिळवलेले आहे ‌     सध्या पावसाळी अधिवेशन हे सुरू असून या अधिवेशनामध्ये माथाडी कामगार हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील माथाडा माथाडी कामगारांचे हमाली व लिवीचे प्रलंबित असलेल्या वेतनाच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला 2019 पासून ते 2025 पर्यंत हा माथाडी कामगारांचा हमाली व लेव्हीचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित होता‌. दर महिन्याच्या पाच तारखेस ही रक्कम जमा होत असते परंतु 2019 पासून ते 2025 पर्यंत ही रक्कम जमा होत नाही असे निर्देशनास आणून दिले.आणि त्याविषयी लक्षवेधी सूचनेच्या वेळी त्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला.     आमदार अभिजीत आबा पाट...

"लोक कार्याचा वसा घेतलेला आहे तो कसा असावा तर..... असा असावा." आमदार अभिजीत आबा पाटील यांची विधानभवनात जाण्याची धावपळ..

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) विधानसभेचा आमदार होणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. आमदार होण्यासाठी अथक प्रयत्नाची पराकाष्ठा ,लोक हिताचे असंख्य कामे, आणि संघटन कौशल्य, लोकांचा मिळवलेला विश्वास , पक्षनिष्ठा, सर्वसामान्य जनता असो किंवा विरोधक असो त्यांनी केलेली टीका व बोलणी ही सहन करण्याची शक्ती, आणि कमी बोलणे व जास्तीत जास्त कामे करणे. या सर्व गोष्टीचा ताळमेळ करून लोक कार्य करणाऱी व्यक्ती असंख्य अडचणी मधून मार्ग काढीत ते बेभरवशाच्या या निवडणुकीमध्ये आपले सर्वस्व पणाला लावून जो उभा राहतो त्याच्या पदरी कधी पराजय असतो, तर कधी विजय असतो. अशीच विजयाची माळ घेऊन माढा विधानसभा मतदार संघामधून आपल्या कार्याच्या जोरावर विधानसभेला निवडून आलेले आमदार अभिजीत आबा पाटील हे सध्या पावसाळी अधिवेशनास उपस्थित आहेत. या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये विविध ठिकाणांमधून महाराष्ट्र राज्यातील आमदार हे विधान भवनात येत असतात. मुंबईतील वाहतूक पाहिल्यानंतर या वाहतुकीच्या मधून वाट काढत हे लोकप्रतिनिधी विधानभवनाकडे पोहोचत असतात. वाटेमध्ये असंख्य ठिकाणी ट्रॅफिक जाम असते, सिग्नल्स असतात त्याचप्रमाणे या गर्दी मधून वाट काढत काढत हे लोक...

" एडवोकेट बादल भाऊ यादव यांना लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार घोषित" .

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार हा पुरस्कार पूर्ण देशभरातील व महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर शहरातील रहिवासी असलेले समाजसेवक एडवोकेट बादल भाऊ यादव यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.     एडवोकेट बागल भाऊ यादव हे दीन दुबळ्या दलितांना व बहुजनातील अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम हे करीत आहेत. आपल्या वकिली पेशाच्या माध्यमातून ते पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये समाजसेवेचे व्रत हे बजावत आहेत. एडवोकेट बादल भाऊ यादव यांच्या या कार्याला भारत सरकार च्या वतीने केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले तसेच केंद्रीय राज्य महिला बालकल्याण मंत्री रक्षा खडसे व इतर मंत्री व खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत एडवोकेट बादल भाऊ यादव यांना दिल्ली येथे 5  ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने लोकशाही डॉ.अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.      एडवोकेट बादल भाऊ यादव यांना लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार घोषित...

" संभाजी ब्रिगेड पद्धतीने उत्तर दिले जाईल" प्रवीण गायकवाड.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे या कार्यक्रमास उपस्थित होणार होते.      शिवधर्म संघटना म्हणवणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेकण्यात आली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त केला जाऊ लागला आहे. काल रोजी पंढरपूर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलत असताना प्रवीण गायकवाड म्हणाले मनुवादी विचारसरणीने पछाडलेले लोकांनी ही कृती केले आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करीत नाही, परंतु यापुढे संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर दिले जाईल. शेवटापासून आता सुरुवात असेल असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले       मनुवादी विचाराने पछाडलेल्या या लोकांनी यापूर्वी कॉम्रेड पानसरे डॉ. कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोळकर, डॉ. गौरी लंकेश या बहुजन नेत्यांच्या पुरोगामी विचाराला, शाहू फुले आंब...

."अरे... तू तो गद्दार निकला .....खंडणीखोर निकला" ....कोण? नितीन सरडे यांनी दिली माहिती.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्याची आणि या तालुक्यामधील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी सहकारी संस्था म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्याची बदनामी करण्याचा उद्देशाने व चेअरमन अभिजीत आबा पाटील आमदार माढा विधानसभा मतदारसंघ यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने अनवली येथील रहिवासी किरण राज घोडके या तरुणांनी कारखाना व आमदार अभिजीत पाटील यांची बदनामी करण्याची कट कारस्थान रचून त्यांना खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून काल रोजी अटक करण्यात आली. अशी माहिती आमदार अभिजीत आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी दिली.        कारखान्याच्या कामगारांना भूल थापा देऊन त्या कामगारांना मी  तुम्हाला न्याय मिळवून देतो. असे कारणे सांगून पुढारपण करणाऱ्या या युवकाला अभिजीत पाटील यांनी पूर्वी सहकार्य केले होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून तो वावरत होता. त्याला चेअरमन पाटील यांनी आर्थिक सहकार्य देखील घर बांधण्यासाठी केले होते. याची थोडी देखील जाण न ठेवता या युवकाने खंडणी मागण्याचा उद्योग केला. ती खंडणी ...

" पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड".... जनतेमधून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली, भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड करण्यात आली‌.      सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध पदावर लोक कल्याणाची कामे करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांनी यापूर्वी देखील विविध राजकीय पदे भूषवलेले आहेत .शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले लक्ष्मण तात्या धनवडे यांनी यापूर्वी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सभापती म्हणून  आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.        लक्ष्मण तात्या धनवडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर असताना मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधणी व धोरण अवलंबले...

सोलापूर दूध संघातील भ्रष्टाचारी लोकांच्यावर कारवाई का नाही? त्यांना अभय का दिले गेले? आमदार अभिजीत आबा पाटील यांचा संतप्त सवाल

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्य दुध महासंघात अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई का नाही? या प्रश्नाला जोडून आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्हा दूध संघात अशा स्वरूपाचा प्रकार घडला होता. त्यावर 83 आणि 88 अंतर्गत चौकशीत झाली संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. परंतु मंत्रालयात पोहोचल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही चौकशी रद्द करत संचालक मंडळ पुन्हा पूर्ववत केले .हा सर्व प्रकार म्हणजेच स्पष्टपणे भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावरही शासन त्यावर कठोर पावले न उचलता दोषीना अभय देत असल्याचा स्पष्ट संदेश समाजात जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे .असे आमदार अभिजीत  आबा पाटील यांनी ठामपणे विधानसभेत सांगितले.        या भ्रष्टाचारामध्ये दोषी असणाऱ्या लोकांना निलंबित का करण्यात आले नाही? मंत्रालयातूनच चौकशी का रद्द करण्यात आली ?भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर ही संचालक मंडळ पूर्ववत का केले ? अशा प्रकारांना अभय देण्याचा शासनाचा हेतू काय? दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेच्या पैशाचा अपहार करणाऱ्यांना अभय देणे म्हणजे अन्य...

" पंढरपूर नगरपालिकेने सुरू केली शहरभरातील स्वच्छता "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) नुकतीच तीर्थक्षेत्र पंढरी नगरीतील विठुरायाची आषाढी यात्रा पार पडली. लाखोच्या संख्येने विठुरायाच्या नगरीमध्ये वारकरी भावीक भक्त येऊन गेले. पंढरपूर नगरपालिकेने वारकरी भावीक भक्तांच्या साठी सर्व सुख सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या सुखसोयी मध्ये सर्वात महत्वाची म्हणजे स्वच्छता मोहीम ही स्वच्छता मोहीम पंढरपूर नगरपालिकेने त्वरित संपूर्ण शहरातील केर कचरा हा गोळा करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले असून पंढरपूर शहर हे आता हळूहळू स्वच्छ होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.      पंढरपूर शहरातील मंदिर परिसर, शिवाजी चौक, चौफाळा, स्टेशन रोड, संत पेठ, कोळी गल्ली, 65 एकर परिसर रिद्धी सिद्धी येथील प्रदक्षिणा शेड ,व उपनगरे या संपूर्ण परिसरामध्ये नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेची मोहीम सुरू झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे पंढरपूर शहरातील रहिवासी नागरिक नगरपालिकेचे कौतुक करीत असून अशीच स्वच्छता वर्षभर सदैव राहावी अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

"पंढरपूर नगरपालिका कर भरणा केंद्र दोन, तीन ठिकाणी असावे" ... जनतेतून मागणी.

इमेज
 पंढरपूर  ( प्रतिनिधी ) .. पंढरपूर नगरपालिकेने शहरभरातील सर्व मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्तेचा कर नगरपालिके कडे भरावेत म्हणून कर पावती घरपोच केली.आषाढी यात्रेच्या एकादशीच्या नंतर कर भरण्यासाठी लोक नगरपालिकेत गर्दी करत असतात.नगरपालिकेने कर विभागात फक्त दोन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण शहरांतील मालमत्ता धारकांचा कर भरण्याचे ओझे टाकले आहे.लोक ही गर्दी पाहून माघारी जात आहेत.नंतर कर भरु म्हणणाऱ्या ची संख्या ही वाढत आहे.कराचे पैसे खर्ची पडल्यानंतर ते कर भरणा करायचे विसरुन जातात त्यामुळे नगरपालिकांचे नुकसान होते.करा साठी तगादा लावावे लागतो.     पंढरपूर नगरपालिकेने नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये कर संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना आप आपल्या भागामध्ये कर भरता येईल.शहरातील उपनगरे, तसेच प्रत्येक प्रभागात कर संकलन सुरू करावे.जेणे करून नगरपालिकेची आर्थिक वाढ होईल.कर भरणाऱ्या ग्राहकांची सोय होईल.वेळ व पैशाची बचत होईल.नगरपालिकेने विविध भागांमध्ये कर संकलन केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

ज्ञानोबा...‌तुकाराम अद्वैतच भारताला विश्व गुरु बनवेल..... प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ). पंचरत्न हभप बापूसाहेब मोरे, बाळासाहेब बडवे, हभप हिरामण मोरे, गोदावरीताई मुंडे व शशीकलाताई केंद्रे याचा समर्पित जीवन गौरव पुरस्काने सन्मान ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ आणि ‘तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री जनाबाई समर्पित जीवन गौरव  पंढरपूर, ७ जुलै : “तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली ते सहस्त्रकातील श्रेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या ज्ञान-विज्ञान संगमातील तत्त्वज्ञानाचा पाया हा भारतीय मूळ विचारधारा असणार्‍या अद्वैताचा आहे. ॐ = ई = एमसी स्वेअर या सिद्धांताचा प्रवासच विश्वाच्या कल्याणाचे सूत्र आहे. हेच सूत्र संपूर्ण विश्वाला भारतमातेच्या रुपात विश्वगुरु बनून शांती व समृध्दीचा मार्ग दाखवेल.” असे विचार श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी मांडले. विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने वाखरी येथील पालखी तळा शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरात आयोजित करण्या...

"दि.पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी सुरज गवळी यांच्या संत रोहिदास महाराज दिंडी क्र १३ या वारकरी दिंडीला शासनाकडून एक लाख रुपये रोख पारितोषक" सर्वत्र कौतुक व अभिनंदननाचा वर्षाव

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी ) दि .पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी सुरज गवळी यांची श्री संत रोहिदास महाराज दिंडी क्र.१३ रथा पुढे ही वारकरी दिंडी  आळंदी ते पंढरपूर मार्गे विठुरायाच्या नगरीमध्ये दरवर्षी दाखल होत असते. या दिंडी मधील सर्व वारकरी भाविक भक्त हे आळंदी ते पंढरपूर येत असताना या मार्गावर स्वच्छतेचे महत्व लोकांना सांगत या मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छता करून एक नवीन आदर्श वारकरी संप्रदाय मध्ये रुजविण्याचे काम ही दिंडी करीत असते.आणि संपूर्ण आषाढी ची वारी ही निर्मल वारी म्हणून ओळखली जावी म्हणून सातत्याने या दिंडीचा प्रयत्न असतो. महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे निर्मल वारी साठी शासन एक लाख रुपये रोख पारितोषक ही अशा दिंडींना प्रदान करत असते. सुरज गवळी व शंकर गवळी यांच्या संत रोहिदास महाराज दिंडी क्र १३ या वारकरी दिंडीला यंदाचा निर्मल वारीचा नंबर  एक पुरस्कार व बहुमान म्हणून एक लाख रुपये रोख रकमेचे पारितोषिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे ,पंढरपूर म...

"दि. पंढरपूर मर्चंट को-ऑप .बँक पंढरपूर यांच्या वतीने वारकरी बांधवांना फराळ वाटप "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) आषाढी यात्रेच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर पायी चालत येणाऱ्या भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या दिवशी दि. पंढरपूर मर्चंट को-ऑप.बँक यांच्यावतीने आज रोजी वारकरी भावीक भक्तांना उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले.     दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी भावीक भक्तांना उपासाचे फराळ वाटप करण्यात येत असते. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेसमोर भाविक भक्तांना फराळाचे वाटप बँकेचे व्हाईस चेअरमन शिखरे माजी चेअरमन नागेश काका भोसले, माजी चेअरमन सोमनाथ काका डोंबे व संचालक अमरजीत पाटील, सुधीर भोसले, सुनील मोहिते, परदेशी, बँकेची सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने उपव्यवस्थापक कुलकर्णी साहेब,व व बँकेचे कर्मचारी यांच्या हस्ते व उपस्थितीमध्ये फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

" वारकरी, शेतकरी बांधवांच्या मुक्कामाचे हक्काचे ठिकाण "पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती होय " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रभरातून तसेच देशभरामधून श्री विठुरायाच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी तसेच शेतकरी यांचे हक्काचे मुक्कामाचे ठिकाण म्हणजे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती होय. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये दरवर्षी 5000 कोटी रुपये प्रमाणे पाच वर्षांमध्ये 25 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोजी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात बोलत असताना त्यांनी दिली.       कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी बांधवांचे पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासाठी व संशोधनासाठी महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व संशोधनामुळे शेतकरी बांधवांची जीवन सुखदायक होणार आहे. सौर ऊर्जा तसेच पाण्याचे योग्य नियोजन खते व बाजारपेठा या अद्यावत करून त्याचा लाभ शेतकरी बांधवांना होणार आहे.     पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या या कृषी मेळ्यामध्ये फल उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले शेतीचे अवजारे ठिबक सिंचन सौर ऊर्...

" कैलास उगले दांपत्याना विठूराया च्या पुजेचा मान मिळाला ".. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पुजेचा मान....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी. ) यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्री विठुरायाच्या महापूजेचा मान जातेगाव येथील कैलास उगले त्या दांपत्यांना पूजेचा मान मिळाला.      सौ उगले दांपत्य हे गेली पंधरा वर्षापासून ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत ते पंढरीच्या वारीला येत असतात. ते माळकरी आहेत. उगले दाम्पत्यांनी विठुरायाच्या महापूजेनंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले विठुरायाच्या महापूजेचा लाभ आम्हाला लाभला आम्हाला खूप आनंद झाला आहे.आम्ही आमच्या या भावना शब्दातून व्यक्त करू शकत नाही. आम्हाला कल्पना देखील नव्हती की आम्हाला महापूजेचा मान मिळेल म्हणून ,परंतु विठुरायाचा कृपेने विठुरायाच्या महापूजेचा लाभ आम्हाला मिळाला. असे कैलास उगले दाम्पत्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्नीसह आषाढी यात्रेच्या एकादशीच्या निमित्ताने शासकीय पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी व्हावा समाधानी व्हावा अशी मनोकामना विठुरायाच्या चरण...

"श्री विठ्ठलाची पंढरी नगरी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने भाविक भक्तांना केलेआवाहन"

इमेज
॥ झाड़ संतांचे मार्ग ॥ करु पंढरीचा स्वर्ग ॥ पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा 6.0 आषाढी यात्रा 2025 यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. या भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणेकरीता खालील सुचनांचे सर्वानी पालन करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती. 1) यात्रेकरू, दिंडीकरी,फडकरी, भाविक भक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे. 2) उघड्यावर शौचास बसु नये प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा. 3) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा. 4) पत्रावळी व द्रोणचा वापर :- जेवणाकरीता थर्माकोल, प्लॉस्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याएवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यां...

आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर २०२५ विविध उपक्रम द्वारे आरोग्य सेवा व जनजागृती ...

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...    सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्यावतीने महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मणी या दैवताच्या आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये वारकरी भाविक भक्त हे आळंदी ते पंढरपूर हे पायी चालत येत असतात. या वारकरी बांधवांना भावीक भक्तांना आरोग्य विषयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने वारकऱ्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ जपण्याच्या उद्देशाने हे  महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्य आरोग्य मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. याचा लाभ पंढरपूर शहरांमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणारे भाविक भक्तांना होणार आहे 65 एकर या परिसरामध्ये हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे...

"कॅरिडाॅर बाबत मुख्यमंत्री काय बोलणार" पंढरपूर वासींयांचे लागले लक्ष.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) बहुचर्चित असलेले पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये कॅरिडाॅर होणार म्हणून गेली कित्येक महिन्यापासून पंढरपूर वासीया मध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे. उज्जैन व काशीच्या धरतीवर पंढरपूर शहरांमध्ये विकास कामे करण्याच्या उद्देशाने व भाविक भक्तांच्या सुख सोयी व सुविधा उपलब्ध देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन पंढरपूर या विठुरायाच्या तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांची मंदिर परिसरामध्ये अतिशय दाटीवाटी ची गर्दी होत असते. काही अघटित घटना घडू नये म्हणून व वारकरी बांधवांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून वारकरी भाविक भक्तांना सुलभतेने या मंदिर परिसरामध्ये चालता यावं आणि या भावी भक्तांना सुख सोयी सुविधा मंदिर परिसराच्या भागांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन कॅरीडॉर हा उज्जैन, काशी या तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर ही योजना राबवणार आहेत. अशी चर्चा गेली कित्येक महिन्यांपासून पंढरपूर शहरांमध्ये सुरू आहे.     मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना यापूर्वी देखील डीपी प्लॅन, मास्टर प्लॅन या शास...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कृषी महोत्सव चे उद्घाटन समारंभ

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कृषी पंढरी वर्षं 10 वे .माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित " कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2025 या कृषी महोत्सव चे भव्य उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमांचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.     कृषी महोत्सव उद्घाटन शनिवार दिनांक 5जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.तरी महाराष्ट्र राज्यातून व परराज्यातील भाविक भक्त व शेतकरी बांधव कृषी महोत्सव ला उपस्थित राहणार आहेत.    शेतकरी बांधवांना शेती विषयक नवीन तंत्रज्ञानाचा तसेच आधुनिक औजारे यांची माहिती व प्रात्यक्षिक पहाण्याचा लाभ होणार आहे.आषाढी यात्रेला शेतकरी कष्टकरी बांधव येत असतात.त्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याची माहिती या कृषी महोत्सवात मिळणार आहे.शेतीतील उत्पादन वाढीच...

"माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले " आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाला यश

इमेज
 पंढरपूर,( प्रतिनिधी ) धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती माढा तालुक्या तील शेतकऱ्यांची होत होती परंतु आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाला आज यश आले. माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सीना माढा उपसा सिंचन योजनेतून आज सकाळी पाण्याचे पूजन करून सोडण्यात आले. आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले. या निर्णयामुळे माढा तालुक्यातील शेतीला मोठा दिलासा  मिळणार असून येत्या काळामध्ये कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.      माढा तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत सतत बैठका घेऊन माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यासाठी  प्रयत्न केले. ही माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे .टेल टू हेड पाणीपुरवठा पूर्ण होईल त्यामुळे माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव हे भरून निघतील. असे आमदार अभिजीत पाटील यांनी आज रोजी सांगितले.       यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे ज्येष्ठ नेते भारत नाना पाटील युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख युवती जिल्हाध्यक्ष विनंती ...

" आमदार समाधान दादा आवताडे यांची पुन्हा तालिका अध्यक्षपदी निवड "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) आमदार समाधान दादा अवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांचे बोलणे कमी परंतु कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असते ते बोलण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे कामे जास्तीत जास्त करण्यावर त्यांचा भर असतो त्यामुळे ते जननायक म्हणून देखील ओळखले जातात.      मागील काळामध्ये आमदार समाधान दादा अवताडे यांनी तालिका पीठसन अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य कामे मार्गी लावलेली आहेत. त्यांच्या या कामाची कदर करीत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने गौरवण्यात आलेले आहे. म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा तालिका पिठाचे अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्यावर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील असंख्य मतदारांनी व कार्यकर्ते यांनी अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला. आमदार समाधान आवताडे यांना मंत्रीपद लाभावे अशी जनतेमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.