"सर्वच ठिकाणी कमळ चिन्ह दिसू लागले विरोधकांचे धाबे दणाणले".... भाजपा उमेदवारांची भव्य प्रचार फेरी.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरांमध्ये भाजपा आणि परिचारक गटाचे पांडुरंग परिवार यांनी या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
भाजपाचे उमेदवार त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाची उमेदवार सौ शामल ताई लक्ष्मण शिरसाट या संपूर्ण शहर मध्ये घरोघरी जाऊन भाजपा व कमळाचे प्रचार संपूर्ण शहर परिसरातील उपनगरे, झोपडपट्टी विभाग या भागामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांनी या संपूर्ण पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेला भाजपाच्या कमळाला निवडून द्या असे ते आव्हान करीत आहेत. या त्यांच्या आवाहनाला संपूर्ण पंढरपूर शहरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाचे सरकार केंद्रामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये असल्यामुळे पंढरपूर शहराला पंढरपूर शहरातील विकासाला लागणारा निधी हा कमी पडू दिला जाणार नाही. अशी माहिती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामलताई लक्ष्मण शिरसाठ यांनी दिली.
पंढरपूर शहरासाठी त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील आमचा कुटुंबाने समाजसेवेच्या माध्यमातून गेली 30-40 वर्षे झाले आम्ही गोरगरीब तसेच दलित पीडित लोकांच्यासाठी आमचं कुटुंब कार्य करीत आलेले आहे. गोरगरीब माता-भगिनींना मदत करीत आलो आहोत. पंढरपूर शहरातील सर्व जनतेला आम्ही विनंती करीत आहोत पंढरपूर नगरपालिकेचा निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मला व अठरा प्रभागातील भाजपा पक्षाचे उमेदवार त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विकास चे उमेदवार कपबशी हे चिन्ह आणि कमळ हे चिन्ह घेऊन निवडणुकीत उभे आहेत. आमच्या सर्व उमेदवारांना पंढरपूर वासियांनी मतदान करून प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन देखील सो शामलताई शिरसाट यांनी आज रोजी केले.
आज पंढरपूर शहरामध्ये भाजपा या पक्षाच्या वतीने प्रचंड मोठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमधील सामील झालेले सर्वसामान्य जनता मतदार महिला माता भगिनी तरूण बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. या प्रचारफेरीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे त्याचप्रमाणे विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट आणि त्यांच्यासोबत अठरा प्रभागातील सर्व भाजपाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर शहरामध्ये सर्वात मोठी प्रचार फेरी भाजपा या पक्षाच्या वतीने काढण्यात आली. आज संपूर्ण पंढरपूर शहरांमध्ये फक्त कमळ आणि कपबशी हे दोनच चिन्ह या प्रचार फेरीमध्ये दिसून येत होते. सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येने सामील सहभागी झाल्याचे पाहून विरोधकाचे धाबे दणाणले आहेत. अशीच चर्चा पूर्ण पंढरपूर शहरांमध्ये सध्या होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा