" दमबाजी कराल तर भालके शी गाठ आहे" .... भगिरथ भालके यांनी विरोधकांना ठणकावले


 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेली गेली तीस-पस्तीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेमध्ये असलेले विरोधक हे सध्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. या विरोधकांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर दबाव आणल्यास दमबाजी केल्यास तर भालके शी गाठ आहे. हे लक्षात ठेवावे.असे तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवतीर्थ येथे विरोधकांना ठणकावून सांगितले. 

     या प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत, नागेश काका भोसले, साईनाथ अभंगराव, धनंजय कोताळकर आणि तीर्थविकास आघाडीचे सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.प्रणिता ताई भालके या उपस्थित होत्या.

      पंढरपूर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य आहे. खड्ड्याने युक्त असे रस्ते आहेत. पंढरपूर शहरातील धुळीमुळे असंख्य वयोवृत्त माता भगिनी त्याचप्रमाणे लहान बालके हे आजारी आहेत. गेली 30-35 वर्ष एकाच गटाकडे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आला व आणला गेला. परंतु या शहराचा काय विकास केला? हे पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनता ओळखून आहे. येत्या काही दिवसात हेच विरोधक जातीपातीचे राजकारण सुरू करतील परंतु मतदार बंधू भगिनींनी या जातीपातीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना घरी बसवण्याचे काम येत्या दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून या विरोधकांना घरी बसवण्याचे काम करायचे आहे. या विरोधकांना विकासावर व विकास कामावर बोलण्याचा काही अधिकार नाही. ठेकेदारी व शहरातून सुरू असलेल्या कामात मधून कमिशन वसूल करण्याचे काम हे सत्ताधारी म्हणणारे विरोधक करीत आहेत.

      माझी पत्नी आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आपल्या सेवेसाठी या निवडणुकीमध्ये त्या उतरले आहेत. त्या माझ्या जरी त्या पत्नी असल्या तरी त्यांच्या कामकाजात मी ढवळाढवळ करणार नाही. त्या नगरपालिकेचा कारभार चालवण्यास सक्षम आहेत. त्या सुशिक्षित आहेत. पंढरपूरवासीयांच्या सेवेसाठी त्या 24 तास उपलब्ध असणार आहेत. अशा उमेदवारालाच पंढरपूर शहरातील मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडून द्यावे व त्यांच्या बरोबर तीर्थ विकास आघाडीचे सर्व उमेदवार यांना विजयी करावे. आणि तीस-पस्तीस वर्षाची अकार्यक्षम सत्ता उलथून टाका. असे आवाहन आज तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी सर्व सामान्य जनतेला केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "