"अरे हा कसला नगरसेवक हा तर" काम का न काज" का दुष्मन सारे प्रभाग का"..... महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपालिकेच्या20 25 च्या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी पंढरपूर शहरांमध्ये सर्वत्र सुरू असून प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हे प्रचारांमध्ये आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर शहरांमध्ये प्रत्येक प्रभागांमधील रहिवाशांचे भेट घेऊन त्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी ऐकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व उमेदवार पंढरपूर नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी व वारकरी भावीक भक्तांसाठी विकासाची कोणती कामे करणार आहेत. याची माहिती त्यांनी दिली. 

      प्रभाग क्रमांक 17 मध्ये महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर या प्रचार फेरीमध्ये आले असता त्यांनी या प्रभागामधील घाणीचे साम्राज्य ,रस्त्यांची झालेली चाळण, खड्डेयुक्त असे रस्ते, ड्रेनेज तुंबलेले, त्या ड्रेनेज मधून वाहत जाणारे घाण मैला युक्त पाणी, संपूर्ण प्रभागामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पाहून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या "अरे हा कसला नगरसेवक हा तर "काम का ना काज का दुश्मन सारे प्रभाग का" असा उल्लेख या प्रभागामध्ये भाजपाच्या नगरसेवकाचा उल्लेख केला. 

     नगरसेवक हे पद सर्वसामान्य जनतेचे सेवा करण्याचे पद असून परंतु या प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवकांनी मेवा खाण्याचेच काम केले. असे देखील त्या म्हणाल्या. या प्रचार फेरी मध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व रुपाली चाकणकर यांच्या समवेत या प्रभागांमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला उमेदवार सौ. प्रभावती दिगंबर सुडके, आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, समाधान काळे, वैशाली शिंदे असे असंख्य कार्यकर्ते या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "