" नागेश भोसले यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये यापूर्वी केलेल्या कामाचे श्रेय हे आता विरोधक घेतआहेत". .......सौ.साधनाताई भोसले ..
पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण जनतेला सांगू लागले आहेत.आम्ही प्रभागांमध्ये, वार्डामधील वेगवेगळे रस्ते, पाण्याची सोय, ड्रेनेजची सोय, बाग बगीचा ,पथदिवे इत्यादी कामे केल्याची यादी सर्वसामान्य जनतेसमोर "खोटं बोल पण रेटून बोल "अशा अविर्भावामध्ये हे भाजपाचे प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार हे सर्वसामान्य जनतेला सांगू लागलेले आहेत. परंतु या प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व जनतेला माहित आहे. की नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी गत वेळी मिळण्याच्या अगोदर नागेश काका भोसले यांनी या प्रभागामधील वेगवेगळे रस्ते ,पाण्याचे सोय, तसेच ड्रेनेजची सोय ही स्वतः खर्च करून ही कामे केलेली होती. परंतु ऐनवेळी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यामुळे या ठिकाणी मिळालेली उमेदवारी नागेश काका यांनी नको म्हणून ती उमेदवारी त्यांनी या उमेदवारांना दिली . नागेश काका भोसले यांनी केलेले कामाच्या जोरावर हे उमेदवार सहज निवडून आले. नगराध्यक्षा पद हे मला मिळाल्यामुळे नागेश काका यांनी या प्रभाग क्रमांक 13 मधील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. परंतु या प्रभागामधील तत्कालीन भाजपाचे हे उमेदवार नागेश काका यांनी केलेल्या कामाचे श्रेय आता ते घेऊ पाहत आहेत. परंतु सर्वसामान्य जनता हे काम नागेश काका भोसले यांनी केलेले आहे. हे जाणून आहेत. या विरोधक असलेल्या भाजपाच्या उमेदवारांना त्या प्रभागांमधील जनता मतदानाच्या रूपाने योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांचा पराभव या प्रभाग क्रमांक 13 मधील जनता केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाचे हे उमेदवार या प्रभागातील जनतेशी "खोटे बोल पण रेटून बोल "असे आविर्भावात ते बोलत आहेत.
प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य मतदार हे सुशिक्षित आहेत. त्यांना नागेश काका भोसले यांनी केलेले कामाची ओळख व जाण आहे. नागेश भोसले हे एका फोनवर आपल्या प्रभागातील कामे करू शकतात. या प्रभागातील अडीअडचणीला सामोरे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून येऊ शकतात. याची खात्री या प्रभाग क्रमांक 13 मधील जनतेला आहे. त्यामुळे या प्रभागातील सर्व सामान्य जनता नागेश काका भोसले आणि सौ.धोत्रे वहिनी यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही.
प्रभाग क्रमांक 13 मधून सर्व घराघरांमधून आम्हाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे .असे देखील माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांनी आज रोजी मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा