" सौ.अमृता विदूल आधटराव यांना प्रभाग क्रमांक १७ ब मध्ये बिनशर्त पाठिंबा".....
पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब या ठिकाणी असलेल्या महिला उमेदवार सौ.अमृता विदुल आधटराव यांना या प्रभागामध्ये मतदार बंधू भगिनींच्या कडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे.
या प्रभाग क्रमांक 17 ब मधील अपक्ष उमेदवार सौ आरती सागर चव्हाण यांनी आज रोजी सौ अमृता विदुल आधटराव यांना बिनशर्तपणे पाठिंबा दिला आहे. यावेळी महिला उमेदवार सौ आरती सागर चव्हाण पाठिंबा देत असताना त्या म्हणाल्या विदुल आधटराव आणि सौ अमृता विदुल आधटराव यांचे सामाजिक कार्य मोठ्या स्वरूपात असून या प्रभाग क्रमांक 17 ब मध्ये मताची विभागणी टाळण्याच्या उद्देशाने आम्ही सौ अमृता विदुल आधटराव यांना बिनशर्तपणे पाठिंबा दिला आहे. आम्ही देखील सौ अमृता विदुल आधटराव यांचा प्रचार करणार आहोत.अशी देखील माहिती सौ आरती सागर चव्हाण यांनी दिली.
अपक्ष उमेदवारांनी सौ अमृता विदुल आधटराव यांना पाठिंबा दिल्यामुळे एकच चर्चा सुरू असून सौ अमृता विदुल आधटराव याच निवडून येणार असे या प्रभागातील मतदार म्हणू लागले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा