गेली पंचवीस तीस वर्षे सत्ता ताब्यात असूनही पंढरपूर शहर धुळ मुक्त करता आले नाही अशी सत्ता धुळीत मिसळा.......... डॉ प्रणिता ताई भालके


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नगरपालिका ही गेली 25 ते 30 वर्षे झाली परिचारक गटाच्या ताब्यात आहे. परंतु या पंढरपूर शहराचा विकास तर सोडाच या शहरातील साधी धूळीची समस्या देखील ते मिटवू शकले नाही. अशा सत्ताधारींना घरी बसवण्याची वेळ आली आहे. संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य आहे या विरोधकांना मतदार बंधू भगिनीने यंदा याच धुळीमध्ये त्यांची कारकीर्द मिसळा असे पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके यांनी मुलाखतीच्या वेळेस आपले मनोगत व्यक्त केले. 

     पंढरपूर शहरातील मतदार बंधू भगिनींनी नगरपालिकेमध्ये सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावेत, निष्कलंकित उमेदवार निवडून द्यावेत. सुशिक्षित उमेदवार निवडल्यानंतर ते उमेदवार आपल्या शिक्षणाचा उपयोग पंढरपूर शहराच्या विकास कामाला ते करू शकतात.

    आज पर्यंत विरोधी गटाला 30-35 वर्ष सत्ता सतत ताब्यात दिलेली आहे. या विरोधकांनी भ्रष्टाचारा व्यतिरिक्त व ठेकेदारी व्यतिरिक्त आणि हुजरेगिरीच्या व्यतिरिक्त काही काम केलेले नाही. यंदाच्या या निवडणुकीमध्ये आमच्या तीर्थ विकास आघाडीला जनतेने निवडून द्यावे. फक्त एकदा संधी देऊन पहा मी विकास केल्याशिवाय राहणार नाही. असे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "