प्रभाग क्रमांक 6 अ,व 6 ब मध्ये परिचारक गटाचे उमेदवार सुजीत सर्वगोड आणि रेहाना बोहरी यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद...... माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती
पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरांमधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये विविध जाती धर्मांचे लोक या प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहत असून या प्रभागामध्ये नगरसेवक सुजित सर्वगोड व महिला नगरसेविका उमेदवार रेहाना बोहरी यांचे कार्य मोठ्या प्रमाणात असून या प्रभागामध्ये भाजपाचे परिचारक गटाचे उमेदवार यांनी या प्रभागामधील सर्वसामान्य जनतेच्या आवडीनुसार आणि विनंतीनुसार त्यांनी कप बशी हे चिन्ह स्वीकारून या चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या. असे आवाहन या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार सुजित सर्वगोड आणि रेहाना बोहरी यांनी आज या प्रचार फेरीच्या रॅलीमध्ये त्यांनी सर्वसामान्य मतदारांना आवाहन केले.
विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी या प्रभागामधील मतदार बंधू भगिनींना मतदानासाठी आवाहन केले. भाजपा पक्षाच्या वतीने व परिचारक गटाच्या पांडुरंग परिवाराच्या वतीने या प्रभाग क्रमांक सहा अ व ब मध्ये कपबशी चिन्ह हे या परिसरातील लोकांच्या इच्छेनुसार कपबशी हे चिन्ह स्वीकारले असून या कपबशीच्या चिन्ह पुढील बटन दाबून सुजित सर्वगोड व रेहाना बोहरी या दोन्ही कार्य तत्पर असणाऱ्या व सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या अशा या दोन्ही उमेदवारांना या प्रभागातील मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे. असे आवाहन व विनंती प्रशांतराव परिचारक यांनी आज रोजी केली.
या प्रचार फेरीला पंढरपूर शहरातील असंख्य कार्यकर्ते भाजपाचे कार्यकर्ते व नेतेमंडळी हे उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा