" प्रभाग क्रमांक १८( अ) मधून भालके गटाचे उमेदवारांनी प्रचाराची केली सुरुवात " विनायक बसवेश्वर देवमारे आणि सौ.संगिता अंगद धुमाळ यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी साधला संपर्क...

 

पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूर शहराच्या अंतर्गत असलेला हा प्रभाग क्रमांक 18 या प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आज पर्यंत अनेक मूलभूत गरजा पासून वंचित ठेवलेले आहे. कित्येक भागामध्ये रस्ते झालेले नाहीत., दिवाबत्तीची दुरावस्था आहे, त्याचप्रमाणे मैला मिश्रित पाणी नळाला येते. अशा प्रकारच्या असंख्य अडचणी या प्रभागांमध्ये आहेत. घाणीचे साम्राज्य पंढरपूर शहरांमध्ये सर्वात जास्त या प्रभागांमध्ये दिसून येते. अशा प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर सर्वसामान्य जाणकार मतदारांनी प्रभाग क्रमांक 18 मध्ये उभे राहिलेले श्री विठ्ठल परिवार तीर्थक्षेत्र विकास आघाडी या आघाडीच्या वतीने सौ डॉ प्रणिता ताई भालके यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये निवडणुकीस उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असलेले विनायक बसवेश्वर देवमारे आणि त्याच प्रमाणे सौ संगीता अंगद धुमाळ या दोन्ही उमेदवारांनी आज रोजी प्रचाराचा शुभारंभ करून बागवान मोहल्ला व या प्रभागातील विविध गल्लीमधून त्यांनी आपली प्रचार फेरी सुरू केलेली आहे‌ सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात ते जात आहेत. सर्वसामान्य जनतेचे अडीअडचणी ऐकून घेऊन यावर आपण नगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर या प्रभागाचा कायापालट करण्याचे आश्वासन सौ संगीता अंगद धुमाळ आणि विनायक बसवेश्वर देवमारे यांनी या प्रभागातील मतदार बंधू-भगिनींना दिले. 

     या प्रचार फेरीमध्ये असंख्य कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "