" मतदार राजा जागा हो सुशिक्षित उमेदवार निवडण्याचा तू एक धागा हो"....


 पंढरपूर) प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज पर्यंत असंख्य अशिक्षितांनी आणि धन दांडग्यांनी, ठेकेदारी जोपासणाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला आमिष दाखवून जनतेला खोटे आश्वासने देऊन नगरपालिकेतील नगरसेवक पद भूषविले आहेत. परंतु आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये उच्चशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर असलेली व अमेरिकेसारख्या राष्ट्रांमध्ये आपल्या ज्ञानाचा झेंडा फडकवणारे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून असंख्य कंपन्यामधून सेवा बजावलेली व्यक्ती म्हणजेच प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल यांनी पंढरपूर शहरांमधील दुरावस्था पाहून पंढरपूर शहराच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व माता-भगिनींना व्हावा म्हणून या पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. 

    पंढरपूर शहरातील वाढती बेरोजगारी, धुळीचे साम्राज्य, आणि रखडलेली विकास कामे या अनेक विकास कामाबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विठुरायाचा नगरीला समृद्ध करण्याचा उद्देशाने राजसिंह डुबल हे निवडणुकीस उभे आहेत. 

     पंढरपूर शहरातील तरुणांना महिलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन त्याचप्रमाणे नवीन पिढीला चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले आयुष्य सुखकर करता येते. त्यासाठी लागणारे मार्गदर्शन व शिबिर आयोजित केले जातील. 

    पंढरपूर शहरातील असंख्य शासकीय भूखंड भूमाफिया हे गिळंकृत करीत आहेत. या भूखंडाचा योग्य तो वापर करून त्या ठिकाणी जेष्ठ नागरिकांना बगीचा, तरुणांसाठी व्यायामशाळा, वाचनालय, मार्गदर्शन केंद्र असे विविध उपक्रम आपण राबवू शकतो. पंढरपूर शहरात येणारा भाविक भक्त हा या शहरातील स्वच्छ पाणी त्यांनी प्यावे स्वच्छता त्याने अनुभवावी ,रोगराई पासून त्याचे रक्षण कसे करता येईल. त्याच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष दिले जाणार आहे. 

    पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित उमेदवारांना सर्वसामान्य जनतेने निवडून द्यावे. हे सुशिक्षित उमेदवार पंढरपूर शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. 

प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल यांनी या प्रभागातील मतदारांना एक सुशिक्षित उमेदवार निवडून द्या .असे त्यांनी आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "