" निवडणूकीतील घोटाळे भाजपाने न केल्यास आमच्या नगराध्यक्षा उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके या निवडून येणार"....... खासदार प्रणिती ताई शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये आज रोजी सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती ताई शिंदे या स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भालके यांच्या कार्यालयामध्ये आले असता त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होत असता त्या म्हणाल्या काँग्रेस सरकारने महिलांसाठी आरक्षण दिल्यामुळे या आरक्षणाचा लाभ हा संपूर्ण देशभरामध्ये सर्वपक्षीय महिलांना त्याचा लाभ होत आहे.
पंढरपूर शहर हे तीर्थ क्षेत्र शहर असून या शहराकडे राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे. या शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या पंढरपूर शहरांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार जाहीर झाल्यामुळे महिला या सक्षम असतात. स्वच्छ कारभार करणारे असतात .आणि त्या भावनिक असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या समस्या अडीअडचणी याची त्यांना जाण असते. त्यामुळे शहरातील रहिवाशांना एक दिलासा मिळणार आहे. डॉ. प्रणिताताई भालके या उच्चशिक्षित असून पंढरपूर शहरातील सर्व अडीअडचणी त्या जाणतात. त्या संपूर्ण शहराच्या विकासासाठी अहोरात्र झगडू शकतात. त्यांना पंढरपूर शहरातील समस्यांची जाण आहे. विकासाचे नियोजन आहे. त्यामुळे डॉ. प्रणिता ताई भालके यांना पंढरपूर शहरातील जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. असे खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीतील घोटाळे न केल्यास तीर्थक्षेत्र विकासआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ .प्रणिता ताई भालके आणि त्यांचे सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार हे निवडून येऊ शकतात.
निवडणूक पूर्वीच भाजपा मंडळी हे अंदाज व्यक्त करू लागलेले आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे भाजपाचे सर्व अंदाज हे वाया जाणार आहे.
यावेळी उपस्थित पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता ताई भालके, किरण घाडगे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा