नागेश काका भोसले व सौ.रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचाराचा घेतली आघाडी
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील उच्चशिक्षित व उच्चभ्रू म्हणून ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक 13 या प्रभागांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या वतीने या प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार नागेश अण्णासाहेब भोसले तसेच सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी या प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचार प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे. या प्रभागामधील प्रत्येक घरोघरी जाऊन तेथील सर्वसामान्य वयोवृद्ध ,माता भगिनी तरुण ,तरुणी यांच्या भेटीगाठी घेऊन या परिसरामध्ये राहिलेली विकास कामे व अन्य मूलभूत सुविधांच्या उपाय योजनेसाठी पंढरपूर नगरपरिषद मध्ये आग्रहाने व अथक प्रयत्न करून सर्व विकासकामे करण्याचा निर्धार व आश्वासन या भागातील सर्वसामान्य मतदारांना त्यांनी दिले.
गेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये रस्ते, त्याचप्रमाणे ड्रेनेज, पिण्याचे पाण्याची सोय , दिवाबत्ती अशी अनेक कामे नागेश काका भोसले यांनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेले आहेत. यंदाच्या या नगरपालिकेच्या निवडणूक 2025 मध्ये या प्रभागांमध्ये त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. या प्रभागामधून ते स्वतः निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्यासोबत उमेदवार सौ. रुक्मिणी धनाजी धोत्रे या भगिनी आहेत. या परिसरातील सर्वांगीण विकास साठी अथक प्रयत्न करणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी या यापूर्वी देखील सोडवत आलो आहोत ,आणि यापुढे देखील सर्वसामान्य जनतेचे अडीअडचणी मी सोडवणार आहोत. कुणीही मला फोन करावा मी त्या व्यक्तीचे काम केल्याशिवाय राहणार नाही. माझा फोन दिवस-रात्र सुरू असतो. तुम्ही मला केव्हाही बोलवा, हक्काने बोलवा, कामे सांगा. मी तुमच्या सर्व सुखदुःखामध्ये सामील असणारा तुमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आहे.
तीर्थ विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवार म्हणून डॉ. प्रणिता ताई भगीरथ भालके या उभ्या असून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी मतदान करावे त्याचप्रमाणे भालके गट तीर्थ विकास आघाडीचे आम्ही दोन उमेदवार मी नागेश अण्णासाहेब भोसले आणि सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे आम्हा दोघांना दोन मते द्यावीत.तीर्थविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ . प्रणिताताई भालके मला आपल्या या प्रभागांमध्ये सेवेची संधी द्यावी. अशी विनंती व आवाहन प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य मतदारांना त्यांनी आज रोजी प्रचार फेरीमध्ये केले.
या प्रचार फेरीमध्ये माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले या स्वतः प्रचार फेरीमध्ये सामील होऊन प्रत्येक घरोघरी जाऊन माता माऊलींची, भगिनींची, तरुण-तरुणी ,युवकांची भेट घेऊन या प्रभागामध्ये नागेश काका भोसले यांना काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्या प्रचार फेरीमध्ये करीत आहेत.
विरोधी गटाच्या उमेदवारांपेक्षा प्रचारामध्ये नागेश काका भोसले व सौ रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा