" विरोधकांचा डोळा पंढरपूर नगरपालिका मध्ये येणाऱ्या निधीवर आहे" माजी आमदार प्रशांतराव परिचारक
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये ठिकठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रचार सभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे पांडुरंग परिवार परिचारक गट यांच्या माध्यमातून भाजपा पंढरपूर शहरांमध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे. पंढरपूर शहरातील हिंदू आणि मुस्लिमांचा सलोखा ज्या ठिकाणी कायमस्वरूपी दिसून येतो. तो परिसर म्हणजे कालिकादेवी मंदिर परिसर या परिसरामध्ये आज रोजी भाजपाच्या वतीने कॉर्नर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी विरोधकांच्यावर टीकास्त्र सोडले. ते आपल्या भाषणांमध्ये बोलत असताना ते म्हणाले की या विरोधकांना पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी काही घेणे देणे नाही. यांचा फक्त पंढरपूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या कोट्यावधी निधीवर त्यांचा डोळा आहे. जातीपातीचे राजकारण करून हे विरोधक जाती-पातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. अशा जातीपातीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना कायमस्वरूपीच घरी बसवण्याचे काम उद्याच्या दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून मतदार बंधू-भगिनींना करायचे आहे.
यावेळी या कॉर्नर सभेला उपस्थित या प्रभागातील नगरसेविका रेहाना बोहरी, सुजित सर्वगोड,माने ताई व पंढरपूर शहरातील 18 प्रभागातील भाजपाचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
प्रशांतराव परिचारक आपल्या भाषणामध्ये ते पुढे म्हणाले या परिसरातील मुस्लिम समाज हा अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपला उद्धार निर्वाह करीत आहे. या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे. कष्टकरी समाज म्हणून हा ओळखला जातो. या समाजाच्या हिताचे काम यापूर्वी देखील स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या कारकिर्दीमध्ये परिचारक कुटुंबाने केलेले आहे. मंदिर परिसरा मधून मुस्लिम समाजाचे इब्राहिम बोहरी यांना प्रचंड मताने निवडून आणले होते. याची आठवण या प्रभागातील सर्व मतदार बंधू-भगिनींना आहे. या प्रभागातील लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व जाती धर्मातील लोकांना आपल्या सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून ओळखला जाणारा हा भाजप पक्ष केद्र सरकार मध्ये आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये भाजपा पक्ष सत्तेवर आहे. पंढरपूर शहराचा विकास कामा साठी कोट्यावधी रुपयाचा निधी येत आहे. पंढरपूर शहरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी चार ते पाच कोटी लोक दर्शनाला येण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व व्यापारी वर्गांना, बेरोजगार तरुण तरुणींना हाताला काम मिळणार आहे. कोट्यावधी रुपये चे चलन आपल्या पंढरपूर शहरांमध्ये फिरत राहणार आहे. त्यामुळे या शहरातील सर्व व्यापारी वर्गांना ते लाभदायक ठरणार आहे. केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाचे सरकार असल्यामुळे निधीची काही कमतरता पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रशांतराव परिचारक यांनी प्रचार सभेमध्ये दिली. प्रशांतराव परिचारक यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शामल ताई लक्ष्मण शिरसाट आणि भाजपाचे 18 प्रभागातील सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा