" आम्ही केलेली विकासकामे विरोधकांना दिसत नाही"....... प्रशांतराव परिचारक


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील विरोधकांना 2016 साली आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा दिला होता. त्या जाहीरनाम्यानुसार आम्ही केलेली विकास कामे दिसत नाहीत का? असा सवाल करत विधानपरिषद चे माजी आमदार व भाजपाचे जेष्ठ नेते प्रशांतराव परिचारक यांनी सवाल उपस्थित केला .

    महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आलेला होता. या निधीमधून आम्ही पंढरपूर शहरातील व उपनगरांमधील रस्त्यांचे कामे ही दर्जेदार पद्धतीची केलेली आहे. पंढरपूर शहरातील ड्रेनेज लाईन संपूर्ण शहरभर जोडलेली आहे. वाखरी वरून येणारा पालखी मार्ग या मार्गाचे रुंदीकरण व रस्त्याचे काम हे पूर्णतः होत आलेले आहे. पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नागरिकांना व्हावी म्हणून आम्ही 19 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभा केल्या. त्याचप्रमाणे पंढरपूर शहरांमध्ये असलेला निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जाणारा यमाई तुकाई तलाव परिसर या परिसराचे सुशोभीकरण व तुळशी वृंदावन ही काम केलेले आहे. ही सर्व कामे आम्ही 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सर्वसामान्य जनतेला अभिवचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्याचे काम आम्ही केलेले आहे. ही सर्व कामे या विरोधकांना दिसून कसे येत नाहीत? . 

     विरोधकांच्याकडे अकरा वर्षाची सत्ता त्यांच्याकडे होती. त्यांनी या पंढरपूर शहरासाठी कोणती विकास कामे केली ते त्यांनी आवर्जून सांगावे. विरोधकांना परिचारक कुटुंबाची ऍलर्जी झालेली आहे. काहीही झाले तरी फक्त परिचारिकांना टारगेट करायचं एवढेच काम या विऱोधकांनी गेल्या कित्येक वर्षापासून केलेली आहे. 

     यंदाच्या 2025 च्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व समाजाला नगरपालिकेच्या नगरसेवकाची उमेदवारी देताना समतोल साधलेला आहे. कुठल्याही समाजावर आम्ही अन्याय केलेला नाही. नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवारांसाठी आम्ही बहुजनातील महिलेची निवड केली. सौ शामल लक्ष्मण शिरसाट यांची नगराध्यक्ष पदासाठी ची निवड ही सर्वानुमते भाजपा पक्षाच्या सर्व जेष्ठ नेतेमंडळीच्या सल्ल्यानुसार नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांच्या उमेदवारी यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केलेली आहे. या ठिकाणी सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. 

    भाजपाचे शासन केंद्रामध्ये व राज्यांमध्ये असल्यामुळे पंढरपूर शहराच्या विकासासाठी लागणारा विकास निधी हा कमी पडणार नाही. त्यामुळे पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे असे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "