" ना राजकीय सत्ता ना पैशाची सुबत्ता फक्त बुद्धीमत्ता" भावी उमेदवार श्री निवास उपळकर.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरामध्ये ओळखले जाते. अशा या वैकुंठ नगरी श्री विठुरायाची पंढरी या शहरांमध्ये वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळी बुक्का आणि विठुरायाचे दर्शन घेऊन धन्य होणारे भाविक भक्त आहेत .या भाविक भक्तांच्या साठी तुळशीचे माळा या पंढरपूर शहरांमध्ये बनवल्या जातात. ज्या तुळशीच्या माळा बनवणारे काशी कपडे समाजातील लोक हे अग्रगण्य असून त्यांचा हा तुळशीची माळ बनवण्याचा पीढीजात व्यवसाय आहे. या काशीकापडी समाजातील लोकांना तुळशीची माळ बनवण्यासाठी जागेची कमतरता ही पूर्वीपासूनच भासत आलेली आहे. लहान लहान घरांमध्ये राहणारी हे गरीब काशी कापडी समाजातील लोक आपला उदरनिर्वाह तुळशीच्या माळा बनवून त्या आषाढी, कार्तिकी, चैत्री माघी,या चार वारीच्या मधून ते विक्रीस ठेवतात. त्या माळा विकून झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह हा समाज करीत असतो. या तुळशीच्या माळा घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील भाविक भक्त येत असतात.
अशा या कष्टकरी काशी कापडी समाजातील गोरगरीब लोकांसाठी समाज मंदिराची आवश्यकता भासत होती. परंतु या समाजामधील तरुणांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या तरुणांमध्ये शिक्षणाचा अभाव हा प्रामुख्याने आढळून येतो. असा हा अशिक्षित म्हणून समजला जाणारा हा काशी कापडी समाज या काशी कापडी समाजामधील जे काही सुशिक्षित तरुण आहेत. या तरुणा पैकीच एक म्हणजे श्रीनिवास राजाराम उपळकर या तरुणांनी आपल्या समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांची करुण कहाणी पाहून आपला हा समाज आपल्या राहत्या घरामध्ये अतिशय अडचणीच्या जागी बसून हा तुळशीचा माळा बनवत असतो. या समाज बांधवाला तुळशीची माळा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागेची आवश्यकता ही भासत होती. यासाठी समाज मंदिराची मागणी श्रीनिवास उपळकर यांनी शासन दरबारी केली नगरपालिका तसेच नगरविकास खाते त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्याने या काशी कापडी समाजाला समाज मंदिरासाठी जागा मंजूर करण्यात आली. या समाज मंदिराचे जागेसाठीचे श्रेय श्री निवास उपळकर हे आपल्या स्वतःकडून घेता समाजामधील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक माजी नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व समाज बांधव व अन्य समाजातील तरुणांनी व लोकांनी सर्वतोपरी मदत केल्यामुळे हे समाज मंदिर ची जागा मिळवण्यास यश मिळाले. असं मनोगत श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केले. याचे सर्व श्रेय श्री श्रीनिवास उपळकर स्वतः कडे न घेता ते आपल्या समाज बांधवांना याचे श्रेय देतात. यातच श्रीनिवास उपळकर यांचे मोठेपण दिसून येते.
कुठलीही राजकीय सत्ता नसताना तसेच आर्थिक सुबत्ता नसताना फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी शासन दरबारी काशी कापडी समाजाला समाज मंदिरासाठी जागा आवश्यक आहे. हे पटवून देण्याचे काम श्रीनिवास उपळकर यांनी केले. आणि काशी कापडी समाजासाठी समाज मंदिराला लागणारी जागा त्यांनी मंजूर करून घेतली.
आज या परिसरातील लोक श्रीनिवास उपळकर यांना एक समाजसेवक म्हणून ओळखतात. या समाजसेवेला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय किंवा सत्तेमध्ये सामील झाल्याशिवाय पर्याय नाही. हे ओळखून या भागातील सर्वसामान्य जनता श्रीनिवास उपळकर यांना भावी नगरसेवक म्हणून ओळखू लागले आहेत. उद्याच्या पंढरपूर नगरपरिषद निवडणूक होणार आहे .या होणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या परिसरातील सर्वसामान्य काशी कापडी समाज व अन्य समाज श्रीनिवास उपळकर यांना उमेदवारीसाठी ते पाठिंबा व्यक्त करीत आहेत. आपल्या प्रभागाचा नगरसेवक हा काम करणारा असावा. समाजाचे हित पाहणारा असावा. आणि सुशिक्षित असावा. अशी मनोधारणा या प्रभागातील लोकांची असल्याची चर्चा सध्या या प्रभागामध्ये ऐकवास मिळत आहे.
श्रीनिवास उपळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होत असताना त्यांनी काशी कापडी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ ची मागणी व्यक्त केली आहे शासन दरबारामध्ये पाठपुरावा करून महाराष्ट्रातील तमाम काशी कापडी समाजाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे हे शासनाला पटवून देण्याचे काम पुढील काही दिवसांमध्ये ते करणार आहेत. असे श्रीनिवास उपळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा