" तीन कोटींचा निधी मी नगरसेवक नसताना आणून कामे केली आहेत.".... आदित्य फत्तेपूरकर


 पंढरपूर ( प्रतिनिधी) कोणतीही सत्ता नसताना मी माझ्या या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला , मंत्री महोदय भरणे मामा यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी आणला.आणि त्या निधीमधून या प्रभागातील रस्ते ची कामे केली.

   या प्रभागामध्ये वडार समाजातील लोकांची संख्या मोठी आहे.या समाजाला समाज मंदीर साठी एक कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे.

    प्रबोधनकार ठाकरे चौक या परिसरातील रस्ते ची कामे केली आहेत. या  परिसरात उच्चशिक्षित लोकांच्या वसाहती आहेत.या वसाहतीने तीस..तीस हजार जागा ओपन पेस ठेवले आहेत.या जागा रिकाम्या पडून आहेत.या जागेवर लहान मुलांसाठी बगीचा, खेळण्यासाठी जागा होऊ शकते नानानानी पार्क होऊ शकतो.परंतू नगरपालिकेमध्ये तीस..तीस वर्षं सत्ता असूनसुद्धा या प्रभागात कामे केली नाहीत.हा प्रभाग सर्वात मोठा आहे.या प्रभागातील असंख्य कामे मी केलेले आहेत. कोणतीही सत्ता माझ्याकडे नसताना देखील मी या प्रभागातील असंख्य कामे केलेले आहेत माझे सर्व पक्षातील नेतेमंडळी व आमदार खासदार यांच्याशी माझे चांगले संबंध असल्यामुळे मला निधी मिळवण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी मी बांधील आहे. असे या प्रभागामधील उमेदवार आदित्य फतेपुरकर यांनी मुलाखतीत सांगितले व त्यांच्या पत्नी या मुलाखती वेळी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "