"कमळ कोमेजून जाईल काय?" नेत्यांना वाटू लागली भीती....



 पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या या निवडणुकीच्या चिन्ह वाटपाच्या पूर्वसंध्येला आज पंढरपूर नगरपालिका या ठिकाणी चिन्ह वाटपाच्या कारणावरून मोठे वादंग झाल्याची दिसून आले.

    या ठिकाणी तीर्थ विकास आघाडीच्या नेते मंडळींना चिन्ह वाटपाच्या संदर्भामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी असे सांगितले की अध्यक्ष पदासाठी निवडणूक चिन्ह हे वेगळे असेल आणि तीर्थ विकास आघाडीच्या अन्य उमेदवारांसाठी वेगळे निवडणूक चिन्ह असणार असल्याचे सांगण्यात आले. आज नगरपालिकेमध्ये विरोधी गटाचे तीर्थविकास आघाडीचे नेते भगीरथ भालके त्याचप्रमाणे मनसेचे दिलीप बापू धोत्रे , काँग्रेसचे अध्यक्ष आदित्य फतेपुरकर, नगराध्यक्ष पदाच्या डॉ. प्रणिता ताई भालके आणि तीर्थ विकास आघाडीचे 36 नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .

    तीर्थ विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी मुलाखत वेळी बोलत असताना ते म्हणाले आमची तीर्थ विकास आघाडी ही अधिकृत असून निवडणूक आयोगाने अधिकृत केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आमचा तीर्थ विकास आघाडीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले आहे .हे एबी फॉर्म देखील नियमानुसार दिले गेलेले आहे. तर मग एका पक्षाला एक न्याय आणि दुसऱ्या पक्षाला दुसरा  न्याय दिला जात आहे हे लोकशाहीचे उल्लंघन आहे. संविधानाची उल्लंघन आहे. निवडणूक अधिकारी सांगत आहेत. तीर्थ विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला वेगळे चिन्ह दिले जाईल आणि याच तीर्थ विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना वेगळी चिन्ह दिले जाणार असल्याचे ते सांगत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणतात की वरून आदेश आलेले आहेत. त्या आदेशानुसार आम्ही काम करीत आहोत. असे ते सांगत आहेत .त्याच्यावरून असेच समजून येते, की राज्य शासनातील नेते मंडळीचा दबावा खाली हे अधिकारी काम करीत आहेत की काय?  असेच दिसून येत आहे. उद्या 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून ओळखला जातो. या संविधान दिनाच्या दिवशीच संविधानाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विरोधी गटावर अन्याय होत आहे. असे आज तीर्थविकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी नगरपालिकेच्या समोर पत्रकारांना मुलाखती वेळी सांगितले. 

   या चालू सर्व घडामोडी वरून सद्यस्थितीला असे दिसून येत आहे की पंढरपूर शहरांमध्ये सर्वच ठिकाणी तीर्थ विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.प्रणिता ताई भालके या सर्वच प्रभागांमध्ये प्रचारामध्ये त्याने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर शहरामध्ये भाजपा आणि विरोधी गट तीर्थविकास आघाडी या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. अशा ऐनवेळी चिन्ह वाटपाच्या कारणावरून मोठे वादळ उठत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे पंढरपूर नगरपालिका निवडणूक मधील गोंधळ पाहून सर्वसामान्य मतदार एकच चर्चा करीत असल्याचे सध्या शहरांमध्ये दिसून येत आहे." कमळ कोमेजुन जाईल की काय?" अशी भीती नेत्यांना वाटू लागली की काय? अशी चर्चा सद्यस्थितीला पंढरपूर शहरामध्ये चर्चिली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "