"शरद पवारांनी काय केले असे विचारणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे " अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) शरद पवारांनी आजपर्यंत आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रा साठी तसेच शेतकऱ्यांच्या साठी काय केले?असे आजचा तरुण विचारत आहे.परंतू या तरुणाला हे माहित नाही. तो ज्या आयटी पार्क मध्ये भल्या मोठ्या पगारावर काम करतो .ती हिंजवडी येथील आयटी पार्क या शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये उभी राहिलेली आहे. ऊस कारखाने संपूर्ण महाराष्ट्रभर उभे करून त्यांना अर्थसहाय्य पुरवठा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून उसाच्या पिकाकडे शरद पवारांनी वळवले या उसाच्या बिलामधूनच या आजच्या तरुणांच्या मोबाईलचे रिचार्ज भरले जाते. हे तो तरुण विसरलेला आहे.
शरद पवार यांनी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण उभे करून या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना पाण्याच्या माध्यमातून प्रगतशील केलेले आहे. हे कोणीही विसरू शकणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी या शरद पवारांनी केलेली आहे. हे या आजच्या तरुणाला माहिती नसावं. राज्यातील कोरडवाहू जमिनीच्या मध्ये ठिबक सिंचनाच्या द्वारे फळभागाची लागवड करावी. म्हणून प्रोत्साहन देणारे हेच ते शरद पवार या फळबागाच्या जीवावर आज शेतकरी करोडपती झालेला आहे. हे सर्व आजचा तरुण विसरलेला वाटतो.
राम मंदिर उभारण्याचे श्रेय आज हे सरकार भाजपाचे घेत आहे. या राम मंदिरासाठी 5000 कोटी रुपये भक्तांच्या कडून देणगीच्या स्वरूपात जमा झाले. या राम मंदिराचा निर्मितीचा खर्च एक हजार आठशे कोटी रुपये झाला तर उरलेल्या बाकीच्या पैशाचं काय झाले? याचा हिशोब का सांगितला जात नाही. नोट बाहेर काढू म्हणणारे हे सरकार काळा पैसा काही बाहेर आला नाही. एका रात्रीत नोटबंदी केली तसेच एकाच रात्रीत इथेनॉल सारखे प्रकल्प शेतकऱ्यांना नफा देणारे हे एका रात्रीत बंद करण्यात आले. हे भाजपा शासन हे गोरगरीब शेतकऱ्यांचे नाही हेच दिसून येते.
आज सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा अद्यापही उमेदवार हा जाहीर झालेला नाही. आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी उमेदवारी मागितलेली आहे. त्यांची लोकसभेसाठी जो उमेदवारी पाहताच भाजपाचे उमेदवार देखील प्रणिती ताईंच्या समोर उभा राहू की नको? अशा संभ्रमावस्थेमध्ये ते उमेदवार आहेत .आणि भाजपा पक्ष देखील आहे. प्रणिती ताई यांच्या उमेदवारी पुढे कोणता उमेदवार द्यायचा? असा प्रश्न सध्या भाजपाला पडलेला आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आणि प्रणिती ताई शिंदे या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील.
असे श्री विठ्ठल का सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणामधून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मंगळवेढाचे नंदकुमार पवार ,चेतन नरोटे सुभाष भोसले, आदित्य फतेपुरकर, प्रकाश तात्या पाटील, युवा आघाडीचे सुनंजय पवार, सुधीर भोसले ,आप पक्षाचे एम पाटील, सुरेश हसापुरे आदी मान्यवर या संकल्प सभेच्या निमित्ताने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा