"रस्ता रोको आंदोलन करु म्हणताच मागण्या मंजूर " तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध.. लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या प्रयत्नामुळे यश.

 "रस्ता रोको आंदोलन करु म्हणताच मागण्या मंजूर " 

तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध.. लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या प्रयत्नामुळे यश.

पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रामध्ये येणाऱ्या अन्य ग्रामीण भागातील गावे व वाड्यावर या येथील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे रस्ता रोको हे आंदोलन करण्याची ठरले होते परंतु लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या प्रयत्नामुळे पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने आदेश देऊन तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्वरित मान्य झाले 15 मार्च 2024 पासून सर्व वैद्यकीय सुविधा या तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध होणारा असून या सुविधांमध्ये शस्त्रक्रिया ग्रह त्याचप्रमाणे सर्पदंश लस स्वांग लस आणि आरोग्य कर्मचारी यांची उपलब्धता ही झालेली आहे.

     11 मार्च रोजी भैरवनाथ वाडी येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तात्या धनवडे यांनी तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व तेथील भोंगळ कारभाराला आळा घालण्यासाठी त्या आरोग्य केंद्रामध्ये सर्व आरोग्य सुविधा यावर उपलब्ध व्हाव्यात म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले होते परंतु जिल्हा तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी त्वरित आदेश देऊन या सुविधा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले त्यामुळे 18 मार्च रोजी होणारा रस्ता रोको आंदोलन हे स्थगित करण्यात आले आहे असे पत्र तालुका पोलीस स्टेशन येथील  पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

    भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण धनवडे यांच्या प्रयत्नाला यश आल्या मुळे त्या भागातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....