"पंढरपूर शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर "
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) शहर अध्यक्ष दिगंबर सुडके. पंढरपूर ( प्रतिनिधी) माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पंढरपूर शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यासाठी निधी ची मागणी करण्यात आली होती.ही मागणी मंजूर करण्यासाठी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दिगंबर सुडके यांनी अथक प्रयत्न करून शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील कुष्ठरोग वसाहतीत पेव्हर ब्लॉक बसवणे.,इसबावी येथील श्री विठ्ठल मंदिर तसेच श्री मारुती मंदिर येथे पेवर ब्लॉक बसवणे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले चौक ते नवनाथ राऊत यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्ता हा काँक्रिटीकरण करणे आधी शहरातील विकास कामे पूर्ण होण्यासाठी 55 लाख रुपये चा निधी नगरपालिकेला सुपूर्त करण्यात आला. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी आज रोजी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा