"मतदारसंघातील विकासकामांच्यावर न बोलता उमेदवार एकमेकांची उणीधुणी काढू लागली."

 


पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या या दोन जागा असून माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ हा अराखीव असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे, या  मतदारसंघांमधील उमेदवार भाजपाचे राम सातपुते त्याचप्रमाणे आय काँग्रेसचे आमदार प्रणिती ताई शिंदे या दोघांची उमेदवारी त्या त्या पक्षाने जाहीर केलेली असून सध्या ते दोघेही उमेदवार आपापल्या लोकसभा मतदारसंघांमधून गाव भेटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचे ते प्रयत्नात आहेत.

    त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे असून अन्य पक्षाकडून अद्यापही उमेदवारी ही जाहीर झालेली नसल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्या मतदारसंघांमध्ये गावभेटीच्या माध्यमातून जनतेचा कौल घेण्यासाठी गाव भेट करीत आहे. या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील हे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे ते सध्या सबुरीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

        सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि आय काँग्रेसचे प्रणिती ताई शिंदे हे लोकसभेचे उमेदवार, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे ,त्याप्रमाणे रखडलेली विकास कामे, भविष्यात होऊ पाहणारे विकास कामे, सोलापूर जिल्ह्याला भेडसावणारा  पाणी प्रश्न, उद्योगधंदे तरुण बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी चे प्रयत्न, केला महिला सुरक्षा बाबत चे प्रश्न आधी प्रश्नाचा ऊहापोह न होता हे दोन्हीही पक्षाचे उमेदवार आपापल्या खाजगी जीवनावर चर्चा करीत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. एकमेकांच्या वर टीका करणे, एकमेकांची उणीधुणी काढणे.असे सध्यातरी दिसून येत आहे. त्यांच्या या आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून समस्त जनतेचे मनोरंजन होत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

    सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे अक्कलकोट तालुका, मंगळवेढा तालुका, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर ही दोन्ही तालुके, त्याचप्रमाणे सोलापूर शहर , मोहोळ,आणि पंढरपूर शहर आणि पंढरपूरच्या  परिसरातील काही गावे यांचा समावेश या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात. अक्कलकोट तालुक्यातील विकास कामे, अक्कलकोट शहरे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र म्हणून काय योजना करणार आहोत?, तसेच पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून पंढरपूर हे पर्यटन क्षेत्र व्हावे म्हणून कोणते प्रयत्न करणार आहोत,? या विषयावर उमेदवार बोलत नसल्याचे दिसून येते. आणि या सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न या पाणी प्रश्नावर व त्याचे नियोजनावर केंद्र शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना करणार आहोत. याविषयी देखील ते बोलत नसल्याची दिसून येत आहे. या लोकसभा मतदार संघामध्ये सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. विणकारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या सोलापूर शहरातील विणकारांच्या हातमागा साठी त्याचप्रमाणे येथील चादर, टर्की स्टाॅवेल, रेडीमेड कपड्यांचे कारखाने या उद्योगधंद्याला चालना मिळवून  देण्यासाठी हे उमेदवार काय प्रयत्न करणार आहेत.?  यावर देखील ते भाषे करताना कुठेही दिसून येत नाही.

    एकमेकांच्या वर टीका करणे एवढेच आपले काम आहे. अशी समजूत या उमेदवारांची झाली की काय?  असा प्रश्न सर्वसामान्य मतदार राजाला पडलेला दिसत आहे. आपल्या या मतदारसंघाचा आपण कसा कायापालट करणार आहोत. तरुण बेरोजगारांच्या हाताला आपण उद्योगधंदेच्या माध्यमातून कशाप्रकारे मदत करणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न, या पाणी प्रश्नासाठी काय नियोजन करणार आहोत. याविषयी काही न बोलता हे उमेदवार एकमेकांची उणीधुणी काढण्यातच दंग आहेत. असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....