सोलापूर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (अ.जा) पंढरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम घोषित.

 


पंढरपूर ( प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोलापूर राखीव मतदार संघ अंतर्गत पंढरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. तो पुढील प्रमाणे १) उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 12 एप्रिल 2024 पासून सुरू तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2020 अशी असून उमेदवारी अर्ज काढून घेण्याची तारीख 22 एप्रिल 2024 अशी असून त्याचप्रमाणे मतदानाची तारीख सात मे 2024 अशी आहे. मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी होणार आहे.

      प्रांताधिकारी सचिन इथापे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया विषयी माहिती दिली. त्यांच्यासोबत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे त्याचप्रमाणे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी मदन जाधव हे उपस्थित होते.

        252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पुरुष मतदार एक लाख 83 हजार 292 आणि स्त्री मतदार एक लाख 71 हजार 823 इतर मतदार 23 असे एकूण तीन लाख 55 हजार 138 एवढे मतदार व 555 सैनिक मतदार आहेत. या मतदारसंघांमध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदार 6,147 असून 20 ते 29 वयोगटातील मतदार ७४,४६९ इतके आहेत 85 वर्षावरील मतदारांची संख्या ही 5354 असून पीडब्ल्यूडी मतदारसंघ ही दोन 2587 इतकी आहे.

     पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मूळ मतदान केंद्र 337 शहरी 108 व ग्रामीण 229 अशी एकूण दोन 337 मतदान केंद्र आहेत. तसेच 337 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. अशी माहिती सचिन इथापे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

     पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी नियुक्ती केलेले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1855 असून खर्च नियंत्रक कक्षातील अधिकारी सहा, व्हिडिओग्राफर्स 22, सूक्ष्म निरीक्षक 40, सेक्टर अधिकारी 32, भरारी पथके चार

  अशी माहिती देण्यात आली. परवानगीसाठी एक खिडकी योजना त्याचप्रमाणे तक्रार निवारण कक्ष उपलब्ध होणार आहे. टपाली मतपत्रिका द्वारे कर्मचाऱ्यांनी मतदान साठी सहाय्य केंद्र, सैनिकांसाठी व पत्नी साठी मतपत्रिकाही ऑनलाईन करण्यात आलेली आहे. संबंधित ॲप द्वारे मतदान ते करू शकतात. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी आज रोजी पत्रकारांना दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....