"कोणत्याही क्षणी बाजू पलटून टाकणारा खेळ म्हणजे क्रिकेट" प्रा.शिवाजीराव सावंत.
पंढरपूर ( प्रतिनिधी) क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कोणत्याही क्षणी डाव पलटून टाकणारा असा खेळ आहे.असे मनोगत प्रा.शिवाजीराव सावंत यांनी आज रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभ मध्ये व्यक्त केले.
डॉ.तानाजीराव सावंत आरोग्य मंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्राॅफी ही देण्यात आली.
या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट फास्ट बॉलर म्हणून पंढरपूर येथील दिनेश शिंगाडे तसेच बेस्ट बॅट्समन म्हणून जय बनकर त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच धीरज कोळी मॅन ऑफ द सिरीज धीरज कोळी यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
भैरवनाथ शुगर चे प्रथम क्रमांकाचे चॅम्पियनशिप ट्रॉफी ही बक्षीस रोख रक्कम एक लाख 31 हजार रुपयाचे पारितोषक जीएस १००० पी.पी संघ या संघाला देण्यात आले. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषक निमगाव टीम रोख रक्कम 75 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.त्याचप्रमाणे तिसरा क्रमांक बोरगाव संघ अकलूज या संघाला तिसरे बक्षीस 41 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.चौथा क्रमांकाचे बक्षीस मातोश्री संघ रोख रक्कम 20000 व ट्रॉफी ही प्रदान करण्यात आली.
या पारितोषिक वितरणाच्या समारंभा साठी उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक आदित्य फतेपुरकर, संजय बनपट्टे, श्याम गोगाव सर,वैभव बडवे, नगरसेवक धोत्रे , भैरवनाथ शुगर चे प्रमुख अनिल सावंत हे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा