"ईडी च्या भीतीने सोलापूर जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत". प्रणिती ताई शिंदे
प़ंढरपूर (प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून मी उमेदवारी मिळवली असून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील असंख्य अडीअडचणी या सोडवण्यासाठी, त्याचप्रमाणे शेतकरी व त्यांचे शेतमालाला सध्या भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळवून देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यामधील रखडलेली विकास कामे ही पूर्णत्वास नेण्यासाठी मला आपल्या सहकारी ची गरज आहे. सध्या देशामध्ये वाढलेली महागाई त्याचप्रमाणे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारे वातावरण, दलित पद दलितांच्या वर अन्याय होत आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला आपल्या मदतीची गरज आहे. असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील शिरढोण या गावी व्यक्त केले.
गेली 25 वर्ष भाजपाने या सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्याचप्रमाणे काँग्रेसला फक्त 15 वर्ष प्रतिनिधित्व करण्यास मिळाले. काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये केलेली विकासकामेची श्रेय हे भाजपा घेत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या या मतदार संघाच्या विकासकामासाठी कधीही संसदेमध्ये आवाज न उठवणारे हे मौन बाळगून असलेले भाजपाचे प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याला अजून मागे टाकीत आहेत. अशा मौनी खासदारांना घरी बसवण्याची वेळ आज आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त करून भाजपाचे सहयोगी तसेच भाजपाचे लोकप्रतिनिधी आहेत. हे लोकप्रतिनिधी ईडीच्या भीतीने सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत. अशा लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याची वेळ आज आलेली आहे. सध्याची निवडणूक ही लोकशाहीतील शेवटची निवडणूक होते आहे की काय? अशी अवस्था सध्या सर्वत्र देशांमध्ये दिसून येत आहे.
सोलापूर मतदारसंघांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंदे वाढविण्यासाठी ची गरज आहे. तसेच बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि संसदेमध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे अधिक जोमाने करण्यासाठी मला आपल्या सहकार्याची गरज आहे. माझी ही उमेदवारी जनतेची कामे करण्यासाठी आहे.
"अभिजीत आबा पाटील आणि भगिरथ दादा भालके प्रणिती ताई शिंदे सोबत"
माझ्यासोबत आज पंढरपूर तालुक्यातील अभिजीत आबा पाटील आणि भागीरथ दादा भालके हे दोघे जण माझ्यासोबत आहेत. हे तुम्हाला आवर्जून सांगावसं वाटते. आबा आणि दादाच्या सोबत आपण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करूया." जिंकू किंवा मरू" अशी परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झालेली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न, आदी विकास कामे करण्यासाठी मला आपण सर्वांनी सहकार्य करावे. असे मनोगत आज पंढरपूर तालुक्यातील शिरढोण या गावी प्रणिती ताई शिंदे यांनी गाव भेटीच्या निमित्ताने ग्रामस्थांना करण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा