"मराठा आरक्षण आंदोलनकर्ते च्या आडून भाजपा विरोध करीत आहे." प्रणिती ताई शिंदे.
पंढरपूर ( प्रतिनिधी)
मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांच्या आडून भाजपाचे कार्यकर्ते मला गाव भेटीच्या दौऱ्यामध्ये विरुद्ध दर्शवित आहेत. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज सांगितले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पासून आमदार प्रणिती ताई शिंदे या आय काँग्रेसच्या वतीने उमेदवार म्हणून ते गाव भेटीचा दौरा सध्या ते करीत आहेत. त्यांना मंगळवेढा भागातून त्याचप्रमाणे पंढरपूर परिसरातील कवठाळी सरकोली गोपाळपूर दोन-तीन ठिकाणी त्यांना मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांनी गाव भेटीसाठी विरोध दर्शवला होता. या संदर्भात अभिजीत पाटील यांनी व प्रणिती ताई शिंदे यांनी आंदोलन करण्याची समजूत काढून शांत केले.
आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी हे आंदोलन कर्ते मराठा आरक्षण च्या आडून भाजपाचे हे कार्यकर्ते मला विरोध दर्शवीत आहेत. कारण भाजपाचा उमेदवार या भागातून अद्यापही या लोकसभेसाठी जाहीर झालेला नाही. भाजपाने या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणतेच विकास कामे न केल्यामुळे आणि भाजपाचा उमेदवार या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत होण्याची खात्री झाल्यामुळेच हे भाजपा कार्यकर्ते आता मराठा आंदोलन कर्त्याच्या आडून मला विरुद्ध दर्शवीत आहेत. असे आज प्रणिती ताई शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
राजेंद्र काळे पंढरपूर ✍🏻
9518391218

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा